पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे : केंद्रीय राज्यमंत्री आठवले

0
Newsworldmarathi Pune : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका पार पडतील अशी शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीत मागच्या वेळी आम्हाला 5 जागा मिळाल्या होत्या. आता महायुती असली तरी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणकोण भाजप सोबत राहतील यात शंका आहे. मात्र आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष असल्याने आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महापौर पद अनुसूचीत जातीसाठी आरक्षित असल्यास ते आरपीयआय ला मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण, विरेन साठे, श्याम सदाफुले, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना आठवले म्हणाले, पुणे शहरात जागोजागी आमच्या शाखा आहेत. त्यामुळे भाजप ने जरी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना पुणे महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आमच्या शिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महायुती मध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून वाद सुरू असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश मार्गी लावतील असे सांगत, राज्य मंत्रिमंडळात जी एक जागा रिक्त आहे त्याजागेवर आरपीआय ला मंत्रिपद द्यावे अशी मागणीही आठवले यांनी केली.

माजी खासदाराच्या मुलाच्या आत्महत्येने खळबळ

Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यातून राजकारणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी माजी खासदाराच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अजून समोर आलं नाही. मंचर येथील माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव विकास बाणखेले यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंचर पोलिसांनी रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुमित मोरे करत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत माहिती अशी की, विकास किसनराव बाणखेले सकाळी गावात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. तेव्हा सगळं काही ठीक होतं. नंतर ते जेवणासाठी साडेअकरा वाजता आले नसल्याने त्यांचे बंधू बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. नंतर मात्र आवाजाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता विकास यांनी एका वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचलले याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. घटनास्थळी मंचर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येबाबत कोणते आर्थिक किंवा इतर कारण होते का? असा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र एकच धक्का अनेकांना बसला आहे.

‘जीबीएस’ आजारावर त्वरित उपाययोजना करा; काँग्रेसची मागणी

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात दूषित पाण्यामुळे वाढणाऱ्या Guillain-Barré Syndrome (GBS) च्या प्रकरणांवर त्वरित मोफत उपचार व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली महापालिका आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः सिंहगड रोड आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये दूषित पाण्यामुळे Guillain-Barré Syndrome (GBS) या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत 67 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दूषित पाण्यात norovirus आणि campylobacter bacteria आढळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या स्थितीत त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्व रुग्णालयांमध्ये GBS रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधोपचाराची तातडीने व्यवस्था करावी, उपचारासाठी लागणाऱ्या IVIG डोस आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, दूषित पाण्याचा मूळ स्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जलतपासणी मोहीम हाती घ्यावी, नियमितपणे प्रभावित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेचे निरीक्षण करावे, जलप्रदूषणासाठी जबाबदार व्यक्ती, संस्था किंवा कारखान्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक पावले उचलावीत, दूषित भागांमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सेवा उपलब्ध करून द्यावी, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन व फिल्टर सुविधा नागरिकांना वितरीत कराव्यात, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी या शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, ओबीसी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, पीएमटी चेअरमन शेखर कपोते, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव चेतन अग्रवाल, अनिकेत सोनवणे उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी संदर्भातली तपासणी करून योग्य त्या सूचना करण्याचे त्वरित अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ असे अश्वस्थ केले.

मराठी बाल साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने सुरुवात

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने दिमाखदार सुरुवात झाली. चाळकवाडी लगतच्या महामार्गापासून सुरू झालेली ग्रंथदिंडी गावातून फिरून कविवर्य ग. ह. पाटील बालसाहित्य नगरीत (संमेलनस्थळी) आली. महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‌‘ज्ञानदेव-तुकाराम‌’ नामाचा गजर करत ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांनी ‌‘वाचन संस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी‌’, ‌‘ग्रंथ हेच गुरू‌’, ‌‘जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक‌’, ‌‘ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती‌’ असे फलक घेऊन वाचन संस्कृतीचा जागर केला. विद्यार्थ्यांच्या लेझीम-ढोल पथकाचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन झाले. शिवांजली प्राथमिक विद्यालय, शिवांजली विद्यानिकेतन, शिवाजी विद्यार्थी वसतीगृह, न्यू इंग्लिश स्कूल, आंबोडी, मारोतराव लांडगे विद्या निकेतन, कळंब, जि. प. प्राथमिक शाळा, चाळकवाडी, कोळवाडी, पिंपळवंडी, सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी, विशाल जुन्नर सेवा मंडळ शैक्षणिक संकुल, कांबळी या शाळांमधील विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. संमेलनस्थळी ध्वजारोहण संमेलनाध्यक्ष सूर्यकांत सराफ, अनिल मेहेर, शरद लेंडे, माधव राजगुरू, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, श्रीकांत चौगुले, संजय ऐलवाड, राजेंद्र चौगुले, मुरलीधर साठे, अशोक सातपुते, सचिन बेंडभर, मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, एकनाथ आव्हाड, मिलिंद कसबे, अनिल काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनस्थळी ध्वजारोहण झाले. आत्मनिर्भरतेसाठी शिक्षण-साहित्य आवश्यक ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात अनिल मेहेर म्हणाले, साहित्यकलेचा आविष्कार, अभिरूची व्यक्त केली जाते त्यामागे साहित्यिकाची विशिष्ट भूमिका असते. राष्ट्र उभारणीसाठी, आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी शिक्षणाची व त्याला जोड म्हणून साहित्याची आवश्यकता आहे. बालसाहित्याविषयीची रुची मुलांमध्ये वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालसाहित्यिक, बालकवी मुलांच्या मनावर संस्कार करत असतात, त्यांची जडणघडण करण्याचे कार्य करीत असतात. संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी भाषा आणि साहित्याची जपणूक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी साहित्य चळवळ राबवावी. प्रास्ताविक माधव राजगुरू यांनी केले. आभार शरद लेंडे यांनी मानले. सुरुवातीस भोसले आणि मंडळींनी समतेचा गोंधळ सादर केला. सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले. फोटो ओळ : ग्रंथदिंडीच्या शुभारंभप्रसंगी संमेलनाध्यक्ष व संस्थेचे पदाधिकारी.

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune :मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी (ता. २३) रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांच्यामागे दोन कन्या,जावई,नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनानं पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीनं मांडणारा तसंच शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला, लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी सात दशकांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. रामभाऊ जोशी यांच्या निधनानं ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशी भावना अजित पवार यांनी ज्येष्ट पत्रकार जोशी यांच्या निधनावर व्यक्त केली आहे. रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांची कारकिर्द परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले. पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव मध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या इमारतीसाठी त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी सन १९५० मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला आणि त्यानंतर पुणे येथे सायं. दैनिक ‘लोकराज्य’, दै. संध्या, दैनिक केसरीत उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक, अशा विविध पदांवर काम केले. १९६५ च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी ते केसरीचे प्रतिनिधी म्हणून पंजाबमध्ये दाखल झाले होते. तसेच, बांगला युद्धाच्या वेळी त्यांनी कलकत्त्याकडे धाव घेतली होती. अहमदाबाद, जळगाव, भिवंडी, औरंगाबाद, मुंबई वगैरे ठिकाणी जेथे जेथे जातीय दंगली उसळल्या तेथे प्रत्यक्षात जाऊन पत्रकारितेची भूमिका चोखपणे पार पाडली होती. यासोबत त्यांनी पत्रकार संघटनांच्या कार्यातही आपला सहभाग नोंदवला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सलग चार वर्षे अध्यक्ष, तसेच इंडियन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट या अ.भा.संघटनेच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

न्याती ग्रुपसोबत करा कल्याणीनगरमध्ये लक्झरी आयुष्याची सुरुवात

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील बहुमानांकीत रिअल इस्टेट ब्रँड, न्याती ग्रुपने १९ जानेवारी रविवार रोजी, कल्याणी नगरामध्ये, बहुप्रतीक्षित आलिशान निवासी प्रकल्प न्याती इवोकचे अनावरण केले. या भव्य उद्घाटन समारंभाने प्रत्येक संवेदनांना मोहित करत, एक नेत्रदीपक सोहळा साकारला. प्रतिष्ठित व्यावसायिक, प्रभावशाली राजकीय नेते, प्रसारमाध्यमातील दिग्गज आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकींच्या सहभागाने हा कार्यक्रम उजळून निघाला. सदर कार्यक्रम हा बोहो थीमवर आधारित होता. पाहुण्यांचे स्वागत लाईव मोहक व्हायोलिन वादनाने करण्यात आले, जे नंतर पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा उत्कृष्ट समन्वय सादर करत एका जोशपूर्ण डीजेच्या तालांमध्ये रुपांतरित झाले. पाककृतींच्या दृष्टिकोनातूनही या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रभावित केले, ज्यामध्ये उत्कृष्ट डेझर्ट, हाय-टीचे पदार्थ आणि मॉकटेल्सच्या रूपाने एक अप्रतिम मेजवानी होती. न्याती इवोकमध्ये आपले स्वप्नातील घर विकत घेणाऱ्या लोकांचे स्वागत न्याती इवोकचे भावी रहिवाशांच्या रूपात केल्याने तसेच आपल्या इतर भावी शेजाऱ्यांना भेटल्याने काही भावनिक क्षण निर्माण झालेत. न्याती ग्रुपच्या कम्युनिटी-फर्स्ट तत्त्वज्ञानाचा हा सुंदर पुरावा होता. कृतज्ञतेच्या भावनेने आणि प्रेरणेने, प्रत्येक बुकिंग गिफ्ट पाच संवेदनांवर आधारित थीमला अनुसरून विचारपूर्वक तयार करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण प्रसंगी अध्यक्षस्थानी न्याती ग्रुपचे दिग्गज होते – डॉ. नितीन न्याती, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक; श्री. हरीश श्रॉफ, विक्री, विपणन आणि व्यवसाय विकास संचालक; आणि श्री. प्रणव न्याती, कार्यकारी संचालक. एकत्रितपणे, त्यांनी शांतता आणि भव्यतेच्या सुसंवादाचे प्रतीक असलेल्या न्याती इव्होक प्रकल्पासाठी त्यांचे दृष्टिकोन सामायिक केले. न्याती इवोक, न्याती ग्रुपच्या समृद्ध पोर्टफोलिओतील एक अनमोल रत्न आहे, जे आलिशान जीवनशैलीची नवी व्याख्या निर्माण करते. दोन २७ मजली गगनचुंबी इमारतींचा समावेश असलेल्या या गेटेड कम्युनिटीत प्रति मजला केवळ चार अपार्टमेंट्स उपलब्ध आहेत, जे खाजगीपणा आणि विशेषत्व सुनिश्चित करतात. कल्याणी नगरातील शांत परिसरात वसलेले हे आश्रयस्थान आहे, जे तुमच्या संवेदनांना जागृत करण्यासाठी आणि मनाला शांतता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. २७+ वर्षांची समृद्ध परंपरा, ६८+ भव्य प्रकल्प, आणि १४,०००+ कुटुंबांना आलिशान जीवनशैली देणाऱ्या न्याती ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात अतुलनीय मापदंड स्थापित केले आहेत. न्याती इवोक फक्त एक घर नसून, एक अनुभव, एक आश्रयस्थान, आणि एक उत्कृष्ट नमुना आहे, जो आलिशान जीवनशैलीचे नवे परिमाण सादर करतो. न्याती इवोकच्या अनावरणासह, न्याती ग्रुपने पुन्हा एकदा वास्तुकलेच्या उत्कृष्टतेसह बेजोड आलिशानतेचे प्रतीक निर्माण करण्याची आपली निष्ठा दाखवली आहे. हा प्रकल्प केवळ निवासी प्रकल्प नसून, एका परिष्कृत जीवनशैलीकडे जाण्याचा मार्ग आहे – जिथे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक डिझाइन केली गेली आहे. न्याती इवोक जिथे स्वप्नांना त्यांचे परिपूर्ण घर मिळते, आणि उत्कृष्ट जीवनशैलीची नवी कहाणी सुरू होते.
Oplus_131072

मराठी माणसाच्या नादाला लागू नका : उद्धव ठाकरे

0
Newsworldmarathi Mumbai : “मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है?” असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह परत उद्या येताय त्यांचा समाचार तर घेणार,मी सोडणार नाही.पाठीत वार केला की वाघ नखं आम्ही काढू..मिठी मारली तर प्रेमाने मारू दगाबाजी केली तर वाघनखं काढू…1978  साली पुलोदच्या दग्गाबाजीमध्ये भाजप सुद्धा होता… त्याला खतपाणी तुम्ही दिला त्यात चेंबूरचे हशू अडवणी सुद्धा होते. दग्गाबाजीचे बीज तुमच्यात आहेत अमित शाहजी..90 हजार RSS चे लोकं आता कामाला येणार आहे का? तो रक्तदान करेल कीं गोमूत्र दान करेल? असा सवालही उद्धव ठाकरे म्हणाले पहिली पोटनिवडणूक 1987 साली लढली, ती देशातील हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढलेली पहिली निवडणूक होती. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने होते. गुजरातमधून शंभू महाराज होते. त्यावेळी बाळासाहेबांची स्पष्ट भूमिका आहेत. पाकिस्तान धार्जिणा मुस्लिम आमचा नाही.

पुण्यातील उच्चशिक्षित रुपाने जयपूरमध्ये आयुष्य संपवलं

Newsworldmarathi Pune : पुण्यातील एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंग झाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. विष प्राशन करुन तृतीयपंथीयाने आपल्या आयुष्याची अखेर केली. रुपा देवी माहेश्वरी (सारंग पुणेकर पूर्वाश्रमीचे नाव) असे त्यांचे नाव असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या. रुपा माहेश्वरी या सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुण्यात काम करत होत्या. पुण्यात त्यांनी अनेक आंदोलन आणि सामाजिक कार्य केलं आहे. नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांसाठी हिजडा शब्दाचा प्रयोग केल्यानंतर बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या समोर रस्ता रोखत त्यांनी आंदोलनही केलं होतं. रूपा यांनी प्रियकराच्या घरापासून अगदी काही अंतरावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. रूपा यांचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्याच परिसरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आणि कीटकनाशकाची रिकामी बॉटलही सापडली. त्यामुळे या प्रकरणाची आता पोलिसांनी देखील दखल घेतली आहे रुपा माहेश्वरी या उच्चशिक्षित आणि कवयित्री होत्या. जयपूर येथील एका तरुणासोबत त्यांचे प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. दोघांमध्ये परस्पर संमतीने प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या तीन ते चार वर्ष हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रुपा नेहमी जयपूरला जात असे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांची भेट झाली नव्हती. रूपा यांच्या प्रियकराचं वागणं बदलल्याची त्यांची तक्रार होती. आपला मुलगा एका तृतीयपंथीयाच्या प्रेमात असल्याचं कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला रुपा यांच्याशी बोलणं बंद करायला सांगितलं. तेव्हापासून प्रियकर रुपाशी बोलत नव्हता. हाच विरह सहन न झाल्याने १३ जानेवारीला रूपा जयपूरला पोहोचल्या. तिथे प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास त्याची वाटही पाहिली. मात्र तो बाहेर आलाच नाही. त्यामुळेच रूपा यांना नैराश्य आलं

दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार

Newsworldmarathi Team : दावोसमधील (स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने पुण्यातील रूरल एन्हान्सर्स संस्थेशी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा क्रेडिट लाईन सामंजस्य करार केला. आरोग्यसेवा, रुग्णालय, पायाभूत सुविधा, बंदरे व सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण असून, मुख्यमंत्री फडणवीस व संस्थेचे प्रमुख अंबर आयदे यांनी करार आदानप्रदान केला. महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठी, तसेच पुण्यासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असल्याचे केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करताना म्हटले आहे. राज्य शासनाच्या वतीने परकीय गुंतवणूक विभागाचे सचिव कौस्तुभ धावसे यांच्या पुढाकारातून नेदरलँड येथील शासकीय संस्थांचा त्रिपक्षीय करार झालेला आहे. यावेळी कौस्तुभ धावसे, राज्य शासनाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, एमआयडीसी विभागाचे सचिव पी. वेलारसू, नेदरलँड शासनामार्फत एडविन सीएसवरदा, रुरल एन्हान्सर्स समूहाचे चेअरमन इन डेस्क सुब्रह्मण्यम येडावली, मुख्यमंत्र्यांचे सहायक जयंत येरवडेकर उपस्थित होते. अंबर आयदे यांच्या संस्थेला राज्य शासनामार्फत दावोस येथे उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण देण्यात आलेले होते. अंबर आयदे म्हणाले, “ही गुंतवणूक पुढच्या दोन वर्षांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्था, राज्य शासनासाठी लागणारी ॲम्बुलन्स व्यवस्था, पुण्यातील लोहगाव येथील पोलीस बांधवांचा रखडलेला गृहप्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी आणि महाराष्ट्र राज्य शासनाची बंदरे, शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्याच्या दृष्टीने उपयोगात आणण्यात येणार आहे. यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून भारतातील पहिली ईसीए आधारित गुंतवणूक पुणे महापालिकेसोबत वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी २०२३ करण्यात आलेली आहे. हे हॉस्पिटल २०२७ मध्ये पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ईसीए आधारित भारतातील पहिली आर्थिक परिषद घेण्यात येणार आहे.” कौस्तुभ धावसे म्हणाले, रुरल एन्हान्सर्स संस्थेचे अंबर आयदे हे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षी ‘कंट्री डेस्क’ या परकीय गुंतवणूक बघणाऱ्या टीमचे सदस्य आहेत. २०२१ पासून महाराष्ट्रात ईसीए गुंतवणूक कशी आणता येईल यावर ते काम करत आहेत. दावोसमध्ये झालेल्या १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारामुळे राज्याला मोठा फायदा होणार आहे.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune : लोकप्रतिनिधी हा नागरिकांच्या तक्रारी सोडवणे इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्याने नागरिकांना भेटून त्यांची मत जाणून घ्यावीत अणि यातून नागरिकांशी संवाद कायम ठेवावा ही सर्वसामान्यांची अपक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच पुण्यात दर महिन्याला “खासदार जनसंपर्क सेवा अभियान राबवण्यात येत आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या या अभियाना पुणेकरांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघात झालेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानात अधोरेखीत झाले. पुणेकरांनी आपला खासदार म्हणून मोहोळ यांची भरघोस मताधिक्याने निवड केली. त्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी खासदार जनसंपर्क सेवा अभियान सुरू करण्यात आले. यात खासदार मोहोळ यांच्यासह मतदारसंघाचे आमदार, माजी नगरसेवक असे स्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतात.याची सुरूवात कोथरूड मतदारसंघातून झाली. आतापर्यंत कोथरूडसह कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. हा कार्यालय तास-दोनतासांचा कार्यक्रम असणार या समजुतीला सुरूवातीपासून छेद दिला गेला. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच ते सहा तास म्हणजे अखेरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याचे समाधान करूनच कार्यक्रमाची सांगता प्रत्येक मतदार संघात झाली. या ठिकाणी महानगरपालिका, राज्य शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांच्या तक्रारी किंवा सूचना खासदार पहिल्यांदा ऐकून, त्यावर त्यांना योग्य अधिकाऱ्याकडे पाठवतात. तक्रारीचा निपटारा जागेवरच करण्यावर त्यांचा भर असतो. केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांची महिती तेथे उपस्थित राहणार असलेले भाजपचे कार्यकर्ते करून देत नागरिकांकडून अर्ज भरून घेतात. सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना करण्यासाठी कार्यकर्ते राबत असतात. नागरिकांच्या चहा, पाणी, नाष्टा किंवा जेवण याचीही काळजी अभियानस्थळी घेतलेली असते. या अभियानात केवळ तक्रारी सोडवल्या जात नाहीत तर नागरिकांचे कोणत्याही सार्वजनिक हिताच्या सूचना, संकल्पना ऐकून घेतल्या जातात. त्याची लिखीत नोंद घेतली जाते. चांगल्या संकल्पना लेखी स्वरूपात मांडण्याची संधी नागरिकां इथे दिली जाते. तसेच प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. शासनाच्या कामाचीही महिती देण्याचा संधी या अभियानात मिळते. त्यातून नागरिकांचे गैरसमज दूर केले जातात. खासदार जनसंपर्क सेवा अभियानाबद्दल खासदार मोहोळ म्हणाले की, ‘हे अभियान प्रामुख्याने मतदारांशी संवाद साधण्यासाठीचे अभियान आहे. प्रत्यक्ष अभियानावेळी जे करता ते कार्यालयात बसूनही करणे शक्य होते. पण एकाच वेळी संपूर्ण मतदार संघातून नागरिक आले तर प्रत्येकाला फार वेळ देता येत नाही. म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथे नागरिकांशी संवाद साधण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांची संख्या मर्यादित राहते आणि आलेल्या प्रत्येकाशी बोलताही येते. ‘प्रशासन व नागरिक आमनेसामने असल्याने तक्रारींचा लवकर निपटारा जागीच करता येतो. यातून नागरिकांना मिळणारे समाधान आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी जास्त महत्वाचे आहे. आमचे लोकप्रतिनिधी भेटतच नाहीत या तक्रारीची संधी देऊ इच्छित नाही. या निमित्ताने कार्यकर्त्याशीही बोलता येते. शासन व प्रशासनाबद्दल नागरिकांच्या भावना समजतात. त्याचा उपयोग पक्षसंघटनेलाही होतो असा अनुभव आहे’, असेही मोहोळ म्हणाले