ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणार: आबा बागुल यांची ग्वाही

0
Newsworldmarathi Pune: तळजाई टेकडी येथील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम तसेच वाळवेकर लॉन येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांनी तळजाई टेकडीवर सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि विकासासाठी “शिवसेनेचे धोरण कणखर” यावर चर्चा केली.नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी झालेल्या संवादात आबा बागुल यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ समाजासाठी, कुटुंबासाठी आणि शहराच्या जडणघडणीसाठी वाहिलेल्या ज्येष्ठांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी असल्याचे आवर्जून नमूद केले. या संवादादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य सुविधा, नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, विरंगुळ्यासाठी मोकळ्या जागा, सुरक्षित चालण्याचे मार्ग, स्वच्छतागृहे, सार्वजनिक बस थांबे, तसेच प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत आपली मते मांडली. अनेक ज्येष्ठांनी एकटेपणा, मानसिक तणाव आणि संवादाच्या अभावाकडेही लक्ष वेधले. यावर आबा बागुल म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या केवळ ऐकून घेऊन चालणार नाहीत, तर त्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क, नियमित आरोग्य शिबिरे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने राबवण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. समाजाचा विकास हा सर्व घटकांना सोबत घेऊनच होतो. ज्येष्ठ नागरिक सुखी, सुरक्षित आणि सन्मानाने जगतील, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आबा बागुल यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळाल्याने अनेकांनी आबा बागुल यांचे आभार मानले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune: भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या आणि भावनिक सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. ‘निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी आम्हा उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत. त्याच भावनेतून प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, रमेशजी परचुरे, किरणजी सरदेशपांडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला,’ असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. या हृद्य सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ, श्रेयस लेले यांचीही उपस्थिती लाभली.

‘सेवा हाच धर्म’ या ब्रीदवाक्याने राणी भोसले पुन्हा निवडणूक रिंगणात; नागरिकांचा पाठिंबा

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार व माजी नगरसेविका राणी भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सातत्य, संघर्ष आणि सामर्थ्य’ या त्रिसूत्रीवर आधारित त्यांचे कार्य आज प्रभागातील नागरिकांसाठी विकासाचा विश्वासार्ह आधार ठरत आहे. राणी भोसले यांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कामावर भर दिला आहे. महिला सक्षमीकरणाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले असून विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन वाटप, रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्ग तसेच स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला. स्वच्छतेबाबत स्वतः पुढाकार घेऊन ‘आधी केले, मग सांगितले’ या तत्वानुसार त्यांनी काम करून दाखवले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन त्यांनी प्रभागात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे. आमदार, खासदार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राणी भोसले यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. “सेवा हाच आमचा धर्म आणि माणुसकी हाच आमचा मार्ग” या भूमिकेतून राणी भोसले आता नव्या जोमाने निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाचा शुभारंभ ! प्रभाग ०९ मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची भव्य पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ जशी जवळ येत आहे, तसतसा प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय वातावरण चांगलाच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नगरसेवक उमेदवार सौ. रोहिणी सुधीर चिमटे, श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर, सौ. मयुरी राहुल कोकाटे व श्री. लहू गजानन बालवडकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा दमदार शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाणेर येथून निघालेल्या भव्य पदयात्रेने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले. पक्षाचे झेंडे, घोषणांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला. हनुमान मंदिर, राम मंदिर, भैरवनाथ मंदिर, पुणे महानगरपालिका कचरा शाळा, श्री सावतामाळा मंदिर, बालेवाडी फाटा, श्री गणेश मंदिर ते शिवम बालवडकर संपर्क कार्यालय असा हा प्रचार मार्ग होता. पदयात्रा जिथे जिथे पोहोचली, तिथे तिथे नागरिकांनी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त घोषणांनी उमेदवारांचे स्वागत केले. यावेळी लहू बालवडकर यांनी सांगितले “हा प्रचार नाही, हा विकासाचा संकल्प आहे. प्रभाग ०९ मध्ये स्वच्छता, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, सुरक्षा आणि सुशासन यासाठी आम्ही ठोस कृती आराखड्यासह मैदानात उतरलो आहोत. आजचा जनसमुदाय आणि नागरिकांचा विश्वास पाहता विजय आमचाच आहे. “ या प्रचार यात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनेची ताकद पाहता भाजपाने या प्रभागात निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. “फक्त घोषणा नाहीत, कामाचा अनुभव दिसतो. उमेदवार रस्त्यावर उतरून आमच्याशी बोलत आहेत, हीच खरी लोकशाही आहे. यावेळी आम्ही विकासालाच मत देणार,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान, एकीकडे विरोधक अजून रणनीती आखण्यात गुंतलेले असताना, भाजपाने मात्र थेट जनतेत उतरून प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज झालेल्या या पदयात्रेमुळे निवडणूक लढतीला खरी रंगत आली आहे.

प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य प्रचार शुभारंभ

0
Newsworldmarathi Pune: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हा प्रचार दौरा पार पडणार असून, प्रभागातील विविध भागांतून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची ध्येये, विकासाची भूमिका आणि उमेदवारांचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून विराज विश्वनाथ लांडे (ओबीसी पुरुष), अनुराधा सुशील लांडगे (सर्वसाधारण महिला), अश्विनी नितेश फुगे (सर्वसाधारण महिला) आणि अमोल मधुकर डोळस (सर्वसाधारण पुरुष) निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी आतापर्यंत प्रभागात सामाजिक, शैक्षणिक व नागरी विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. प्रचार मार्गात छत्रपती शिवाजी महाराज चौक, विविध मंदिरे, चौक, वसाहती आणि प्रमुख रस्त्यांचा समावेश असून ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर मतदान करून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

तुमच्या प्रामाणिक कार्याची पक्ष नक्कीच दखल घेईल; वरिष्ठांकडून श्रीकांत जगताप यांचे कौतुक

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय रचणारे प्रभाग क्रमांक ३५ चे पहिले नगरसेवक श्रीकांत जगताप यांचा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे व व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहरात पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून येत इतिहास घडवणाऱ्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. यावेळी बोलताना प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्रीकांत जगताप यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, “तुम्ही आजपर्यंत प्रभागातील नागरिकांसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रामाणिक काम, लोकांशी ठेवलेला थेट संवाद आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळेच आज हे यश तुम्हाला मिळाले आहे. भविष्यात पक्ष तुमच्या कामाची नक्कीच दखल घेईल आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच श्रीकांत जगताप हे युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना श्रीकांत जगताप यांनी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. “मी २४ तास प्रभागातील नागरिकांसाठी उपलब्ध राहीन. प्रभागातील मूलभूत सुविधा, विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील,” असे त्यांनी सांगितले. पुढील काळात प्रभागाच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रभाग ४० च्या विकासासाठी कल्पना मुळीक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० (क) मधील राजकीय हालचालींना वेग आला असून, कल्पना उदयसिंह मुळीक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागाच्या सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन त्या जनतेसमोर उभ्या राहिल्या असून, त्यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम कोंढवा बुद्रुक येथील श्री साई दत्त मंदिर, उदयसिंह मुळीक सांस्कृतिक भवन समोर, साईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौ. कल्पना मुळीक या प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, विकासाची दिशा, प्राधान्यक्रम आणि भविष्यातील आराखडा मांडणार आहेत. प्रभाग क्रमांक ४० (क) मध्ये येणाऱ्या कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी परिसरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत सर्वांगीण विकास साधण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ४० (क) कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी येथील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कल्पना उदयसिंह मुळीक यांनी केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा मिळाल्यास प्रभागाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे व अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे आणि अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व व दिशा मिळणार असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात सुरू आहे. अपुर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित व तरुण उद्योजक म्हणून परिचित आहेत. सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील उदयोन्मुख युवक-युवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोकण पट्ट्यातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, स्थानिक स्तरावर क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सुविधा व स्पर्धा वाढाव्यात, यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे कोकणातील युवा शक्तीला चालना मिळून महाराष्ट्र क्रिकेटच्या प्रगतीला गती मिळेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न? बाबुराव चान्दोरेंच्या मुलाला तडीपार करण्याची भाजपची मागणी

0
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरू असलेल्या प्रचाराला मोठा धक्का बसला असून, मतदारांना पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप आणि त्यासंदर्भातील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार गणेश कळमकर , लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यावर थेट आरोप करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भाजप कडून समीर चांदेरे यांना निवडणूक काळात तडीपार करण्याची तीव्र मागणी करण्यात अली आहे, मतदारांची नावे, रोख रक्कम आणि व्हायरल व्हिडिओ भाजप उमेदवार गणेश कळमकर , लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांच्या आरोपानुसार, प्रभाग क्रमांक ९ मधील काही भागांत मतदारांची नावे नोंदवून एका महिलेमार्फत रोख रक्कम वाटप करण्यात येत होते. याच घटनेचा असल्याचा दावा करण्यात येणारा एक महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे या आरोपांना अधिक धार मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला मतदारांची नावे आणि पैशांबाबत बोलताना दिसत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. हा व्हिडिओ खरा असल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपचा थेट आरोप : पैशांच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न भाजपकडून या प्रकरणात केवळ आरोप न करता थेट राजकीय भूमिका घेतली जात आहे. “पैशांच्या जोरावर मत विकत घेण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळचा माणूस असल्याने प्रशासन डोळेझाक करत आहे,” असा थेट आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री स्तरावर तक्रार, कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत गणेश कळमकर , लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्याचे सांगितले आहे. तसेच व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून, दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. समीर चांदेरे यांची पार्श्वभूमी आणि वाढती अडचण समीर चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुणे शहर युवक अध्यक्ष असून, ते पक्षाचे वरिष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांचे पुत्र आहेत. बाबुराव चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वीही समीर चांदेरे यांच्यावर विविध वादग्रस्त आरोप झालेले आहेत.

विकासाचा संकल्प करून प्रभाग २१ च्या भाजपच्या उमेदवारांची प्रचार रॅली

0
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क) परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार दौरा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. भाजप, आरपीआय (आठवले गट) आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार यांनी या प्रचार दौऱ्यात नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा संदेश दिला. या प्रचार दौऱ्यात ‘अ’ गटातील वैराग प्रसन्नजीत भरत, ‘ब’ गटातील शिलिंकर सिद्धी अविनाश, ‘क’ गटातील चोरलेने मनीषा प्रविण आणि ‘ड’ गटातील भिस्मले श्रीनाथ यशवंत यांनी सहभाग घेतला. परिसरातील विविध भागांतून पदयात्रा काढण्यात येऊन घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधण्यात आला. महर्षीनगर, अरिहंत गार्डन, गीतानंद सोसायटी, शनी मंदिर परिसर, संत नामदेव शाळा, दत्त मंदिर, एम.आर.ए. लॉज, युनिटी मित्र मंडळ, लालबाग परिसर, स्वामी समर्थ मंदिर, महात्मा फुले नगर गणपती मंडळ तसेच सफारी उद्यान आणि कॅन्टोनमेंट परिसरात हा प्रचार दौरा पार पडला. या ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे जोरदार स्वागत केले. प्रचारादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. केंद्र, राज्य आणि महापालिकेत समन्वय साधून विकासकामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रचार दौऱ्याला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून भाजप उमेदवारांना प्रभाग २१ मधून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांचा उत्साह आणि वाढता विश्वास पाहता भाजप कार्यकर्त्यांमध्येही जोमाचे वातावरण निर्माण झाले आहे.