विकासात पुणे होणार अव्वल : आबा बागुल
Newaworldmarathi Pune: पुणे शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांना प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागासह शहराचा विकास गतिमान करणार असून विकासात निश्चितच पुणे अव्वल ठरणार असल्याचा ठाम विश्वास प्रचाराच्या शुभारंभावेळी आबा बागुल यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस यांच्या सारंग येथील शिवसेना निवडणूक मुख्य कचेरीचे उदघाटन पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री आबा बागुल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिवदर्शन, तावरे कॉलनी, संजय नगर वसाहत, गवळीवाडा, अण्णाभाऊ साठे वसाहत यासह प्रभागात विविध ठिकाणी पदयात्रा काढून आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस यांनी नागरिकांशी संवाद साधला.
ठिकठिकाणी आबा बागुल यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी ‘आमचे मत विकासाला, हक्कांच्या माणसांनाच’ अशी ग्वाही नागरिकांनी दिली तर आबा बागुल यांनी तुम्ही पाहिलंय,तुम्ही अनुभवलं,माझा ध्यास विकासाचाच सदैव आहे. कारण हे नातं विश्वासाचं आहे.तुमच्याप्रती आत्मीयतेचं आहे.घोषणांपेक्षा कृतीवर भर,शब्दांपेक्षा कामातून निर्माण झालेला हा विश्वास आहे.त्यासाठी यंदा लक्षात ठेवा, धनुष्यबाण असे आवाहन केले. नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद देत विकासासाठी यंदा शिवसेनाच असा निर्धार व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा श्रीगणेशा
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ३८ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार राणी भोसले, व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, अश्विनी चिंधे व प्रतिभा चोरगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. उमेदवारांनी प्रभागातील विकास, नागरी सुविधा व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपला भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ सद्गुरू शंकर महाराज मठाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी विधिवत पूजा-अर्चा करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी परिसरात भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास आमदार भीमराव अण्णा तापकीर, बाबासाहेब मिसाळ, आबा शिर्डीमकर, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, रोहिदास बापू चोरगे, समीर धनकवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रभागातील विकास, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील विकास आराखड्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी योजना राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर नागरिकांचा विश्वास असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपला भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उमेदवारांच्या आलिशान गाड्यांच्या चर्चेत ही ‘माणुसकीची गाडी’ ठरतेय लक्षवेधी
Newsworldmarathi Pune: आलिशान गाड्या आणि झगमगाटाची चर्चा निवडणुकांच्या काळात नेहमीच ऐकू येते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक उमेदवारांच्या महागड्या गाड्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यात प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे आणि ते म्हणजे रुग्णवाहिका.
उमेदवारी अर्जासोबत घोषित केल्यानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान चारचाकी नसून, त्यांनी केवळ एक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांच्या सेवेत ही रुग्णवाहिका कार्यरत असते. राघवेंद्र मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथून निवडणूक लढवत आहेत.
रुग्णवाहिकेसोबतच त्यांच्या नावावर एक दुचाकी वाहन आहे. दैनंदिन कामकाजासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. आलिशान गाड्या आणि ताफ्यांच्या राजकारणात हा साधेपणाचा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे.
याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले, गुढीपाडव्याला वाहन खरेदीची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही रुग्णवाहिका खरेदी केली आणि तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेच्या कामासाठी तिची आवश्यकता होती. यापुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. एक दुचाकी आहे, आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक भेटतात, प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो.
प्रभाग 38 मध्ये राणी भोसले यांचे उत्स्फूर्त स्वागत; महिलांचा भक्कम पाठिंबा
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३८ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार राणी भोसले यांचे प्रभागात उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून राणी भोसले यांनी प्रभागातील नागरिकांशी संपर्क वाढवला असून, विविध ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. विशेषतः महिलांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
राणी भोसले यांनी नगरसेविका असताना प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच दैनंदिन नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासाबरोबरच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून, विशेषतः महिला संघटन उभे करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
महिलांना संघटित करून त्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक व पक्षाच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे काम राणी भोसले यांनी प्रामाणिकपणे केले आहे. याच कामाच्या जोरावर आणि आपुलकीच्या स्वभावामुळे आज प्रभागातील महिला मोठ्या संख्येने राणी ताईंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहत आहेत.
राणी भोसले यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक ३८ मधील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, भाजपासाठी ही उमेदवारी महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
विकासाचा निर्धार करून प्रमोद नाना भानगिरे यांनी फोडला प्रचाराचा नारळ
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४१ मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी नारळ फोडून आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली आहे. प्रचाराच्या प्रारंभीच कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
प्रभाग ४१ मध्ये सध्या शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू असून, घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद, तसेच परिसरातील प्रश्नांची माहिती घेत भानगिरे प्रचारात सक्रिय झाले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांकडून प्रमोद नाना भानगिरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. शिवसेनेच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी भानगिरे यांना पाठिंबा दिला आहे. कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत प्रचारात जोमाने काम सुरू केले आहे.
प्रभाग ४१ मधील विकासकामांना गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे भानगिरे यांनी यावेळी सांगितले. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग ४१ मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक वेगाने वाढताना दिसत आहे.
राजकारणा पलीकडची जिव्हाळ्याची नाती! गणेश बिडकरांकडून राजपाल, थोपटे अन् बारणे कुटुंबीयांची भेट
Newaworldmarathi Pune : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार, बैठका आणि राजकीय गणिते सुरू असताना प्रभाग क्रमांक 24 ड चे उमेदवार तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जिव्हाळ्याच्या नात्यांना प्राधान्य देत आज पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत संवाद साधला.
दिवंगत माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निवासस्थानी जाऊन बिडकर यांनी राजपाल कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. मोहनसिंग राजपाल हे महापौर असताना गणेश बिडकर यांना स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या आपुलकीच्या भेटीवेळी त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी कुटुंबियांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले, “स्वर्गीय मोहनसिंग राजपाल यांचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक, संयमी स्वभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. पुण्याचे पहिले शीख महापौर म्हणून मोहनसिंग राजपालजी यांनी घेतलेले अनेक दूरदृष्टीपूर्ण आणि धाडसी निर्णय आजही शहराच्या विकासासाठी दिशादर्शक ठरत आहेत”.
दरम्यान, काँग्रेसचे माजी नगरसेवक स्व. सीतारामभाऊ थोपटे तसेच माजी नगरसेविका स्व. शोभाताई बारणे यांच्या निवासस्थानी देखील आज गणेश बिडकर यांनी सदिच्छा भेट देत कुटुंबीयांची संवाद साधला.
निवडणूक म्हणजे केवळ सत्ता आणि आकडेमोड नव्हे, तर शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या नेत्यांचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकी जपणेही तितकेच महत्त्वाचे असते, हे या भेटीतून अधोरेखित झाले. राजकारणापलीकडची नाती जपणाऱ्या गणेश बिडकर यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
प्रभाग 24 मध्ये गणेश बिडकरांना वाढता पाठिंबा! मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Newaworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा राजकीयदृष्ट्या अधिकच महत्त्वाचा ठरत असून, येथे भारतीय जनता पक्षाला मिळणारा समर्थनाचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गेला अनेक वर्षांमध्ये गणेश बिडकर यांनी सातत्याने प्रभागात केलेल्या विकास कामांमुळे सर्वच स्तरातून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा वाढत आहे. आज प्रवेश केलेल्यांमध्ये मनसेचे उपविभाग प्रमुख रवी उर्फ बंडू भोसले, शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच प्रीतम गायकवाड, योगेश पाष्टे, अजय चव्हाण, संतोष टिळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रवेशांमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने अधिकच झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मनसेत कार्यरत असतानाच रवी उर्फ बंडू भोसले हे वीरचक्र मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, युवकांचे संघटन आणि थेट नागरिक संपर्क हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गणेश बिडकर यांना मिळणारा स्थानिक पाठिंबा वाढताना दिसत आहे.
“गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार सहज मिळू लागले आहेत. ‘लाईट हाऊस’सारख्या उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. हे सर्व प्रत्यक्ष काम पाहता, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश बिडकर हेच योग्य नेतृत्व आहेत”, अशी भावना प्रवेशावेळी रवी उर्फ बंडू भोसले यांनी व्यक्त केली.
हाती धनुष्यबाण घेऊन प्रभाग 36 ड मधून आबा बागुल उतरले निवडणुकीच्या रिंगणात
Newsworldmrarathi pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उद्या अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात युती होण्याची चर्चा सुरू असली तरी, भाजपकडून निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबल्याने शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शिवसेना (शिंदे गट) कडून अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून, पुण्यात ही शिवसेना स्वतंत्र ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत अनेक अनुभवी व वजनदार नेत्यांनी प्रवेश केला. त्यामध्ये माजी उपमहापौर आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले उल्हास उर्फ आबा बागुल यांचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती परिसरात विकासाचा सातत्यपूर्ण चेहरा म्हणून आबा बागुल शहरभर परिचित आहेत.
सुमारे ३० ते ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आबा बागुल यांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, उद्याने, सामाजिक सभागृहे, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच इतर मूलभूत नागरी सोयी-सुविधांवर भरीव काम केले आहे. ‘काम बोलते’ या भूमिकेतून त्यांनी कायम राजकारण केल्यामुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी मिळवला असून, आजही तो कायम आहे.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमध्ये आता आबा बागुल यांची थेट लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांशी होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष विकासकामांचा अनुभव, जाती-धर्मापलीकडे सर्व समाजघटकांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि सहजस्वभावी व्यक्तिमत्त्व यामुळे ही लढत चांगलीच रंगणार असून, प्रभाग ३६ ची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यात ‘राजस्थान भवनाच्या उभारणीसाठी जागा देण्याची मागणी : मगराज राठी
Newsworldmarathi Pune: शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या राजस्थानी समाजासाठी स्वतंत्र ‘राजस्थान भवन’ उभारण्यासाठी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी समस्त राजस्थानी समाज संघाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात संघाचे संस्थापक मगराज राठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
यासोबतच केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पुणे ते जोधपूर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली असून तसे पत्रही देण्यात आले आहे. त्याचबरोबर, केंद्रिय उड्डाणमंत्री केआरएमजी नायडू केंद्रिय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुणे ते उदयपूर थेट विमानसेवाही सुरु करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
राजस्थानी समाज संघाकडून देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजस्थानची कला, संस्कृती व परंपरा देश-विदेशात प्रसिद्ध असून पुणे शहरात शिक्षण, वैद्यकीय उपचार व व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर राजस्थानी समाज वास्तव्यास आहे. पुण्यात सध्या अंदाजे १७ ते १८ लाख राजस्थानी समाजाची लोकसंख्या असूनही येथे अद्याप कोणतेही अधिकृत ‘राजस्थान भवन’ किंवा विश्रामगृह उपलब्ध नाही.
राजस्थानी समाजातील विद्यार्थी तसेच उपचारासाठी पुण्यात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना निवासाच्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुण्यातील योग्य ठिकाणी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून दिल्यास, राजस्थान भवनाचे बांधकाम जनसहयोगातून करण्यास संघ पूर्णतः तयार आहे.
तसेच, रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्यास आणि थेट विमानसेवा सुरु केल्यास दळणवळणासाठी फायदा होईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. या निवेदनाच्या प्रती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही देण्यात आल्या आहेत.
वृद्धाश्रमातील आजीबाईंचेही दणक्यात ‘थर्टी फर्स्ट’; मधुरा गेठेंनी भरविलेला ‘माहेरवाशीण’ सोहळा आजीबाईंनी फुलवला
Newsworldmarathi Pune: वृद्धाश्रमातील सगळ्या आजींच्या डोळ्यांत उत्सुकता होती आणि प्रतीक्षाही होती. ती, ‘माहेरची साडी’ कशी असेल, कोण आणेल ? याची ! सगळीकडे ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम माहोल असताना, एका वृद्धाश्रमातील साऱ्या आजीबाई ‘माहेरवाशीण’ झाल्या अन् चक्क दोन-चार तास आपल्या हक्काच्या माहेरच्या जुन्या आठवणींत रमल्या. तेव्हा काही जणींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ‘आरबीजी फाउंडेशन’च्या मधुरा गेठेंचा आपलेपणा पाहून आनंदाने हसल्याही…
हा योग जुळून आला होता, नवी मुंबईमध्ये कार्यरत आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्यामुळे. विशेष
म्हणजे, या आजीबाईंना खरोखरीच माहेरची ऊब देण्यासाठी मधुरा गेठेंनी साऱ्या जणींना ‘माहेरची साडी’ दिली. तेही प्रत्येक आजीबाईला हव्या त्या रंगाच्या, डिझाइनच्या दोन-दोन साड्या निवडता आल्या. याक्षणी आजीबाईंच्या डोळ्यांमध्ये कौतुकाचे हसूही लपून राहिले नाही.
वृद्धाश्रमातल्या सगळ्या आज्जीबाई बुधवारी सकाळी छान तयार होऊन आल्या होत्या. वृद्धाश्रमात येण्यामागची प्रत्येकीची कहाणी निराळी, दुःखही वेगळे. पण नव्या वर्षाला सामोरे जाताना, या आपुलकी, मायेने भरलेला हा कार्यक्रम सगळ्याच आजीबाईनी चांगला फुलवला. आरबीजी फाउंडेशन आणि मधुराताई गेठे यांच्याप्रती सगळ्या आजीबाईंनाी कृतज्ञता तर व्यक्त केलीच; पण लाख मोलाचे आशीर्वादाचे धनही दिले.
या सोहळ्याबाबत बोलताना मधुरा गेठे यांनी आपल्या
भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, ‘’आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महिलेला माहेरची ओढ असते. ती ओढ उतारवयातही आठवणींत ओढते आणि व्याकूळ करते. माहेरचा आनंद आजीबाईंच्या चेहरा यावा, तो टिकून राहावा, या कौटुंबिक भावनेतूनच आम्ही एकमेकांशी बोलत होतो. त्यातून प्रत्येकजणी आज काही तास का होईना पण माहेरी आले, असे वाटले. यानिमित्ताने केक कापून सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नववर्षाचे स्वागत झाले. याचेही समाधान आम्ही आज वाटून घेतलं. ‘’
आजींसोबत चिमुरडयांचीही धमाल…
वृध्दाश्रम रंगलेल्या या सोहळ्यात आजीबाईंसोबत चिममुरडेही उत्साहाने सहभागी झाले आणि एकाच वेळी आजी, आजोबा आणि नातवंडांचा गोतावळाच पाहायला मिळाला. चॉकलेट आणि केक कापून या बालगोपाळांनी नाताळचे सेलिब्रेशन केले. या सगळयांच्या आनंदाने कार्यक्रमाला कौटुंबिक साज चढला.

