निवडणूक काळातही अविरत स्वच्छता; ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’

0
Newsworldmarathi Pune: स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ अविरतपणे सुरू असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा बाप्पु मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित अढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या अस्वच्छतेविषयक तक्रारी त्यांचे निराकरण, लागणारा वेळ याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस केली. निवडणुकीची घोषणा झाल्यावरही निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहून हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे.
निवडणूक आली की हे अभियान बंद होईल असे वाटले होते. मात्र, आमच्या शनिवार पेठ भागात आज पाचव्या वेळेस ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ टीम स्वच्छता करत आहे. यासारखे अभियान नियमितपणे राबविले जाईल अशी ग्वाही आम्हाला बाप्पु मानकर यांनी दिली आहे.
-जयेश पंडित, नागरिक
मिशन स्वच्छ प्रभागच्या २५ माध्यमातून अनेक रस्ते व अरुंद गल्ल्या स्वच्छ करून घेण्यात आल्या. मिशनच्या सुरुवातीला कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी डस्ट बिनचे वाटप करण्यात आले. आजवर ८० टन कचरा उचलण्यात आला आहे.
-राघवेंद्र बाप्पु मानकर

आता इतिहास घडवा; प्रभाग ३६ मधून आपल्या आबांसह सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना संधी द्या; एकनाथ शिंदे यांची नागरिकांना साद

0
Newsworldmarathi Pune: ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्यांना चिंता नाही.विधानसभा निवडणुकीत हे आपण पाहिले आहे .आता महापालिका निवडणुकीत पुन्हा दाखवून द्या, इतिहास कसा घडतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर – पद्मावतीमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रॅलीतून नागरिकांना अभिवादन करून मतदारांशी संवाद साधला. ‘सहकारनगर – पद्मावती’मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यावेळी ‘लाडक्या बहिणी राहणार एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या पाठीशी ‘ या महिलांच्या घोषणा लक्षवेधी ठरल्या आणि उपस्थितांसह खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दाद दिली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की,प्रभाग ३६ मध्ये विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आबा बागुल यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकास आदी सर्व कामां साठी आबा बागुल यांना नगरविकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली, मात्र त्यासाठी आबांना सातव्यांदा महापालिकेत पाठवून इतिहास घडविण्याची आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी सोडू नका असे आवाहनही शिंदे यांनी मतदारांना केले. तत्पूर्वी क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकातील सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती आणि युवकांचा सहभाग पाहता आता परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट केले. आबा बागुल यांचा प्रभाग पाहायला लोकं बाहेरून येतात,त्यामुळे पुण्यातील प्रत्येक प्रभाग आबा बागुल यांच्या प्रभागासारखे झालेच पाहिजे. पुण्याचे वाहतूक, पाणी, आरोग्य असे कोणतेही प्रश्न असो शिवसेना सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी आबा बागुल हे सज्ज आहेत. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे देण्याबाबत नगरविकास खाते असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच दिलासा देतील. ५०० चौ. फूट घरांचा मिळकतकर माफ करण्याची घोषणाही उदय सामंत यांनी केली. तसेच उद्योगभवन पुण्यात उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.आबा बागुल यांची ताकद आणखी वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारच असेही ते म्हणाले. आबा बागुल म्हणाले, येत्या १५ तारखेला मतदान करताना फक्त धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबायचे आहे. शिवसेना म्हणजे सर्वांगीण विकास हेच लक्षात ठेवायचे आहे. निश्चिंत रहा…सर्व मागण्या मार्गी लावणार यावेळी आबा बागुल यांनी विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या प्रभागातील जागांवर विविध प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन सादर केले.त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी तातडीची गरज म्हणून तळजाई टेकडी येथे ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीस मान्यता दिली जाईल. दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी तळजाई टेकडी येथे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा उभारणीला प्राधान्य दिले जाईल.आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण सुलभ व्हावे यासाठी वाळवेकर नगर येथे अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज (मोफत / सवलतीत शिक्षण) सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे मिळण्यास परवानगी व शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा देण्याबाबत कार्यवाही होईल असे आश्वासन देताना ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या नगरविकास विभागामार्फत निश्चित मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पाला तातडीने गती देण्याबाबतही निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले

कल्पना मुळीक यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कल्पना उदयसिंह मुळीक यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साई दत्त मंदिरापासून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान कल्पना मुळीक यांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन कल्पना मुळीक यांनी दिले. प्रचारादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार देऊन कल्पना मुळीक यांचे स्वागत केले. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि विकासाभिमुख भूमिकेची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली. कल्पना मुळीक यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, तसेच स्वच्छ व सुरक्षित प्रभाग निर्माण करण्यावर भर दिला जाईल. या पदयात्रेमुळे प्रभाग ४० मध्ये काँग्रेसच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून आगामी निवडणुकीत आपल्याला निश्चितच नागरिकांचे भरघोस समर्थन मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग ४१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी–उंड्री परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार झपाट्याने वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती आण्णा बांदल, श्वेता घुले, फारूक सय्यद आणि अश्विनी सूर्यवंशी यांनी प्रभागातील विविध भागांत प्रत्यक्ष भेटीगाठी घेत नागरिकांशी संवाद साधला. या प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी रोजगाराच्या संधी या प्रमुख मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. उमेदवारांनी निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. निवृत्ती आण्णा बांदल यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन असल्याचे सांगत पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. श्वेता घुले यांनी महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर विशेष लक्ष देण्याची भूमिका मांडली. फारूक सय्यद यांनी अल्पसंख्याक समाजासह सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला, तर अश्विनी सूर्यवंशी यांनी युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या प्रचार मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आगामी निवडणुकीत प्रभाग ४१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग २५ मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’

0
Newsworldmarathi pune: मतदार यादीचे वाचन, मतदारांना स्लिप पाठवणे आणि घरोघरी प्रचाराची तयारी अशा निवडणूक वातावरणाने, प्रभाग २५ मधील भाजपाची निवडणूक कचेरीत गजबजली आहे. तळागाळात संघटनेचे जाळे पसरलेल्या भारतीय जनता पक्षाने, प्रभाग २५ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय केला आहे. प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागात भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित निवडणूक लढवीत आहेत. ‘आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात आम्ही निवडणूक लढवीत आहोत. निवडणूक ही नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन, भाजपा गांभीर्याने लढते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, अनेक वर्षांपासून उभी राहिलेली संघटनेची फळी, निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट आणि प्रत्येक विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवत असलेले कार्यकर्ते या जोरावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे’ असे भाजपाचे कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक यांनी सांगितले. प्रभाग २५ चे पदाधिकारी मनोज खत्री, किरण जगदाळे, निलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख व सर्व कार्यकर्ते या विजयासाठी परिश्रम घेत आहेत.

प्रभाग क्रमांक २४ अधिक सुरक्षित : गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टीमुळे प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टी व भविष्यकालीन व्हिजनमुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठ परिसरात महापालिकेच्या निधीतून १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक बसला असून प्रभागाची एकूण सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून प्रभागाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे कौतुक होत आहे. बिडकर यांच्या माध्यमातून कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभागा मधील मध्यवर्ती भागात येणारे २४ मुख्य चौक, ६० मोक्याच्या ठिकाणे, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम आणि बस थांबे अशा गर्दीच्या भागांची काळजीपूर्वक निवड करून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के भाग आता या कॅमेऱ्यांच्या निगरानीखाली आला आहे. यामुळे पोलिसांना गर्दीवर सतत लक्ष ठेवणे सोपे झाले असून पोलिस यंत्रणेवरील ताण लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. पेठांचा हा परिसर पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि इतर सामाजिक कार्यक्रमांच्या काळात प्रचंड गजबजलेला असतो. अशा वेळी या प्रगत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे नागरिकांची सुरक्षा वाढली आहे आणि गुन्हेगारांवर मजबूत वचक निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना बिडकर म्हणाले, भविष्यात प्रभागाच्या सुरक्षेसाठी आणखी प्रगत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आधुनिक साधनांचा वापर करून प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणा हा माझा प्रमुख उद्देश असणार आहे. प्रभागातील नागरिकांना दहशतमुक्त राहता यावं यासाठी कायदा आणि सुव्यवस्था सुधारणा हा माझा मुख्य उद्देश असून त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता भविष्यात देखील माझ्याकडून करण्यात येईल असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला आहे.

सत्तेची दडपशाही मोडून काढण्याची वेळ; गोकुळनगरात राष्ट्रवादीचा एल्गार

0
Newsworldmarathi Pune: गोकुळनगर येथे आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत नागरिकांना परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांत एकाधिकारशाही पद्धतीने सत्ता राबवली जात असून, सामान्य माणसाचा आवाज दडपला जात आहे. ही अन्यायकारक व्यवस्था उलथवून लावण्यासाठी क्रांतीची गरज आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. कोंढवा–येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४० मधील गोकुळनगर परिसरात झालेल्या या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गंगाधर विठ्ठल बंधे, सतीश मार्कड, सपना अमोल धमवट व सुरेश लक्ष्मण कवडे यांच्यासाठी प्रचार करण्यात आला. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. शिंदे म्हणाले की, पुणे शहरात सत्ताधाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या माध्यमातून भाजपकडून एकाधिकारशाही आणि दडपशाही सुरू असून, याला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. “भीती बाळगू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे सांगत त्यांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी समन्वयक अंकुश काकडे यांनी सांगितले की, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कात्रज-कोंढवा रोड परिसरातील जनता सुज्ञ असून, यावेळी बदल घडवून आणण्याचा ठाम निर्णय नागरिकांनी घेतला आहे. दोन तृतीयांश बहुमताने संपूर्ण पॅनेल निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती पोळके, सतीश मार्कड, अमोल धमवट, विश्वास वाघमोडे, बिभीषण खरात आदींसह गोकुळनगर व कात्रज-कोंढवा रोड परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

‘शब्द नाही, काम बोलणार’, सूस गावात लहू बालवडकरांना जनतेचा ठाम पाठिंबा

0
Newsworldmarathi Pune: सूस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतले असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे आणि श्री. लहू बालवडकर विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. आज भाजपाच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली भव्य पदयात्रा म्हणजेच सूस गावातील नागरिकांनी दिलेला विजयाचा कौल ठरला आहे. भगवती नगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा भैरवनाथ मंदिर येथे समाप्त झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण, औक्षण आणि घोषणाबाजी करत भाजपचे जोरदार स्वागत केले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ औपचारिक नव्हता, तर सूस गावाच्या विकासासाठी भाजपच योग्य पर्याय असल्याचा ठाम राजकीय संदेश देणारा होता. सूस गावातील प्रत्येक घरातून मिळालेला पाठिंबा, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा विश्वास यामुळे भाजपचा प्रचार अधिक बळकट झाला आहे. जनतेने दाखवलेला हा विश्वास सूस गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत आधार ठरत असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही निवडणूक सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असल्याची भूमिका भाजपने पुन्हा एकदा अधोरेखित केली. मतदारांनी दिलेले प्रत्येक मत हे सूस गाव आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक ०९ च्या प्रगतीचा पाया ठरणार असून, विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. भाजपने पुढील पाच वर्षांचा स्पष्ट विकास आराखडा जनतेसमोर मांडला असून, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक व्यवस्थेचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. विकास कागदावर न राहता तो थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसेल, असा ठाम दावा लहू बालवाडकर यांनी केला आहे. यावेळी भाजप नेते लहू बालवाडकर यांनी नागरिकांना संबोधित करत सांगितले की, मला तुम्ही मत देऊन सेवा करण्याची एक संधी द्या; पुढील ५ वर्ष हि तुमच्या आमच्या प्रभागाच्या विकासाची असतील. शब्दांपेक्षा कामातूनच भाजप आपली विश्वासार्हता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या या भव्य पदयात्रेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, प्रभागात भाजपला जनतेचा ठाम पाठिंबा मिळत असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये विजयाचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांच्या विजयाचा एल्गार

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायप्लॉट) येथील भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचार मोहिमेने वेग घेतला असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र तरुण मंडळ येथून आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या विशेष प्रचार पदयात्रेत केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांनी आवर्जून उपस्थित राहून प्रचाराला अधिक बळ दिले. पदयात्रेत सहभागी होत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी अर्चना पाटील यांच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. “गेल्या काही दिवसांत अर्चना पाटील यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असून, जनता विकासाच्या बाजूने स्पष्ट कौल देईल,” असे ते म्हणाले. ही पदयात्रा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनीही स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या. भाजपच्या नेतृत्वाखालीच या प्रभागाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पदयात्रेदरम्यान संपूर्ण परिसर घोषणांनी आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता. या रॅलीत प्रभागातील शेकडो तरुण, महिला आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हा अर्चना पाटील यांना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे द्योतक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकूणच या पदयात्रेमुळे प्रभाग २२ ‘क’ मधील निवडणूक प्रचाराला नवे बळ मिळाले असून, भाजपच्या विजयाची हवा अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोजगारासाठी शिवसेना उद्योग भवन उभारणार : आबा बागुल

0
Newsworldmarathi Pune: महिला बचत गट व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीसाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारून बचतगटांसह तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल,अशी ग्वाही शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधील अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी दिली. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमध्ये माजी उपमहापौर आबा बागुल यांना प्रचारात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अनेकांकडून पहिल्या निवडणुकीची आठवण काढताना आजही विश्वासाचं नातं कायम असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. सकाळी दुचाकी रॅली, पदयात्रा काढून मतदारांशी आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांनी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना आबा बागुल म्हणाले की, महिला बचत गट व तरुणांच्या रोजगारासाठी ‘शिवसेना उद्योग भवन’ची निर्मिती केली जाणार आहे.ज्याद्वारे स्थानिक महिला बचत गट, तरुण उद्योजक व स्टार्टअपसाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. उत्पादन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व विक्रीसाठी आवश्यक सुविधा यासह कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच उद्योगस्नेही कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यशाळा,आयटी, सेवा क्षेत्र, लघुउद्योग, गृहउद्योगांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ त्याचप्रमाणे कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व बाजारपेठ जोडणीसाठी मार्गदर्शन केंद्र असणार आहे. ज्यातून आर्थिक स्वावलंबनाची भक्कम पायाभरणी होणार आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना हा उद्देश असल्याचे आबा बागुल म्हणाले.