Newsworld marathi Mumbai : महाराष्ट्र राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही. ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती भाजप नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतील बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आला होता, मात्र अद्याप कोणत्याही नावाची घोषणा हाय कमांडकडून करण्यात आलेली नाही. दिल्ली येथील हाय कमांडकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच, पुन्हा एकदा शिंदे यांचे नाव चर्चेत आलं आहे.