२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार: राघवेंद्र बाप्पु मानकर

0
Newsworldmarathi Pune: नागरिकांच्या सेवेचा ध्यास घेऊन माझे सहकारी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेत अहौरात्र कार्यरत आहोत. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे हा बाप्पु तुमच्या कुटुंबातील सदस्य; तुमचा मित्र या नात्याने स्वतः २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन,’ असा विश्वास भाजपाचे प्रभाग २५-ब मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून, शिस्तबद्ध संघटनात्मक बांधणीच्या जोरावर या प्रभाग २५ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा संकल्प करा,’ असे आवाहन आमदार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना केले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभाग २५ च्या उमेदवार स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, भाजयुमो शहर सरचिटणीस प्रणव गंजीवाले, महिला आघाडी मंडल अध्यक्ष मोहना गद्रे, प्रभाग महिला अध्यक्षा रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष श्रेयस लेले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले; तसेच केंद्र व राज्य सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ही निवडणूक जिंकून शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई मतदारसंघासह शहराला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

अर्चना तुषार पाटील यांचे काम कौतुकास्पद : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

0
Newaworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी आतापर्यंत प्रभागात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावली आहेत, असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले. सातत्य, सामर्थ्य आणि जनतेशी असलेली बांधिलकी या गुणांच्या बळावर अर्चना पाटील यांनी प्रभागात विकासाची नवी दिशा निर्माण केली असून पुढील काळातही नागरिकांना विकासाची नवी वाट मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत अर्चना पाटील यांना भरभरून मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अर्चना तुषार पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पाटील कुटुंबीयांकडून परंपरेनुसार औक्षण करून त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली तसेच प्रभागातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेटस्वरूपात प्रदेशाध्यक्षांना देण्यात आली. यावेळी बोलताना अर्चना तुषार पाटील म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी चालू निवडणुकीचा सविस्तर आढावा घेतला, संघटनात्मक बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आगामी लढतीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नव्या ऊर्जेसह आणि आत्मविश्वासाने जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

डायसप्लॉटच्या सर्व समस्या सोडविणार; अर्चना पाटील यांची ग्वाही

0
Newaworldmarathi Pune: डायसप्लॉट व अमीना टॉवर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपलाच कौल द्यावा, असे आवाहन प्रभाग क्रमांक २२ (क) मधील भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी नागरिकांना केले आहे. शुक्रवारी त्यांनी या भागातील डायसप्लॉट आणि अमीना टॉवर परिसरात घरोघरी प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. विशेषतः महिलावर्गाच्या दैनंदिन अडचणी, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, स्ट्रीटलाइट, सुरक्षा तसेच नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. महापालिकेच्या माध्यमातून या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत पुन्हा एकदा संधी दिल्यास नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले. विकासाभिमुख दृष्टिकोनातून प्रभागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी अर्चना पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेमामुळे प्रचारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे. नागरिकांचे प्रेम आणि विश्वास पाहून माझा उत्साह द्विगुणित झाला असून हा विजय विश्वासाचा आणि विकासाचा असेल,” असे मत उमेदवार अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.

विद्यार्थांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध : आबा बागुल

0
Newsworldmarathi Pune: विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना पक्षाचे उमेदवार आबा बागुल यांनी दिली. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांना प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांनी आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांशी संवाद साधून संपूर्ण पॅनेलच्या विजयाचा निर्धार केला. यावेळी आबा बागुल म्हणाले की,शिक्षण हे सर्वांनाच मिळावे. वंचित घटकातील मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी देशात प्रथमच स्व. राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कुलची उभारणी केली. त्याच धर्तीवर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रत्येक प्रभागात ई- लर्निंग स्कुलची उभारणी करण्यासाठी कार्यरत असणार आहे. राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आबा बागुल म्हणाले.

प्रभाग क्रमांक २४ च्या निवडणुकीची धुरा युवा चेहऱ्याच्या खांद्यावर, योगेश जगताप भाजपाचे निवडणूक प्रमुख

0
Newsworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यानंतर आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. प्रभाग क्रमांक 24 (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – के. एम. हॉस्पिटल) भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रमुखपदी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष योगेश जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपाकडून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, देवेंद्र वडके, उज्वला गणेश यादव, कल्पना दिलीप बहिरट निवडणुकीच्या मैदानात आहेत. गणेश बिडकर यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या या पॅनलच्या निवडणूक नियोजनाची धुरा योगेश जगताप यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “राष्ट्र प्रथम आणि विकासाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्ष पुणे शहरामध्ये महापालिका निवडणूक लढवत आहे. शहराच्या विकासासाठी गतकाळामध्ये अनेक पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आजवर अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्याचे ध्येय आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक नक्कीच भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील, हा विश्वास आहे”.

एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

0
Newaworldmarathi Pune: पक्षश्रेष्ठी चे पुन्हा आदेश मानत सतीश बहिरट यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षा ची शिस्त राखन्यासाठी निष्ठावान कार्यकर्ता ची आवश्यकता आहे . जर पक्षा चे निष्ठावान चेहरेच संपून गेले तर पक्षा ची विचार धारा देखील संपून जाईल. आपण कष्टाने वाढवलेल्या पक्षा साठी या आधी उमेदवारी सोडली त्यात आजून एक ची भर अशी भावना बहिरट यांनी व्यक्त केली. बहिरट यांनी २०१७ प्रमाणे २०२५- २०२६ मध्ये देखील अनेकांचे लक्ष वेधले. बहिरट यांची उमेदवारी हा प्रभागांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांची तळागाळातल्या पक्षाच्या मतदारांपर्यंत पोच आहे. पक्षाचा स्थानिक चेहरा म्हणून बहिरट यांची अनेक वर्षांपासून त्यांच्या भागामध्ये ओळख देखील आहे. जर बहिरट हे पक्ष विरोधात उभे राहिले असते तर त्याचा मोठा फटका हा पक्षाच्या मतदानाला बसत होता असे सर्वत्रिक कार्यकर्ते व मतदारांमध्ये चर्चा रंगली होती. पण आता या चर्चेला पूर्णवीराम लागलेला आहे. पक्षनिष्ठा काय असते हे सतीश बहिरट यांनी पुन्हा दाखवून दिले. पक्ष त्यांना यंदाच्या वर्षी यथोगत सन्मान प्राप्त करून देईल अशी पूर्ण खात्री वरिष्ठांकडून सर्व कार्यकर्त्यांमध्ये देण्यात आलेली आहे. बहिरट यांच्या माघारी नंतर प्रभागामध्ये पुन्हा एकदा भाजपमय वातावरण प्रस्थापित झालेलं आहे.

पुण्यात भाजपनं खातं उघडलं; सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे; श्रीकांत जगताप बिनविरोध

0
पुणे महापालिकेची निवडणूक ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. अशातच पुण्याच्या सिंहगड रोड भागातून एका महिला नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा त्या निवडणूक लढवत होत्या. तर प्रभाग ३५ ड सर्व साधारण या गटातून भाजपचे श्रीकांत शशिकांत जगताप या बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला.

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; राणी भोसले यांच्यामुळे महिलांच्या हाताला मिळाले काम

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग ३८ च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार राणी भोसले यांनी नगरसेविका म्हणून कार्यरत असताना महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय आणि प्रभावी काम केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देत त्यांनी विविध उपक्रम राबवले. विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. या माध्यमातून अनेक महिलांनी घरबसल्या रोजगार सुरू केला असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात मोलाची भर पडली आहे. यासोबतच राणी भोसले यांनी महिलांसाठी कागदी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. या वर्गांद्वारे पर्यावरणपूरक व्यवसायाची ओळख करून देत महिलांना रोजगारनिर्मिती कशा पद्धतीने करता येईल, याचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी प्रत्यक्ष काम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत राणी भोसले यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून समाजात त्यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. या उपक्रमांना महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सहभागही लक्षणीय राहिला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राणी भोसले यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

प्रभाग ४० मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ

0
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार अधिकृतपणे सुरू झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे, दादाश्री कामठे आणि अलका बधे यांनी आपल्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला. प्रचाराच्या प्रारंभी कोंढव्याचे ग्रामदैवत कालभैरव नाथाचे दर्शन घेऊन आणि आशीर्वाद प्राप्त करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवताच्या दर्शनानंतर उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराची दिशा ठरवली. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर चर्चा करत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रचारादरम्यान उमेदवारांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर भर देणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे आणि पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रचाराच्या शुभारंभीच उमेदवारांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, घराघरांत जाऊन प्रचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ४० मध्ये काँग्रेसचा प्रचार आता वेग घेत असून, येत्या काळात तो अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0
Newsworldmarathi Pune: केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकासकामे शहरात झाली आहे. पुण्यात मेट्रो विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणेसाठी अधिक इ बसेस, २४/७ पाणी पुरवठा, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गास मंजुरी, विमानतळ नवीन टर्मिनल, चांदणी चौक विस्तारीकरण, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पुणेकर हे नेहमी विचार आणि कामाला साथ देतात त्याप्रमाणे मनपा निवडणुकीत नागरिक युतीला साथ देतील. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि पुण्यात दमदार विकास कामे सुरू आहे. पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्ण ताकदीने आम्ही मनपा निवडणूक लढत असून पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. बाजीराव रस्ता येथील भारत भवन याठिकाणी पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, आगामी मनपा निवडणूक अनुषगाने पुणे भाजप मिडिया सेंटर सुरू करण्यात आले आहे.या मिडिया सेंटर माध्यमातून पुढील १५ दिवस पक्षाचे वतीने अधिकृत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल. भाजप ,शिवसेना आणि आर पी आय यांची निवडणुकीत युती आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी ठराविक जागेपेक्षा एबी फॉर्म अधिक उमेदवार यांना दिले आहे. युती टिकली पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यानुसार सर्व चर्चा प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ९२ महिला यांना उमेदवारी दिली आहे. महिला यांच्यासाठी ८३ उमेदवारी ५० टक्के आरक्षण नुसार दिले पाहिजे परंतु आम्ही अधिक महिला उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. शिवसेनाला १६ जागा देण्यास आम्ही तयार भाजपचे १०५ नगरसेवक मागील निवडणुकीत होते आणि तरी आम्ही युती करणार सांगत होतो. शिवसेनेच्या कमी जागा असतानाही ते ठराविक संख्यापेक्षा अधिक जागा मागत होते. आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे युती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. उमेदवारी जागा बाबत मतमतांतर होते पण आता हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करत आहे. स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही म्हणून हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर गेला आहे. शिवसेना यांनी १५० एबी फॉर्म दिले असतील तर त्याबाबत मला देखील प्रश्न आहे त्यांनी अधिक फॉर्म का दिले. आम्ही शिवसेना यांना १६ जागा देण्यास तयार होतो. त्यावरील काही जागांचा प्रश्न असेल तर त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. आरपीआयला आम्ही ८ जागा सोडलेल्या आहे असे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.