Newsworld marathi Mumbai : गुरुवारी नव्या सरकारचा 5 डिसेबर रोजी शपथविधी होणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. स्पष्ट बहुमत असून देखील अजूनही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाहीये. नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार यासंदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. अखेर आता तारीख समोर आली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ यश मिळालं. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. जरी नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असली तरी देखील अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यापूर्वीच शपथवीधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पुणेकर अनुभवतायत गुलाबी थंडी
Newsworld marathi Pune : पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. रात्री तापमान घसरलेले असताना दिवसाही हुडहुडी जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस पुण्यातील तापमानात घट होत राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. पुण्याच्या भोरमध्ये तापमानात घट झाल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या गेल्या आहेत. बोचऱ्या थंडीत धुक्याच्या वातावरणात उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत आहे. तापमानात चांगलीच घट झाल्याने नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेराज्यभरातील अनेक शहरांच्या किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. राज्यात पुण्याच्या तपमानाने या वर्षाचा निचांक नोंदवला. पुण्याचे तापमान ९.९ अंशावर आले. मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदवले गेले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री?
Newsworld marathi Mumbai : महाराष्ट्र राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही. ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती भाजप नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतील बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आला होता, मात्र अद्याप कोणत्याही नावाची घोषणा हाय कमांडकडून करण्यात आलेली नाही. दिल्ली येथील हाय कमांडकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच, पुन्हा एकदा शिंदे यांचे नाव चर्चेत आलं आहे.
ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा- अजित पवार
Newsworld marathi Pune : विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. इतकचं नाही तर महाराष्ट्रातील 22 पेक्षा जास्त उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा असे आव्हानच अजित पवार ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा यांनी विरोधकांना दिले आहे.बाबा आढाव यांनी पुण्यात EVM विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी अजित पवारांनी विरोधकांनी चॅलेंज दिले. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. EVM घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिले आहे.निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिलय. 3 डिसेंबरला दिल्लीत चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आलय. विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे काँग्रेसच्या शंका निरसन करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहेआमच्या 17 जागा आल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझ्या उमेदवार पराभूत झाल्या. जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे असे अजित पवार म्हणाले. आपलं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आंदोलन करत आहेत. बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी निवडणूक आयोग, कोर्ट यांच्याशी संबंधित आहेत. लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मावीआच्या 31 जागा आल्या.
अभिनेत्री रेश्मा शिंदे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात
Newsworld marathi Mumbai : मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री रेश्मा शिंदे अखेर पवनबरोबर लग्नगाठ बांधत अडकली. थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमुळे रेश्मा घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेश्मा नेमकं कोणाशी लग्न करतेय याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत आज रेश्मा आणि पवन साता जन्माचे सोबती झाले आहेत. अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या नवऱ्याने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
‘या’ देशात पर्यटकांना भाड्याने बायका दिल्या जातात?
Relationship : कल्पना करा की… तुम्ही एखाद्या अज्ञात देशात गेला आहात आणि तुम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नाही. अशात तुम्ही स्वतःसाठी मार्गदर्शक शोधाल. पण जगात एक असा देश आहे जिथे पर्यटकांना बायका दिल्या जातात. पर्यटक त्यांच्या पसंतीच्या महिलेला काही काळ पत्नी म्हणून ठेवतात आणि तुमची ट्रीप संपल्यानंतर तिला घटस्फोट देतात. याला Pleasure Marriage म्हणजेच ‘सुखविवाह’ म्हणतात.आंतरराष्ट्रीय देशात Pleasure Marriage चा ट्रेंड सुरु आहे. दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आनंद विवाहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे विशेषतः इंडोनेशियामध्ये खूप पाहिले जाते. लॉस एंजेलिस टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इंडोनेशियामध्ये आनंद विवाह हा एक मोठा उद्योग बनला आहे. अनेक स्त्रिया आपला उदरनिर्वाह आणि पैसे कमवण्यासाठी सुखविवाहाचा भाग बनतात. यामुळे इंडोनेशियाच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.
Pushpa 2: पुष्पा 2 सेन्सॉरच्या कात्रीत!
Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा’पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2 ) हा यंदाच्या वर्षातला मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझर आला, ट्रेलर आला… आता चाहते चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे.पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी आता पुष्पा २ सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. केवळ ४ दिवस राहिलेले असताना सेन्सॉर बोर्डानं पुष्पाच्या सीन्सवर कात्री लावत काही महत्वाचे बदल करण्यास सांगितले आहेत. गुरुवारी सेन्सॉर बोर्डानं पुष्पा २ चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात आले.
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात – जानकर
Newsworld marathi Mumbai : अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता. यंदाच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. अशातच महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि फडणवीस सरकारमध्ये पशुपालन मंत्री राहिलेले महादेव जानकर यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. तसंच ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसंच स्वपक्षातील आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही जानकरांनी इशारा दिला आहे.महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यावर बोलताना मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे.
ईव्हीएम गैरप्रकार ही अनेकांच्या मनातली शंका: शरद पवार
Newsworld marathi Pune : आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत.माध्यमांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
जयवंतराव सावंत कॉलेजमध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळा
Newsworld marathi Pune : जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉ संजय सावंत डॉ वसंत बुगडे उपस्थित होते. या उपक्रमाच्या समन्वयक प्रा शिबा बनसोडे दिपाली थोरात प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या ट्रेनर गायत्री बल्लाळ यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सामाजिक उपक्रमाबरोबरच भावी शिक्षक हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे सर्वसमावेशक दृष्टिकोन निर्माण व्हावा नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल करत असताना भावी शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ते सोबत स्वार व्हावे या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंढे यांनी बोलताना सांगितले की सध्या शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शिरकाव झालेला आहे पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगाच्या पाठीवर काम करत असताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी वाटचाल करावी याची जाण भावी शिक्षकांना असणे गरजेचे आहेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शिबा बनसोडे व आभार प्रदर्शन प्रा दत्तात्रय साबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा निलोफर शेख पटेल, प्रा डॉ भरत गोरडे, प्रा अजित चव्हाण, प्रा अर्चना राऊत, डॉ वर्षा गायकवाड, सुग्रीव जाधव, तेजस देवल, कोमल थोरात, कांचन सोनवणे, प्रियंका कुतवाल, काजल किरण, कोमल मुळीक, चेतन चितळे, औदुंबर काळे, मुसेब शेख आदींनी परिश्रम घेतले.

