संस्कृतीचा उत्सव, महाराष्ट्राचा अभिमान : महसूलमंत्री बावनकुळे

0
Newsworldmarathi Pune : दिलीप वेडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर कला, साहित्य, संगीत आणि विचारांना चालना देणारा एक भव्य उपक्रम ठरला आहे. त्यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आणि या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक बळ दिले असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, बावधन, एल. एम. डी. चौक, पुणे येथे आयोजित बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार प्रदान महोत्सवात ‘बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार सुनेत्रा अजितदादा पवार, सरसंघचालक रवींद्र वंजारवाडकर, खासदार मेधा कुलकर्णी, तसेच मा. नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते प्रवीण तरडे, तालयोगी तबलावादक पं. सुरेश तळवलकर, महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहळ, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना भाऊ तोरसेकर आणि प्रवीण तरडे यांनी महोत्सवाच्या भव्य आयोजनाचे विशेष कौतुक केले. संयोजक दिलीप वेडेपाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. महोत्सवाच्या आयोजनात चेलाराम हॉस्पिटल, आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज, सुराणा संघवी कन्स्ट्रक्शन्स, वाईस कंस्ट्रक्शन, न्याती कन्स्ट्रक्शन्स आणि के पुणे यांचा मोलाचा सहभाग होता. यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकरभाऊ मांडेकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

0
Newsworldmarathi Pune : आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एरंडवणा अग्निशमन केंद्र येथे ड्युटीस असणारे फायरमन राहुल वाघमोडे हे आपली सकाळची शिफ्ट संपवून मोशी येथे आपल्या दुचाकीवर घरी जात असताना बाजीराव रस्ता येथील हिराबाग चौक येथे त्यांनी एका सीएनजी असणाऱ्या पीएमपीएमएल बसमधून (हडपसर – भेकराईनगर) पाठीमागील बाजूस काही प्रमाणात आग लागली असल्याचे व धुर ही येत असल्याचे पाहताच त्यांनी लगेचच ही घटना त्वरीत अग्निशमन दल नियंत्रण कक्षास कळवली. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने प्रथमत: बसमधील प्रवाशांना वाहनचालक तसेच वाहक यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर घेत अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) बसमधून घेऊन त्याचा वापर करीत पाचच मिनिटात आग पुर्ण विझवून पुढील अनर्थ टाळला. बस व प्रवासी यांचे आगीमध्ये होणारे मोठे नुकसान ही टाळत आपले कर्तव्य चोख बजावले. अग्निशमन दलाचे जवान राहुल वाघमोडे यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीचे तेथे असलेले बसमधील प्रवासी, नागरिक व पीएमपीएमएलचे कर्मचारी यांनी फायरमन वाघमोडे यांच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करीत अग्निशमन दलाचे ही आभार मानले.

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ९०० रुग्णांची नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया

0
Newsworldmarathi Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे आयोजित शिबीरात ९०० रुग्णांची नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळ सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिबीरात ७६३ रुग्णांची नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप तर नेत्र आजार विविध शस्त्रक्रिया १०३ रुग्णांच्या करण्यात आल्या. अलायन्स क्लब ऑफ पुणे, एच व्ही देसाई नेत्रालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजित करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, अनेक वर्षांपासून जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत विविध शिबीरांचे आयोजन करण्यात येते. शिबिरात मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, आय ड्रॉप्स वाटप तसेच मोफत मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे कार्य सातत्याने सुरु असून गरजूंनी ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ओपन हाऊस निमित्त पुणेकरांनी जाणून घेतला ‘फ्रीमेसनरी’ समुदायाचा इतिहास

0
Newsworldmarathi Pune : कॅम्प भागातील फ्रीमेसन्स हॉल आज सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडला गेला होता. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिकांनी “ओपन हाऊस” कार्यक्रमाचा लाभ घेतला. मॅसोनिक लॉजेस ही एक अशी संघटना आहे जी त्या पुरुषांची असते जे एक सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवतात आणि आत्मसुधारणेसाठी चिंतन करण्याची इच्छा बाळगतात. फ्रीमेसनरीच्या विविध पैलूंवर लेस्ली विल्सन लॉजच्या सदस्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यानंतर एक प्रश्नोत्तर सत्र पार पडले, ज्यामध्ये फ्रीमेसनरीबाबत उपस्थितांच्या शंका दूर करण्यात आल्या. इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले  होते. कार्यक्रमाच्या दरम्यान एक मोफत डोळ्यांची तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते, ज्याचा नागरिकांनी लाभ घेतला. फ्रीमेसनरीचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे आणि त्याचे लेखी पुरावे मागील ५०० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध आहेत. अमेरिकेचे अनेक राष्ट्रपती, राजे व राजघराणे तसेच जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वे जसे जॉर्ज वॉशिंग्टन, मोझार्ट, सर विंस्टन चर्चिल, मार्क ट्वेन हे सर्व फ्रीमेसन होते. तसेच भारतातील अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक, व्यवस्थापकीय संचालक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जावर कार्यरत अधिकारी,  व्यावसायिक यांचा या समुदायामध्ये समावेश आहे. काही प्रसिद्ध भारतीय फ्रीमेसन्समध्ये स्वामी विवेकानंद, फिरोजशाह मेहता, पंडित मोतीलाल नेहरू, सर दोराबजी जमशेदजी टाटा, डॉ. सी. राजगोपालाचारी, सर सुलतान मोहम्मद शाह आगा खान, महाराजा दुलीप सिंग, महाराजा जिवाजी राव सिंदिया, अभिनेते डेव्हिड अब्राहाम, क्रिकेटपटु मन्सुर अली खान पतौडी यांचा समावेश होतो. फ्रीमेसनरीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया www.dglbombay.in या वेबसाइटला भेट द्या.

केसगळती तरुणांसाठी गंभीर समस्या : सई ताम्हणकर

0
Newsworldmarathi Pune : केस गळती ही आज केवळ सौंदर्याचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा मोठा मुद्दा बनली आहे. अलीकडच्या काळात तरुणांसाठी ही समस्या गंभीर बनत चालली असल्याचे मत सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केले .ला डेन्सिटे या संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १०,००० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानिमित्त दर गुरुवारी सर्वांसाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन योजना शुभारंभ व नववी शाखा उद्घाटन समारंभ पार पडला त्यावे ताम्हणकर बोलत होत्या. पुण्यातील महिलांनी व तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सई ताम्हणकर यांनी यावेळी केले. अभिनेता प्रसाद ओक यांनी केसांची निगा राखण्यासाठी आहार व पाणी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे निदर्शनास आणून दिले .क्रिकेटर अशोक धिंडा यांनी आपण केस गळतीचे कसे शिकार झालो यांबाबत अनुभव सांगितले .तसेच आपली ही केसांची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले व योग्य वेळी केसांची निगा राखण्याचे उपस्थितांना सांगितले . या कार्यक्रमाचे आयोजक ,ला डेन्सिटे चे संस्थापक डॉ.गजानन जाधव यांनी संस्थेची माहिती सांगितली .तसेच आम्ही सुरू केलेल्या योजनेला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. या उद्घाटन समारंभास सिनेअभिनेते प्रसाद ओक,अभिनेत्री सई परांजपे,क्रिकेटर अशोक धिंडा,डॉ.गजानन जाधव ,उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार 15 एप्रिलपर्यंत मोठी घोषणा

Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २४ चेकपॉईंट १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत. रविवारी परिवहन भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. देशभरात जीएसटी लागू झाल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्त्व कमी झाले आहे, असे ते म्हणाले. भविष्यात व्यापारवृद्धी आणि मालवाहतुकीला चालना देण्यासाठी चेकपॉईंट बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे, १५ एप्रिलपर्यंत या संदर्भातील प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन भवनाचे भूमिपूजन झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. येत्या अडीच वर्षांत म्हणजे २०२७ च्या मध्यापर्यंत या भवनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. फेसलेस सेवांचे लोकार्पण : मुख्यमंत्र्यांनी हलक्या व्यावसायिक वाहनांची डीलर पॉईंट नोंदणी आणि हायपोथेकेशन टर्मिनेशनला स्वयंचलित मान्यता देणाऱ्या २ फेसलेस सेवांचे लोकार्पण केले. शासनाने ‘मेटा’सोबत करार केला असून, येत्या काळात ५०० सेवा व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत, ज्यात आरटीओच्या ४५ फेसलेस सेवांचाही समावेश असेल. राज्यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (एटीएस), स्वयंचलित चालक चाचणी केंद्र (एडीटीटी), एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएम) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने नागरिकांचे प्रबोधन आणि शिक्षण करण्याचे आव्हान परिवहन विभागाने स्वीकारले पाहिजे.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले अनोखे रोबोटिक्स विश्व

0
Newsworldmarathi Pune : विश्वकर्मा विद्यापीठ पुणे सादर करत असलेली  शाळा आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा ‘फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५’  श्री शिव छत्रपती क्रीडांगण  पुणे येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. आज या स्पर्धेत पुणे महापालिकेच्या विद्यायनिकेतन शाळांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स विश्वाचा अनोखा अनुभव घेतला.  फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४ =२५ या स्पर्धेती भारतातील विविध ६० शहरांसाह कझाकस्तान, श्रीलंका, युएई येथून ६ आंतरराष्ट्रीय संघ सहभागी झाले आहेत. या रोबोटिक्स स्पर्धेचे अनोखे विश्व जाणून घेण्यासाठी  पुणे महापालिकेच्या  विद्य निकेतन शाळांमधील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना आज शिक्षकांच्या सोबत या चॅम्पियनशिप अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी लाईव्ह रोबोटिक्स मॅचेस पाहिल्या, जिथे देशभरातील टॉप टीम्स उच्च-ऊर्जा, धोरणात्मक खेळांमध्ये प्रतिस्पर्धा करत होत्या. धमाकेदार मॅचेसशिवाय, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या टीम्सद्वारे विविध नवकल्पनांचे प्रदर्शन पाहिले. यामुळे त्यांना रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि समस्यांच्या सोडवणुकीच्या तंत्रज्ञानांची माहिती मिळाली. तंत्रज्ञानातील कौशल्य, टीमवर्क आणि सर्जनशीलतेने प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स आणि STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रांबद्दल उत्साह व्यक्त केला. यामुळे भविष्यातील करियरच्या दृष्टीने त्यांना एक नवा प्रेरणा मिळाला. सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आरामदायक आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी ICIT, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्या सौजन्याने रिफ्रेशमेंट  उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिपमध्ये वेळ घालवला आणि हा कार्यक्रम केवळ शैक्षणिकच नाही तर प्रेरणादायी आणि आकर्षक ठरला. फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप हा एक अभिनव मंच ठरला आहे, ज्यामुळे युवा मनांना रोबोटिक्स आणि नवकल्पनांच्या जगात प्रवेश मिळतो आणि भविष्यातील तंत्रज्ञ नेतृत्व तयार होईल. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यासह विविध संस्था कार्यरत आहेत.

स्वराज्य सप्ताह अंतर्गत तोरणा गडावर स्वच्छता मोहिम

0
Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे आयोजित गडकिल्ले स्वच्छता अभियानात तोरणा गडावरील मंदीरांसह, शिवकालीन व ऐतिहासिक महत्व असलेल्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. माननिय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या संकल्पनेतून ‘स्वराज्य सप्ताह’ गडकिल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबवून साजरा करण्यात आले. या अभियानाचाच भाग म्हणून तोरणा गडावरील तोरणेश्वर मंदिर, मेंगाई देवीचे मंदिर व महादेव मंदीरात व आवाराची स्वच्छता करून पूजा करण्यात आली. पर्यटकांकडून गडावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या व प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्याप्रमाणात गोळा करण्यात आल्या गडावरील पाण्याच्या टाक्यांच्या भोवतालच्या परिसरातील कचरा गोळा करण्यात आला. गड किल्ले संवर्धन सेलच्या कार्यकर्त्यांसोबत राजगड तालुका व आर एम डी कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सेल चे प्रदेश उपाध्यक्ष समीर धुमाळ, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव राजगड तालुका अध्यक्ष वल्लभ कोकाटे, हवेली तालुका उपाध्यक्ष, अमित नागपुरे, मयुरेश पासलकर, राकेश तांबे यांनी संयोजन केले होते.

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक

0
पुणे : पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती. दत्तात्राय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे.

वृक्ष लागवड आणि रक्तदानमुळे वाचवी मनुष्य जातीचे प्राण : शोभाताई आर धारिवाल

0
Newsworldmarathi Pune : दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त “रक्तदान सोहळा” आयोजित केला जातो या आधीही त्यांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यामध्ये विविध रक्तदान केंद्रांवर एकाच दिवशी २४,000 ब्लड बॅग्स संकलन करण्याचा विक्रम आर एम डी फाउंडेशनने केलेला आहे, हि परंपरा आजही नियमितपणे पाळल्या जाते. तसेच आर एम डी फाउंडेशन द्वारा मागील 30 वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्यक्रम निरंतर चालू आहे श्री रसिकलाल धारीवाल साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “एक लाख झाडं लावण्याची योजना” असेल किंवा “पुलकछाया योजने” अंतर्गत भारतभर वृक्ष लागवड असेल किंवा “एक झाड आईच्या नावाने” योजना असेल तेव्हा आर एम डी फाउंडेशन द्वारा शेकडो वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे आज काळाच्या बदलत्या गरजेनुसार फाउंडेशनने “ट्री ट्रान्सप्लांटेशन योजना” राबविण्यात सुरुवात केलेली असून पुणे रिंग रोड प्रकल्पात शेकडो वृक्षांना कापण्यापासून वाचवून उपलब्ध जागेत स्थानांतर करून अनेक वृक्षांचे प्राण वाचविण्याचे काम सुरु झालेले आहे. आजच्या प्रसंगी ” वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मानवाचे प्राण” अशी भावना शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी व्यक्त केली. आज दिनांक १ मार्च २०२५ शनिवार रोजी श्री रसिकलाल साहेबांच्या जन्मदिनानिमित्त जास्तीत जास्त पुणेकरांनी आर एम डी बंगला नंबर ६४, लेन नंबर ३ कोरेगाव पार्क-पुणे येथे उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी ७३५३३५४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.