पालकांनी मुलांना वेळ देण्याची गरज : ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर
Newsworldmarathi Pune : समाजात आज विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. शहर असो की ग्रामीण भाग पालकांना मुलांना देण्यासाठी पैसा आहे मात्र वेळ नाही. परिणामी मुलं, मुली नक्की काय करतात, त्यांचे मित्र – मैत्रिणी कसे आहेत याचा आई – वडिलांना पत्ता नसतो. आपलयांवर कोणाचे लक्ष नाही, कुणी आपल्याला काही बोलत नाही यातून युवा पिढीच्या मनामध्ये वाईट प्रवृत्ती वाढीस लागत आहेत. आपल्याला सुसंस्कारी समाज निर्माण करायचा आहे, यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी केले.
श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच संलग्न संस्थेच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे हा महोत्सव सुरु आहे. ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर बोलत होते. यावेळी कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वांजळे, सामजिक कार्यकर्ते भोला वांजळे, रमेश वेडे पाटील (माजी अध्यक्ष), गजानन महाराज जंगले, शरद गडेकर, गणेश काटे, निलेश वाघमारे, संतोष मेदनकर, संजय दांडगे, विजय बोत्रे (माजी अध्यक्ष),बाळासाहेब कदम, दौलत आबा भुजबळ,
संजय पाटील, राहुल येमुल आमोल येमुल, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या आवाजातली दिव्य भक्ति आणि ते ज्या सहजतेने जीवनाच्या गोडीच्या आणि साध्यतेच्या मार्गावर भाष्य करतात, त्यामुळे उपस्थित श्रोत्यांना एक अद्वितीय अनुभव मिळाला. त्यांचं कीर्तन भगवान श्रीराम, श्री कृष्ण आणि विठोबा यांची महिमा गात, भक्तिरसात सर्व श्रोत्यांना तल्लीन करत होते. भक्तिरस आणि भावुकतेने भरलेल्या या कीर्तनात निवृत्ती महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या गजरात ‘रामकृष्णहरी’ चा गजर करत, जीवनातील साधेपणा, प्रेम आणि श्रद्धेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.
तसेच, समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातुन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करताना इंदूरीकर महाराज यांनी मुलांनी आई – वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीर असे दोन्हीचेही नुकसान होते असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजित करा : सुनील माने
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दावोस येथे होणाऱ्या जागतिक अर्थ परिषदेत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादिवशी केलेल्या करारांमध्ये बहुतांश कंपन्या भारतीय असल्याचे दिसून येते. भारतीय कंपन्यांशी दावोस मध्ये करार करण्यापेक्षा ‘व्हायब्रंट गुजरातच्या’ धर्तीवर महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजित करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक बोलताना माने म्हणाले, महाराष्ट्र सध्या आर्थिक विपन्नावस्थेत आहे. राज्य सरकारने २०२३-२४ मध्ये ८२,०४३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचा कर्जाचा बोजा ७.११ लाख कोटीवर नेऊन ठेवला आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी करण्यात आला आहे. ९६,००० कोटींच्या अतिरिक्त भारासह महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत आणखी बिकटता येऊ शकते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक होती म्हणून हात ढिला सोडला होता, त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. पुढील पाच वर्ष काटेकोरपणे आर्थिक नियोजन करावे लागेल अशी कबुली दिली आहे. त्यामुळे राज्याला दावोस दौरा परवडण्यासारखा आहे का ? याचा सरकारने विचार केला पाहिजे.
महाराष्ट्रात रोजगार वाढीसाठी परकीय गुंतवणूक आवश्यकच आहे. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र दावोसमध्ये केले जाणारे गुंतवणूक करार प्रामुख्याने भारतीय कंपन्या आणि भारतीय उद्योजक यांच्याबरोबर केल्याचे दिसत आहे. असे करार करण्यासाठी दावोसला जाण्यापेक्षा मुंबई किंवा पुण्यात हे करार करता येतील. कारण या कंपन्या मुंबई-पुण्यात नक्कीच येऊ शकतात. पुढील वर्षी राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा.
गुजरातमध्ये दरवर्षी जागतिक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी यासाठी व्हायब्रंट गुजरात म्हणून भव्य कार्यक्रम घेतला जातो. तसा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम महाराष्ट्रात का होत नाही. गुजरातमध्ये गुंतवणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी तर मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहीम कमी करण्यात आली नाही ना अशी शंका या निमित्ताने येते. मुख्यमंत्र्यांनी यापुढेही गुंतवणुकीचे धोरण निश्चितपणे आक्रमक पद्धतीने राबवावे त्यासाठी आम्ही सर्व पाठिंबाच देऊ मात्र मॅग्नेटिक महाराष्ट्र दिमाखात सुरू करून खरोखरची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येईल असे काम करण्याची आवश्यकता असल्याचे माने यांनी म्हटले आहे.
इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना खेळणी व खाऊ वाटप
Newsworldmarathi Pune : इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या वतीने आज बालवाडीच्या ५० मुलांना पौष्टिक खाऊ वाटण्यात आला, तसेच साने गुरुजी प्राथमिक शाळेस आठ हजार किंमतीची दर्जेदार खेळणी भेट म्हणून देण्यात आली.
क्लबच्या सदस्या मंजुश्री उपासनी ह्यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अमेरिकेत वास्तव्य असणारा मुलगा अभिषेक ह्याने ही भेट दिली. ह्यावेळी मुख्याध्यापिका मीना काटे यांनी क्लबच्या अध्यक्षा प्रिती शिरुडकर ,मंजुश्री उपासणी आणि अभिषेक यांचा सत्कार व शाळेच्या वतीने स्वागत केले. इनरव्हील क्लब सदस्या संगिता गोवळकर , सोपान बंदावणे, मोनिका पोटे, शीतल रूपनूर, नीशा नाईकनवरे उपस्थित होते.
सदर खेळणी आणि खाऊ पाहून या बालचमूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी चिरंजीव आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
पुण्यात दिवसाढवळ्या दहशत; महिलेचे मंगळसूत्र हिसकावलं!
पुण्यातील कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत.कोथरूडमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. कर्वेनगरमध्ये एका सोसायटीच्या आत प्रवेश करून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली.
या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून दोन्ही घटनांची चौकशी सुरू असून चोरट्यांचा तपास केला जात आहे.
पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावल्याची (Crime News) घटनी घडली आहे. पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेऊन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले आहे. वृध्द महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे शक्य नव्हते.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी ता-22) सकाळी 6.42 वाजता ही घटना घडली आहे. नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्या जेष्ठ महिलांचे खुलेआम मंगळसूत्र चोरून (Crime News) हिसकावून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला. चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता या ठिकाणी व्यक्त होते आहे.
जिल्हा परिषदेतील मोठी कारवाई; कनिष्ठ अभियंता अक्षय झारगड निलंबित!
Newsworldmarathi Pune : जिल्हा परिषदेने जनसुविधाअंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसातील दुसरी कारवाई आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई करून आणखी एक दणका दिला आहे. बांधकाम विभागामध्ये अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या चौकशी सुरू आहेत मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या प्रलंबित ठेवून एक प्रकारे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
झारगड हे बारामती पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वाघळवाडी येथे जनसुविधा अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते, ते काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तसेच संपूर्ण कार्यवाही ही कनिष्ठ अभियंता म्हणून झारगड यांच्याकडे होती
काका-पुतण्या पुन्हा येणार एकाच व्यासपीठावर
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी, 23 जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.
कार्यक्रमादरम्यान वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासह अन्य पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमावर सहकार आणि साखर क्षेत्रातील व्यक्तींनी लक्ष ठेवले आहे, कारण हा कार्यक्रम सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे संकेत देऊ शकतो.
सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण, राज्यस्तरीय ऊसभूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊसविकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
सन 2023-24 वर्षामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 13 सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यांतील अधिकाऱ्यांना वैयक्तिक सात बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाच वैयक्तिक बक्षिसे या वेळी देण्यात येतील, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ आजपासून तीन दिवस बंद राहणार
Newsworldmarathi Mumbai : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील डोंगरगाव/कुसगाव येथे गर्डर्स बसविण्याच्या कामामुळे वाहतुकीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत असेल. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. तरी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या वेळेत प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करावे, तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डोंगरगाव/कुसगाव येथे गर्डर्स बसविण्याच्या कामामुळे 22, 23, आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. वळवण (किमी 54/700) ते वरसोली टोल नाका मार्गे ही वाहतूक देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवली जाईल. दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा एक्सप्रेसवेच्या पुणे वाहिनीवरून सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेसवेवर नियमितपणे सुरू राहणार आहे. प्रवाशांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रवासाचे नियोजन करावे.
एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.
पुणेकरांनो काळजी घ्या! पुण्यात ‘गुलेन बेरी सिंड्रोम’ आजाराचे 22 रुग्ण
Newsworldmarathi Pune : पुण्यामध्ये एका रहस्यमयी आजाराचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजाराचं नाव ‘गुईवेल सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome) असं आहे. पुण्यात ‘गुलेन बेरी सिंड्रोम’चे 22 संशयित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे म्हणजेच आयसीएमआरकडे या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘गुलेन बेरी सिंड्रोम’ संदर्भातील वेगळा कक्ष महापालिकेने स्थापन केला आहे.
‘गुलेन बेरी सिंड्रोम’संदर्भात ‘एनआयव्ही’ इंस्टिट्यूट म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहे त्या भागात महापालिकेकडून टीम नियुक्त केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘गुलेन बेरी सिंड्रोम’ हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. म्हणजेच हा मज्जासंस्थेशीसंबंधित एक आजार असून तो एक लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळून येतो. वेगळ्या पद्धतीच्या लसी घेतल्या असतील किंवा ‘एच वन एन वन’च्या लस घेतली असेल तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गुलेन बेरी सिंड्रोमचे निदान करण्यासाठी ‘स्पाइनल फ्लूड’ची चाचणी केली जाते. ‘गुईवेल सिंड्रोम’वरील उपचार हे महागडे असून यामध्ये उपाय म्हणून ‘प्लाजमा एक्सचेंज’सारखी पद्धत वापरली जाते. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नाही. सध्या पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरात एकणू 6 रुग्ण आहेत. तर उर्वरित 16 रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील इतर वेगवेगळ्या भागांमधील आहेत. यासंदर्भातील माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे
पुण्यात आढळून आलेले 6 रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. त्यामुळे सर्वच रुग्ण हे पुणे शहराच्या बाहेरील आहेत, असं स्पष्ट होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा आजार संसर्गजन्य नसल्याने त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या पुण्यामधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांची तपासणी केली जात आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये ‘गुलेन बेरी सिंड्रोम’चे हे रुग्ण होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
निःस्वार्थ सेवा हाच खरा धर्म : शिवाजीभाऊ गदादे-पाटील
Newsworldmarathi Pune : गेली 35 वर्षे पर्वती आणि जनता वसाहत परिसरात निस्वार्थीपणे काम करताना मिळालेल्या समाधानाचा उल्लेख करताना सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे यांनी त्यांच्या कार्याची दिशा आणि उद्देश स्पष्ट केला आहे. त्यांनी सांगितले की, या भागाचा विकास, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि परिसराचा कायपालट घडवून आणणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम केले. गदादे परिवार हा नेहमी समाजकारणाशी जोडलेला असून, निस्वार्थी सेवा हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख सूत्र राहिले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे विशेषतः माता भगिनींचे प्रेम व पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त हळदी कुंकू आणि वाण वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजीभाऊ गदादे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. जवळपास 15 ते 20 हजार महिलांना यावेळी वाण वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.
माजी नगरसेविका प्रिया गदादे पाटील म्हणाल्या, हा कार्यक्रम माझी आई स्वर्गीय छायाताई यांनी सुरु केला. महिलांना यातून एक समाधान आनंद आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम सुरु केला. आज 20 वर्ष झाले या कार्यक्रमाला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. इथून पुढेही महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे म्हणाले, आई वडिलांमुळे मला समाज कार्याची प्रेरणा मिळाली आज या परिसरातील नागरिकांची एक नातं जोडलं आहे. हळदी कुंकू हे निमित्त आहे पण नागरिकांचे प्रेम पाहून आनंद वाटतो. इथून पुढेही या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार..
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. जवळपास 15 ते 20 हजार महिलांना यावेळी वाण वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.
माजी नगरसेविका प्रिया गदादे पाटील म्हणाल्या, हा कार्यक्रम माझी आई स्वर्गीय छायाताई यांनी सुरु केला. महिलांना यातून एक समाधान आनंद आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम सुरु केला. आज 20 वर्ष झाले या कार्यक्रमाला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. इथून पुढेही महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे म्हणाले, आई वडिलांमुळे मला समाज कार्याची प्रेरणा मिळाली आज या परिसरातील नागरिकांची एक नातं जोडलं आहे. हळदी कुंकू हे निमित्त आहे पण नागरिकांचे प्रेम पाहून आनंद वाटतो. इथून पुढेही या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार..
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महापालिका निवडणूक होणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
Newsworldmarathi Pune : महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील उद्या बुधवारी (दि. 22) सुनावणी होणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांच्या निवडणुका प्रदीर्घ काळापासून रखडल्या आहेत. प्रामुख्याने महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना, लोकसंख्येत 10 टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्यसंख्या आणि ओबीसी आरक्षण, यावर तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी उद्या बुधवारी होणार होती.
मात्र, बुधवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावण्यांच्या यादीत या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. येत्या 28 जानेवारीला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, सुनावणी लांबल्याने त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होणार असून, येत्या एप्रिल-मे महिन्यात महापालिकांच्या होणाऱ्या अपेक्षित निवडणुकाही लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इच्छुकांमध्ये नाराजी:
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यातच महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुमतामुळे हे सरकार तातडीने निवडणुकांसाठी प्रयत्नशील आहे, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र सरकारकडून निवडणुका घेण्यासाठी तातडीने कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इच्छुकांची निराशा होत आहे.
नव्याने प्रभागरचना कराव्या लागणार:
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार प्रभागरचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली. आत्ता पुन्हा चार सदस्यीय प्रभागरचना नव्याने करावी लागणार आहे. 2017च्या रचनेनुसार प्रभागरचना कायम ठेवण्याचा निर्णय झाला, तरी पुणे महापालिकेत 2017 नंतर उरुका देवाची व फुरसुंगी वगळून 32 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे किमान पुणे महापालिकेत तरी नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
…तर निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
प्रभागरचना करणे, त्यावर हरकती-सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभागरचना, यासाठी किमान 90 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जानेवारीअखेरपर्यंत निवडणुकांसंदर्भात निकाल न लागल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर- ऑक्टोबरमध्येच घ्याव्या लागतील, अशी परिस्थिती आहे.

