‘शिव गौरव गाथा’ महानाट्यातून उलगडला शौर्याचा इतिहास

0
Newsworldmarathi Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, प्रशासन आणि विचार धारेवर आधारित तसेच ज्या ज्या क्रान्तिकारकांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी कार्य केले, अशा महावीरांना वंदन करीत शिवगौरव गाथा हे महानाट्य सादर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, यांच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखविण्यासोबतचा भारतीयांच्या शौर्याचा इतिहास मांडण्यात आला. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये महानाट्य शिव गौरव गाथा चे सादरीकरण झाले. याप्रसंगी डॉ. सुनील काळे, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या प्रशासन व दृष्टीकोनाबद्दल काही प्रसंग यामध्ये आहेत. संख्येने काही शेकडो असलेले मावळे हजारोंच्या मुघल सैन्यलाल कोणत्या प्रेरणेमुळे नामोहरम करू शकले, याबाबी महानाट्यात ठळकपणे दर्शविण्यात आल्या. जिजाऊंचे बालशिवाजींना रामायणातील कथा सांगण्याचे प्रसंग आणि त्यातून संस्कार कसे घडतात, हे देखील दाखविण्यात आले आहे. अफजलखान वध हा गाण्याच्या माध्यमातून सुरेखपणे दाखविण्यात आला आहे. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या सारख्या असंख्य पुढारी आणि क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी महान कार्य केले. हे सर्व पात्र त्यांच्या प्रेरणेविषयी महानाट्यात सांगत होते. संजय भोसले लिखित आणि दिग्दर्शित या महानाट्यात भारतीय एकात्मतेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देण्यात आला आहे. निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांची होती. महानाट्याचे सादरीकरण संवाद, गाणी, पोवाडे आणि आकर्षक नृत्याच्या माध्यमातून केले आहे. नृत्य दिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केले. ऐतिहासिक काळात नेणारे नेपथ्य, भव्य असा असा रंगमंच, आकर्षक वेशभूषा आणि उत्तम प्रकाशयोजना या महानात्याची वैशिष्ट्ये आहेत. जवळपास १५० कलाकारांनी हे महानाट्य सादर केले आहे.

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आरोग्य शिबीर

0
Newsworldmarathi Pune : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे स.प. महाविद्यालय मैदानावर हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ट्रस्टची दोन भव्य दालने उभारण्यात आली आहेत. महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, महा आरोग्य शिबीर दालनात मोफत रक्त, नेत्र, दंत, हृदय आजार, डोळे, श्रवण, त्वचा अशा २६ हून अधिक विभागांमध्ये विविध प्रकारच्या तपासण्या व आजारांवरील निदान करण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवसात ५ हजारहून अधिक रुग्णांनी या शिबिरातील सेवांचा लाभ घेतला आहे. या तपासण्या व सुविधांकरिता २८ हून अधिक रुग्णालये आणि संस्थानी सहभाग घेतला आहे. मुख्य दालनात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील गणरायाचे लाईव्ह दर्शन येथील दालनामध्ये होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुख्य मंदिराची भव्य रंगावली व ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची संपूर्ण माहिती या दालनामध्ये माहिती व छायाचित्रे स्वरूपात देण्यात आली आहे. तरी पुणेकरांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासोबतच ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेण्याकरिता रविवार, दि.२२ डिसेंबर पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० यावेळेत भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

परराज्यात मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक

0
Newsworldmarathi Pune : आपण राहतो त्या राज्यात पोस्टींग मिळावे यासाठी अधिकाऱ्यांचा सतत प्रयत्न असतो. मात्र इतर राज्यांमध्ये काम केल्याने आपण नक्कीच समृद्ध होतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा संपूर्ण देशात सन्मान केला जातो, त्यामुळे इतर राज्यात जाऊन काम करताना मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक दिली जाते, असे मत प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‌‘इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव‌’ या विषयावर परिसंवादाचे आज (दि. 21) आयोजन करण्यात आले होते. आसाम आणि मेघालय येथे 15-16 वर्षे काम केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, तसेच 15 वर्षांपासून राजस्थानमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी संतोष चाळके आणि 39 वर्षे सेवेत असलेले अरुण उन्हाळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रशासनातील गमतीशीर गोष्टी.. इतर राज्यात काम करताना तेथील भाषा, संस्कृती यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. त्यावेळेला काही मजेशीर प्रसंग घडतात. याविषयी चाळके म्हणाले, माझी राजस्थानात नियुक्ती झाली तेव्हा मी पोलिस स्टेशनमध्ये 5 जणांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना मी त्यांचे काम, पद या गोष्टी विचारात घेतल्या. मात्र त्याठिकाणी मिना ही प्रमुख जात असल्याने मी सुद्धा मिना जातीचा आहे आणि त्यामुळे मी 3 मिना जातीच्या लोकांची नियुक्ती केल्याचे बोलले जायला लागले. मी राजस्थानी नाही तर महाराष्ट्रातून आलो आहे हे समजल्यावर माझ्या पत्नीचे नाव मिनल आहे तर ती तरी मिना जातीची असेल असेही त्या लोकांना वाटले. मला तोपर्यंत याविषयी अजिबातच कल्पना नव्हती. पण नंतर मात्र हा सगळा गैरसमज दूर झाला आणि काम सुरळीतपणे सुरू झाले. प्रशासनातही विविधेत एकता.. भारतात विविधतेत एकता आहे असे आपण म्हणतो किंवा ऐकतो. पण प्रशासनात काम करत असताना आम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. इतर राज्यांमध्ये काम करताना भाषा, संस्कृती, अन्न वेगळे असले तरी प्रेम, दु:ख, निसर्ग, जवळीक या गोष्टी सगळीकडे सारख्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवते. निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्राबरोबरच इतर राज्येही बरीच प्रगत असल्याचे जाणवले, असे उन्हाळे म्हणाले. राजकीय अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक.. प्रशासकीय अधिकारी आणि पुढारी यांचा अतिशय जवळचा संबंध असतो हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण महाराष्ट्राबाहेर पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना किंवा अगदी वाहनचालकांनाही अतिशय आदराची वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात हे चित्र अभावानेच पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी आमदार, नगरसेवक असे सगळेच जण आसाम किंवा राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा आदर करतात असे सोळंकी म्हणाले.

पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे थाटात उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune : टीव्ही, मोबाईलमुळे बालनाट्य बघायला गर्दी होत नाही, हा विचार खरा नाही. चांगलं बालनाट्य असेल तर ते चालतं, चालणारच. रत्नाकर मतकरी यांचे अलबत्या गलबत्या नाटक आजही का चालतं? चांगल्या नाटकांना प्रेक्षक आहे, मुलांना सकस आहार, अन्न मिळावं म्हणून आपण जसे दक्ष असतो तसेच मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी केले. बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते. उदघाटन सोहळ्याला व्यासपीठावर उदघाटक डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, सुबोध भावे, सुशांत शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ निर्माता अजीत भुरे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दिपा क्षिरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ शेख अन्सारी, कार्यकारिणी सदस्य दिपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, धनंजय जोशी, त्र्यंबक वडूसकर, नागेसन पेंढारकर, आनंद जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील शाखांचे अध्यक्ष आबा मेघे, सुमती सोमवंशी, सीमा येलगुलवार, डॉ. अदिती मोराणकर, निलेश माने, तेजस्वीनी कदम, वैशाली दाभाडे, राजेश जाधव, उर्मिला लोटके, आबा ढोले, डॉ. निलेश माने, मनीषा पटेल, सुजाता कांबळे, अतुल अमळनेरकर आदी उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर, प्रास्ताविक करताना अध्यक्ष ॲड.नीलम शिर्के सामंत यांनी गेल्या वर्षभरात बालरंगभूमी परिषदेतर्फे झालेल्या महोत्सव व कार्यक्रमांचा आढावा घेतला. यात जल्लोष लोककलेचा व खास दिव्यांग बालकांसाठी घेतलेल्या यहाँ के हम सिकंदर या महोत्सवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या महोत्सवांनी बालरंगभूमीचे कार्य महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात पोहचले. बालप्रेक्षक सभासद योजनेत आजवर हजारो बालप्रेक्षकांनी केलेली नोंदणी ही त्याची पावती असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांच्या मनोगतात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले की, जसे प्रशिक्षणातून तानसेन निर्माण होत असतील तर कानसेनही निर्माण व्हायला हवेत. कारण प्रेक्षक असतील तर रंगमंचावर काम करण्यास मजा येते. बालवयातच हे कलेचे बालकडू मिळाल्यास निश्चितच बालरंगभूमी परिषदेच्या कार्यातून उद्याची रंगभूमी अधिक समृध्द होईल. तालात एक ताकद आहे आणि या ताकदीला अधिक ऊर्जा मिळण्यासाठी बालरंगभूमीचे कार्य गरजेचे आहे. अ.भा.मराठी नाट्य परिषद त्यांच्या कार्यामागे निश्चितच उभी राहील. अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांच्या नेतृत्वाखाली बालरंगभूमी प्रगती करेल ह्या सदिच्छा. स्मरणिका, दिनदर्शिका व वेबसाईटचे प्रकाशन बालरंगभूमी परिषदेचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे. यासाठी गेल्या वर्षभरात झालेल्या महोत्सवाची माहिती देणारी स्मरणिका तसेच वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. याव्ोळी महाराष्ट्रातील सर्व कार्यकारिणींच्या छायाचित्रांचा समाव्ोश असणा-या दिनदर्शिकेचेही प्रकाशन याव्ोळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेते सुबोध भावे यांनी मनोगतात, प्रकाश पारखीं यांच्यासोबत बालनाट्यात घेतलेल्या पहिल्या सहभागाचा उल्लेख करत. मी अभिनेता म्हणून घडण्याचे बालकडू मला बालरंगभूमीवरच मिळाले आहे. त्या काळातील अनेक स्वप्ने साकारण्याची उर्मी मला तिथेच मिळाली. नाटकात कामं करणे म्हणजे केवळ अभिनय करणे नाही. तर त्यासाठी मदत करणारे तंत्रज्ञही गरजेचे आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून त्यांची कला अधिकाधिक ऋध्दिंगत व्हावे. बालरंगभूमीने एक बालनाट्य महोत्सव घ्यावा, जिथे आमच्यासारख्या कलावंतांना अभिनय करण्याची संधी द्यावी. कारण बालप्रेक्षकांसमोर अभिनय करणे हे खरच कस लावणारे असेल. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात बालरंगभूमीने हाती घेतलेल्या या कार्याला निश्चित गती मिळेल. लहानपणी खोड्या करणारी मुलं पुढे मोठी जावून सर्जनशील म्हणून ओळखली जातात. त्यामुळे खोड्या करण्याच्या या वयात निश्चितच खोड्या करा. त्यातूनच कल्पनाशक्तीचा विकास होता. याव्ोळी लहानपणीची आठवण सांगतांना त्यांनी सादर केलेल्या कवितांच्या ओळींना बालप्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. उदघाटक डॉ. मोहन आगाशे यांनी बालप्रेक्षकांशी गप्पा मारत आपले मनोगत व्यक्त केले. याव्ोळी ते म्हणाले की, तुमच्याप्रमाणेच मी लहानपण अनुभवतो आहे. आपल्या लहानपणाची सगळ्यात मोठी देणगी आहे ती म्हणजे भांडण करुन विसरायची. भांडण विसरायला पाहिजे पण त्यासाठी आधी ते करावं लागतं. प्रत्यक्षात भांडण केलं तर रट्टा मिळतो पण नाटकात केलं तर कौतुक होतं. त्यामुळे ही निरागसता जपा. लहानपणीच उत्तम नाटक बघण्याची सवय लागली तर उद्याचा उत्तम प्रेक्षक घडेल. बालरंगभूमीने दिव्यांगाविषयी कार्य केले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. दिव्यांग नसलेला एकही मुलगा मला आज दिसला नाही. अंतरीच्या नाना कळा असणारे हे दिव्यांग आपल्या बुध्दांकामुळे आपल्याला काही बोलत आहेत. संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात, माझी अभिनयाची सुरुवातही बालरंगभूमीवरुनच झाली आहे. 1968 मध्ये जयंत तारी यांच्या टूनटूननगरी, खणखण राजा या बालनाट्यातून केली आहे. 60 वर्षानंतरही बालनाट्य रंगभूमी बदलली आहे. ती हौशी नाही तर व्यावसायिक व स्पर्धार्त्मक झाली आहे. नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक अभ्यास म्हणून शिकवला जावा. नाट्यशिक्षण ऐच्छित असाव्ो. विद्यार्थ्यांनी नट बनविण्याचा प्रयत्न करावे. बालनाट्य मुलांना भावेल असे हवं. पैसे भरुन झटपट, छोट्या किंवा मोठ्या पडद्यावरचा नायक बनत नसतो. शॉर्टकटने हवं ते मिळविण्याची पालकांची प्रवृत्ती धंदेवाईक प्रशिक्षण संस्थांना जन्म देते. बालरंगभूमीने हे थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नृत्य, गायन, वादन, जादू, चित्र, शिल्प अशा अनेक कलांच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी बालरंगभूमी परिषद कार्य करत असल्याचा मला आनंद आहे. हे संमेलन सर्व कलांचे समावेशक आहे. बालकांनो बालरंगभूमी ही तुमची हक्काची आहे. ही बालरंगभूमी तुम्हांला घडवेल हा विश्वास बाळगा. तिचा हात आणि बोट सोडू नका, धरुन ठेवा, तुमचं अवघं जगणं आनंदाचं होवून जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांनी मानले.

पोलीस बांधवांच्या घरांसाठी आ. रासनेची आक्रमक भूमिका

0
Newsworldmarathi Nagpur : नागपूरात सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचीत आमदार हेमंत रासने यांनी पहिल्याच संधीत कसब्यातील दोन महत्त्वाच्या समस्या मांडत कर्तव्यदक्षता दाखवली. आज विधानसभेत पुरवणी मागण्यासंबंधित चर्चेत बोलत असताना रासने यांनी खडक पोलीस वसाहतीचे पुनर्वसन तसेच 2004 पासून संथ गतीने सुरू असणाऱ्या मामलेदार कचेरीच्या कामाला देखील गती देण्याची मागणी राज्य सरकारला केली. खडक पोलीस वसाहत 125 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करणारे पोलीस या जुन्या वसाहतीतील अडीचशे फुटांच्या दुरावस्थेतील कौलारू निवासस्थानात जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तडे गेलेल्या भिंती, तुटक्या खिडक्या, सांड पाण्याची दुरावस्था अशा परिस्थितीचा सामना पोलिसांना करावा लागत असल्याची बाब मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे येथील 139 निवासस्थानांचे पुर्नवसन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी रासने यांनी केली. मामलेदार कचेरीच्या बांधकामाकरिता 2004 साली प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसच्या काळात हा प्रकल्प संथ गतीने राहिला. या भागात दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे शहर तहसीलदार कार्यालय, उमाजी नाईक स्मारक, खडक पोलीस स्टेशन अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत. परंतु त्या ठिकाणी नागरिकांना बसण्याकरता कोणतीही व्यवस्था नाही नसून खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सर्व्हरबद्दल कायम तक्रारी असतात, तसेच कार्यालयाकडे जाणारा रस्ता सुद्धा अरुंद असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर येथील कामाला गती द्यावी, अशी मागणी यावेळी रासने यांनी केली. आमदार रासने यांनी सर्वप्रथम बहुमताने विजयी करणाऱ्या कसब्यातील जनतेचे ऋण व्यक्त केले. तसेच कसबा मतदारसंघात आमदार राहिलेले दिवंगत गिरीश बापट, अरविंद लेले, अण्णा जोशी, मुक्ता टिळक, वसंतराव थोरात, उल्हास काळोखे या सर्वांना आदरांजली समर्पित केली. सभागृहात पहिल्यांदाच बोलत असताना दिवंगत आमदारांची आठवण काढणारे रासने एकमेव आमदार आज दिसून आले.

…या आमदारानी गाजवले नागपूरचे अधिवेशन

0
Newsworldmarathi Nagpur : आत्तापर्यंतचे नागपूरचे अधिवेशन हे विरोधी पक्षनेते गाजवत होते मात्र पहिल्यांदाच सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरचे अधिवेशन गाजवले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली असून बीड येथे बिहारसारखे गुंडाराज सुरु झाल्याचा आरोप होत आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड येथे कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात विधानसभेत आज भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक दावे केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधी संतोष देशमुखला गाडीत उचलून न्यायचं महिलांची छेड काढली म्हणून त्याला माराहाण करायचा प्लान होता असा सनसनाटी आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला. राज्याभरासह देशात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलेलं आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनासह संसदेच्या अधिवेशनात देखील या विषय गाजला. याचप्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आरोप केले होते. आता त्यांनी नवा आरोप करताना, पीकविमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट गेतल्यानंतर गौप्यस्फोट करताना ही मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेचे पडसाद अख्या राज्यात उमटताना दिसत आहेत. देशमुख यांच्या हत्येनंतर व्हिडिओ कॉल करून ‘आका’ला माहिती देण्यात आली होती. यामुळे याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी. दोन दिवसांपूर्वी वाईन शॉपमध्ये जे ‘आका’ होते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या खरेदी केल्या क्या? याचाही तपास व्हायला हवा.

फास्ट्रॅक प्रीमियमचे नवीन परफ्यूम लॉन्च

0
Newsworldmarathi Mumbai : भारतातील आघाडीचा, युवकांचा फॅशन ब्रँड फास्ट्रॅकने नवीन परफ्यूम रेन्ज आणून प्रीमियम मास फ्रॅग्रन्स बाजारपेठेत पदार्पण केल्याची व ब्रँडचा धोरणात्मक विस्तार केल्याची घोषणा केली आहे. परवडण्याजोग्या किमतींच्या आणि तरीही उत्तम दर्जाच्या सुगंधांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी फास्ट्रॅकची नवीन रेन्ज रोजचे क्षण अधिक आनंदी, उत्साही बनवण्यासाठी व युवकांना त्यांची अनोखी स्टाईल व्यक्त करता यावी यादृष्टीने तयार करण्यात आली आहे. फास्ट्रॅकची नवीन परफ्यूम रेन्ज जेन झीच्या वेगवेगळ्या गरजा आणि आवडनिवड पूर्ण करण्यासाठी, अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. सखोल ग्राहक संशोधनातून या ब्रँडने काही प्रमुख प्रसंगांवर आधारित वापर परिस्थिती ओळखून त्या प्रसंगांना अगदी साजेसे ठरतील असे सुगंध विकसित केले आहेत. भारतीय सुगंध बाजारपेठेत वेगाने वाढ होत आहे, खासकरून कमी किमतीच्या पण चांगल्या दर्जाच्या सुगंधांना खूप मागणी आहे (१००० रुपयांपेक्षा कमी). स्वतःची काळजी आणि स्वयं-अभिव्यक्ती यांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या नवीन पिढीमुळे ही वाढ होत आहे. वाढलेली जागरूकता आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे जास्तीत जास्त लोक आपले व्यक्तिमत्व आणि जीवनशैली उंचावण्यासाठी सुगंधांच्या प्रभावाचा उपयोग करू लागले आहेत. टायटन कंपनी लिमिटेडचे फ्रॅग्रन्सस अँड फॅशन ऍक्सेसरीज डिव्हिजनच्या सीईओनी सांगितले, “भारतातील सुगंध बाजारपेठेमध्ये लक्षणीय परिवर्तन घडून येत आहे. आमच्या संशोधनामध्ये आढळून आले आहे की, भारतीय युवक डिओड्रंटऐवजी फाईन फ्रॅग्रन्सकडे वळू लागले आहेत. पण त्यांना अशी उत्पादने हवी असतात ज्यांच्या किमती परवडण्याजोग्या असतील पण दर्जाच्या बाबतीत जराही तडजोड केलेली नसेल. आजचे युवक ग्राहक डिओड्रंट्सकडून फाईन फ्रॅग्रन्सकडे वळत आहेत, आमची ही नवीन रेन्ज परवडण्याजोग्या किमतीच्या पण प्रीमियम दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारपेठेतील कमतरता भरून काढेल. या ग्राहकांसाठी फ्रॅग्रन्स ग्रूमिंगसाठी आवश्यक आहेच, पण त्याबरोबरीनेच स्वयं-अभिव्यक्ती व स्टाईल वाढवण्यासाठी देखील आवश्यक आहे. युवकांचा विश्वासाचा ब्रँड म्हणून आम्ही अशी नवीन परफ्यूम रेन्ज सादर करत आहोत जी ग्राहकांच्या नवीन मागण्या पूर्ण करेल, नव्या ग्राहकवर्गांची जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे प्रीमियम फ्रॅग्रन्स सादर करेल.” या नवीन कलेक्शनमध्ये सहा वेगवेगळे आणि अनोखे सुगंध आहेत, काही विशिष्ट प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन त्यांना साजेसे ठरावेत या पद्धतीने ते विचारपूर्वक तयार केले आहेत. पुरुषांसाठी या रेन्जमध्ये आहे नाईट आउट, या सोफिस्टिकेटेड वूडी सुगंधामध्ये ओरिएंटल नोट्स वापरण्यात आल्या आहेत, रश हा फ्रेश वूडी सेन्ट प्रभावी, सतत व्यस्त असलेल्या व्यक्तिमत्त्वांसाठी तयार करण्यात आला आहे, आणि ईज हा क्लासिक सुगंध दररोज आत्मविश्वास मिळवून देतो. महिलांच्या कलेक्शनमध्ये – लश, स्वच्छंद व्यक्तींसाठी फुलांचा सुगंध, गर्ल बॉस, आधुनिक प्रोफेशनल्ससाठी प्रभावी फ्लोरल सेन्ट आणि वॉन्डर, मुक्त राहू इच्छिणाऱ्यांसाठी ओरिएंटल सुगंध यांचा समावेश आहे. फास्ट्रॅकच्या नवीन रेन्जची किंमत १०० मिलीसाठी ८४५ रुपये आहे, १००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांना लक्षणीय यश मिळण्याची संभावना खूप असल्याचे डोळ्यासमोर ठेवून या किमती ठेवण्यात आल्या आहेत. या परफ्यूम्सच्या लॉन्चच्या निमित्ताने फास्ट्रॅकने दोन आकर्षक फिल्म्स रिलीज केल्या आहेत. जेन झीची मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. “सिक लीव्ह” मानसिक आरोग्य, स्वतःची देखभाल, कामाच्या संस्कृतीबाबत आव्हानात्मक पारंपरिक कल्पना यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. “डेट – ए ट्विस्ट यू डिडन्ट सी कमिंग” यामध्ये सहानुभूती, समजूतदारपणा आणि आधुनिक नात्यांमधील खरेपणा यांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

एमपीएससी भरतीच्या वयोमर्यादेत वाढ

0
Newsworldmarathi Mumbai : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ केल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नोकरीपासून वंचित राहण्याच्या भीतीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरतो. 2024 च्या वेळापत्रकातही बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे, ज्यामुळे उमेदवारांना परीक्षा तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय सकारात्मक मानला जात आहे, विशेषतः जे उमेदवार या मर्यादेच्या जवळ पोहोचले होते त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे MPSC परीक्षेसाठी उत्सुक उमेदवारांना नवी संधी मिळेल आणि त्यांचे करिअर घडवण्याची प्रक्रिया थोडी सुलभ होईल. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा प्रक्रियेबद्दल सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना साहित्य परिषदेतर्फे सन्मानित

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून, मराठी भाषेचे आणि साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. या परिषदेच्या शाखा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पसरलेल्या असून, सोलापूर ही त्यापैकी एक महत्वाची शाखा आहे. संस्थेतर्फे अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जातात. परिषदेतर्फे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर ह्यांचा गौरवपत्र प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. शिकारपूर यांचे ‌‘आधुनिक तंत्र एआय व सर्वसामान्यांवर होणारा परिणाम‌’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. मंचावर मसाप सोलापूर शाखा अध्यक्ष श्रुतीश्री वडगबाळकर, उपाध्यक्ष दत्त सुरवसे, सदस्य जे. जे. कुलकर्णी व किशोर चांडक उपस्थित होते. डॉ. शिकारपूर गेली चार दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, 59 पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते युवापिढी सक्षम व कौशल्यतेने परिपूर्ण घडवू इच्छित आहेत. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हाव्ोत यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रतर्फे डॉ. शिकारपूर यांचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.

क्रोधावर विजय ही यशाची गुरुकिल्ली : खा. ढोलकिया

0
Newsworldmartahi Pune : क्रोध, काम आणि लोभ हे दुर्गण व्यापाऱ्यांसाठी घातक असून क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे मत राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी व्यक्त केले.दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आयोजित “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” २०२४ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया बोलत होते.  या कार्यक्रमात मे. गौतम ट्रेडर्स, सोलापूरचे वस्तीमल संकलेचा यांना राज्यस्तरीय पुरस्कार, मे. संगम कलेक्शन, राजगुरूनगर, पुणेचे विजयकुमार भन्साळी यांना पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार, तर मे. रामकृष्ण ऑईल मिल, पुणेचे आनंद पटेल यांना पुणे शहरस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद मे. पुरणचंद अॅन्ड सन्स्, पुणेचे सतीश गुप्ता आणि दि पूना मर्चंटस् चेंबर युवा सभासद मे. आर.बीज् ड्रायफ्रुट, पुणेचे राजीव बाठिया यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श पत्रकार संजय ऐलवाड यांना कै. वि.ल. गवाडीया पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. यावेळी गुजराथी बंधू समाजचे प्रसिद्ध उद्योपती राजेश शहा आणि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सभासदांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया म्हणाले की, अनेकदा सर्व प्रयत्न करूनही व्यापारात नुकसान होते. अशावेळी झाले ते ईश्वराची ईच्छा होती, असे मानून पुढे सरकणे आवश्यक असते. क्रोध हा नेहमी होऊन गेलेल्या घटनेवर आधारित असतो. ती घटना म्हणजेच भूतकाळात निघून गेलेला क्षण असतो. अशा वेळी गेलेला क्षण किंवा होऊन गेलेल्या कृतीवर क्रोध व्यक्त करून आपण भविष्यातील काही संधी गमवण्यचा धोका असतो. कामाचा कितीही ताण असला तरी मन आणि बुद्धी शांत तसेच स्थिर ठेवून वाटचाल केली पाहिजे.यावेळी बोलताना इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका म्हणाले की, आज प्रदान करण्यात आलेले पुरस्कार हे आजवर मिळालेल्या कामाची पावती आहे. या पुरस्कारा पासून प्रेरणा घेऊन भविष्यात अजून चांगले विधायक काम पुरस्कारार्थींना करायचे आहे. एकटा व्यापारी प्रत्येक समस्या सोडवू शकत नाही, त्यासाठी चेंबर सारखी ऐक्याची प्रतिक असलेली सक्षम यंत्रणाच आवश्यक आहे.यावेळी गुजराथी बंधू समाजचे प्रसिद्ध उद्योपती राजेश शहा तसेच विजय भन्साळी आणि सतीश गुप्ता यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी स्वागत केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली. दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले.