Newsworldmarathi Pune : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून नवीन उद्योजकांसाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात सोबतच काही कालबाह्य झालेल्या योजनेचा अभ्यास करून त्या नव्याने तयार करून या योजनेची सांगड महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या योजनेशी घालावी त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढ होईल . असे मत राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री .लहूराज माळी, महाव्यवस्थापक श्री .राकेश बेत, उपमहाव्यवस्थाप श्री शरद लोंढे उप महाव्यवस्थापक श्रीमती वैशाली जाधव, प्रादेशिक व्यवस्थापक शिंदे उपस्थित होते.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळतील विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला लाभार्थ्यांना महामंडळाबाबत देण्यात येणार्या प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली प्रशिक्षण संस्था दर्जेदार प्रशिक्षण देत असल्याची खात्री करावी चांगल्या प्रशिक्षण संस्थेची निवड होईल याची दक्षता घ्यावी सफाई कामगार यांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत असताना लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात येत आहे .
महामंडळामध्ये लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महामंडळचा उत्पन्न वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा ज्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देता येईल मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाने प्रयत्न करावेत अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
Newsworldmarathi Pune : पुण्यातील ही घटना अत्यंत भयानक आहे आणि समाजाच्या मानसिकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. प्रॉपर्टी वादाच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या करत संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या घटनेमुळे केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून बुधवारी पहाटे झालेल्या एका खुनामुळे पुणेकर हादरले आहेत. कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली एवढंच नव्हे तर त्यानंतर त्या पतीने या संपूर्ण घटनेचा, रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडीओही तयार केला. हे सर्व कृत्य आपल्या लहान मुलासमोर केले. आणि त्यानंतर तो स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाल्याचा हादरवणारा प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील खराडी परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या हत्याकांडाने खळबळ माजली.
प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली, नंतर त्याचा व्हिडीओ बनवून त्यात या हत्येचं कारणंही कथन केलं.पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कुठे भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड होते तर कुठे गोळीबार होतो. आणि हे कमी की काय म्हणून पतीनेच पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडीओ बनवल्याचा क्रूर प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खराडीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. पतीने कात्री घेऊन पत्नीच्या गळ्यावर वार केला. तिची हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ शूट करत पतीने या हत्येचे कारणही सांगितलं. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून त्याने त्याच्या बायकोलाच संपवलं.आणि हे सगळं केल्यानंतर तो आरोपी पती स्वत:च पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. पुण्यातील चंदननगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामध्ये आणखी काय माहिती समोर येत हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
Newsworldmarathi Pune : मा.उप आयुक्त , परिमंडळ क्र. ४ व मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे माध्यमातून ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंह यांच्या उपस्थितीत कोंढावा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ऐतिहासिक पेशवे तलाव,VIT कॉलेज या परिसरात स्वच्छता अभियान रबविण्यात आले.
या अभियानात बिबवेवडी येथील ९० पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच क्षेत्रिय कार्यालय अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरीक यांनी सहभाग घेतला. यावेळी परीसर स्वछ करुन १६१५ किलो कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने, प्लास्टिक वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
याप्रसंगी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कोंढवा येवलेवडी व धनकवडी क्षेत्रिय कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
Newsworldmarathi Team : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे.
रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.
दुसरी मोठी गुंतवणूक ही अॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.
टोनी ब्लेअर यांची भेट
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.
सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:
21) सिएट
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : नागपूर
22) व्हीआयटी सेमिकॉन्स
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 24,437 कोटी
रोजगार : 33,600
कोणत्या भागात : रत्नागिरी
23) टाटा समूह
क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक : 30,000 कोटी
24) रुरल एन्हान्सर्स
क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
गुंतवणूक : 10,000 कोटी
25) पॉवरिन ऊर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 15,299 कोटी
रोजगार : 4000
26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 15,000 कोटी
रोजगार : 1000
27) युनायटेड फॉस्परस लि.
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 6500 कोटी
रोजगार : 1300
28) ईरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूक: 20,000 कोटी
रोजगार : 20,000
29) ऑलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक: 3000 कोटी
रोजगार : 1000
30) फ्युएल
क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अॅनालिटिक्सचे प्रशिक्षण
……….
दि. 21 जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी
एकूण रोजगार : 1,53,635
………….
दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार
31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट
गुंतवणूक: 3,05,000 कोटी
रोजगार : 3,00,000
32) ग्रिटा एनर्जी
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 10,319 कोटी
रोजगार : 3200
कोणत्या भागात : चंद्रपूर
33) वर्धान लिथियम
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
गुंतवणूक : 42,535 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : नागपूर
34) इंडोरामा
क्षेत्र : वस्त्रोद्योग
गुंतवणूक : 21,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : रायगड
35) इंडोरामा
क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
गुंतवणूक: 10,200 कोटी
रोजगार : 3000
कोणत्या भागात : रायगड
36) सॉटेफिन भारत
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक: 8641 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर
37) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर
38) सिलॉन बिव्हरेज
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 1039 कोटी
रोजगार : 450
कोणत्या भागात : अहिल्यानगर
39) लासर्न अँड टुब्रो लि.
क्षेत्र : संरक्षण उत्पादन
गुंतवणूक : 10,000 कोटी
रोजगार : 2500
कोणत्या भागात : तळेगाव
40) नेल्सन मिडिया प्रा. लि.
क्षेत्र : आयटी
गुंतवणूक: 450 कोटी
रोजगार : 1100
कोणत्या भागात : एमएमआर
41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
गुंतवणूक : 12,780 कोटी
रोजगार : 2325
कोणत्या भागात : नागपूर
42) एमएसएन होल्डिंग्ज लि.
क्षेत्र : सौर
गुंतवणूक : 14,652 कोटी
रोजगार : 8760
कोणत्या भागात : नागपूर
43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.
क्षेत्र : ड्रोननिर्मिती
गुंतवणूक : 300 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : जालना
44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 5000 कोटी
रोजगार : 1300
कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र
45) हॅझेरो इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : बुटीबोरी
46) टॉरल इंडिया
क्षेत्र: अॅल्युमिनियम आणि मेटल्स
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 1200
कोणत्या भागात : अहिल्यानगर
47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर
48) हिरानंदानी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 51,600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर
49) एव्हरस्टोन समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 8600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर
50) अॅमेझॉन
क्षेत्र : डेटा सेंटर
गुंतवणूक : 71,795 कोटी
रोजगार : 83,100
कोणत्या भागात : एमएमआर
51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर
52) एमटीसी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
कोणत्या भागात : एमएमआर
53) क्रॉसरेल इंटरनॅशनल
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर
Newsworldmarathi Mumbai : संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीचे प्रतीक ठरलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आपले नाव कोरले आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कामकाजाला नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे होता. त्यानंतर आयुक्तपदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि जमीर लेंगरेकर यांची नावे प्रबल दावेदार होती.
मात्र, अखेर गुरुवारी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली. उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिला आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नोंद झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहराच्या प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
प्रेरणादायी प्रवास
मनीषा आव्हाळे यांचे वडील शिक्षणप्रेमी होते. स्वतः उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न त्यांनी आर्थिक अडचणींमुळे सोडले, मात्र मुलगी कलेक्टर व्हावी, असे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. २०१८ मध्ये त्यांनी ३३ वी रॅंक मिळवत देशभरात लौकिक मिळवला. या यशाचे श्रेय त्यांनी वडिलांच्या प्रेरणेला दिले. यूपीएससीच्या तयारी दरम्यान मनीषा यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वडील गंभीर आजारी पडले, तर आईला कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला. मनीषा आव्हाळे यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले.
आई-वडिलांचे आजारपण आणि यूपीएससीची तयारी
माझ्या वडिलांना स्वत: शिकण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या भावांना आणि बहिणींना शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले. उच्चशिक्षित होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिले. इयत्ता चौथीनंतर माझे शिक्षण धुळे, राहता, पुणे अशा विविध शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. पुण्यातील आयएएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी वडिलांनी मला दिल्लीला पाठविले.
पहिल्याच प्रयत्नात मला 833 वी रॅंक मिळाली. मात्र, ही परीक्षा देत असताना माझे वडील आजारी पडले. त्यांना उपचारासाठी अकोल्यावरून पुण्यात आणण्यात आले. तब्बल दोन महिने ते आयसीयूमध्ये होते. मुख्य परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मला माहितीही नव्हते. आठ दिवसांनी मी माझा निकाल बघितला. मुख्य परीक्षेचा अभ्यास एक महिन्यात करून मी परीक्षा दिली. दरम्यानच्या काळात आईलाही कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने यूपीएससी नाही तर आयुष्याच्या परीक्षेला तोंड देऊन रॅंक मिळविला होता. आयुष्यातील हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे यांनी सांगितले.
Newsworldmarathi pune : गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमधील संभाव्य एकत्रिकरणाची चर्चा चांगलीच गाजत आहे. बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने या चर्चांना अधिक बळ दिले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित मंचावर येणं, तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेला संवाद यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तथापि, याबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. शरद पवार यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या भूमिकेबाबत टीका केली होती, त्यामुळे या एकत्रिकरणाच्या चर्चांना राजकीय रंग येणे स्वाभाविक आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना खूप महत्त्व दिलं जातं आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरू शकते.
यानंतर आता आजही अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार ‘प्रेसिडेंट’ असं लिहिल्याला खोलीत शिरताना दिसत आहे. घाईघाईत त्यांनी पीएसोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे.
कार्यक्रमाच्या व्हिडीओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत. आल्यानंतर ते ‘कुठे बसायचं रे’ असं पीएला विचारताना दिसत आहेत. यावर ‘साहेब इकडे आत बसलेत’ असं पीएने सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले. यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
खरं तर, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जातंय. मात्र मागील काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, यासाठी विठुरायाकडे साकडं घातलं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधी दरी कमी झाल्याचं दिसत आहे.
Newsworldmarathi Pune : अन्न व औषध प्रशासन पुणे विभागात कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शितल गजानन घाटोळ याची मुलगी कु. अद्विका हिने इंदौर येथे घेण्यात आलेल्या ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत २०२५ च्या विनर चा किताब पटकाविला आहे. अद्विका ही पुणे येथील बालेवाडीतील एम आय एस इंटरनॅशनल स्कुल मधिल इयत्ता सातवीची विद्याथ्यांनी असून तिला सिरियलची आवड आहे.
यापूर्वीही तिने विविध ठिकाणी पार पडलेल्या नामांकित स्पर्धेत दोन वेळा यश मिळविले आहे. तरुण प्रतिभावतांना फॅशन माडेलिंग आणि अभिनयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी मदत करणारे व्यासपिठ , ज्युनिअर मिस इंडिया २०२५ चा भव्य फिनाले इंदौर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये अद्विका हि भारतातुन प्रथम आली आहे. पुणे येथील फिनिक्स मॉल येथे २२ सप्टेबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये पाच ते तेरा वयोगटातील १०० मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामधुन निवड झालेल्या मुलींचा इंदौर येथील हॉटेल मॅरीयट येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धत अद्विकाने संपुर्ण देशातुन प्रथम क्रमांक पटकावित.
Oplus_131072
महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र असलेली नऊवारी आणि मराठी साज केलेल्या स्त्रिया त्यांच्या मराठमोळ्या लुकने अनेकांचे मन जिंकून घेतात. अद्विकाने देखील सांस्कृतिक कार्यक्रमात मराठमोळी नऊवारी साडी परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
२०२५ (११ ते १३ वयोगट) चा किताब पटकाविला. यावेळी इंटरनॅशनल ब्युटी एज्युकेटर उन्नती सिंग, टीव्ही कलाकार मोनिका खन्ना, कास्टिंग डायरेक्टर शोभा गौरी, टिव्ही कलाकार शिल्पा कटारिया सिंग, गायक व कलाकार हरीश मोयाल आदी जज उपस्थित होते.
जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये ११ प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदतकार्यक केले जात आहे.
११ मृत्यू ४ जण गंभीर जखमी
गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत. तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत. तसेच चार लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ७ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोकांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत.
Newsworldmarathi Pune : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना अभियानाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, मोनिका रंधवे तसेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डूडी यावेळी म्हणाले, बाल लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, बालिकांच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांचे अधिकार आणि विकासाच्या संधी त्यांना मिळाव्यात यासाठी देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बाल लिंग गुणोत्तराचे पुणे जिल्ह्याचे प्रमाण वाढावे याकरिता पुढील सहा आठवड्यांमध्ये सर्व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Newsworldmarathi Pune :शहरात काही भागामध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome – GBS) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रमावस्था आहे. या आजारामुळे रुग्णांवर होणारा परिणाम पाहता त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे असून महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आल्याने पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जावी तसेच पाणी शुद्धीकरण मोहिम राबवावी, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांची भेट घेत केली आहे. नागरीकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे.
रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये GBS साठी स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली
याविषयी बोलताना हेमंत रासने म्हणाले, गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं पुढे आल्याने उकळून घेऊनच पाणी प्यावे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महापालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून टास्क फोर्सच्या माध्यमातून उपायोजना केल्या जात आहेत.
यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे , सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कसब्यातील प्रश्ना संदर्भातही चर्चा….
कसबा मतदारसंघातील विविध प्रश्न संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. कचरा मुक्त कसबा अभियान यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपायोजना. मुख्य रस्त्यांवर असणारी अतिक्रमणे हटवणे, तसेच मतदारसंघात काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने सुरळीत व प्रेशरने पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.