गोखलेनगर–जनवाडी प्रभाग ७ मधील भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांची उमेदवारी अडचणीत

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर–जनवाडी येथील भाजपच्या अधिकृत उमेदवार रेश्मा भोसले यांची उमेदवारी सध्या अडचणीत सापडली आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने रेश्मा भोसले यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला असून, त्यांच्यावर मालमत्तेची थकबाकी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आक्षेपामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या या आक्षेपावर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार असून, त्यानंतर रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सुनावणीच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी कायम राहणार की रद्द होणार, याबाबतची उत्सुकता कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. रेश्मा भोसले या माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी असून, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे या आक्षेपाचा राजकीय परिणामही मोठा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी योग्य असून, आक्षेप निराधार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे, आपकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. आता चार वाजता होणाऱ्या सुनावणीनंतरच या प्रकरणावर शिक्कामोर्तब होणार असून, प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक लढतीची दिशा त्यावर अवलंबून राहणार आहे.

प्रभाग २२ मधून अर्चना तुषार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
Newsworldmartahi Pune: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २२ (क), काशेवाडी डायस प्लॉटमधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रभागातील नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. अर्चना पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीची, प्रशासकीय अनुभवाची आणि प्रभागातील सातत्यपूर्ण विकासकामांची दखल घेत भाजपकडून त्यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रसंगी तुषार पाटील, उत्तमराव जाधव, रजनी जाधव, अमर जाधव यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार उपस्थित होता. तसेच विक्रम खेनट, राहुल मोहिते, मनीषा गायकवाड, रेहान भाभी, मीरा बीघे, परवीन कोटालीया यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला. नगरसेविका म्हणून कार्यरत असताना अर्चना पाटील यांनी प्रभागातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तत्काळ सोडविणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते. कोरोना काळातही त्यांनी गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य वाटप, औषधोपचार मदत, आरोग्यविषयक उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली. आगामी निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन अर्चना पाटील पुन्हा एकदा जनतेसमोर उभ्या राहिल्या असून, नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

विकासाचा संकल्प करून राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील मध्यवस्तीचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने व भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी मा. नगरसेवक दिलीप काळोखे, मा. नगरसेविका गायत्री खडके, भाजपा कसबा मतदार संघाचे अध्यक्ष अमित कंक, प्रभाग २५ चे भाजपा अध्यक्ष सुनील रसाळ आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते. गेल्या दहा वर्षात पक्ष संघटनेच्या विविध पदांवर केलेले काम आणि प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समस्यांचे केलेले निराकरण या मुळे पक्षाने संधी दिली असून या संधीचे सोने करीन, असा विश्वास बाप्पु मानकर यांनी या वेळी व्यक्त केला. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधील ब गटातून बाप्पु मानकर यांना उमेदवारी जाहीर झाली. बाप्पु यांच्याबरोबरच या प्रभागात स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेली नऊ वर्षे बाप्पु मानकर यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले असून या कामांच्या जोरावर पक्षाने आपल्याला संधी दिली असल्याच्या भावना बाप्पु मानकर यांनी व्यक्त केल्या. पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या असंख्य तक्रारींचे निवारण केल्याने बाप्पु मानकर हे प्रभागात सर्वश्रुत होते. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला त्यांचा जनसंपर्कही या उमेदवारीसाठी महत्वाचा ठरला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील जनता जाणती असून भारतीय जनता पक्षाने देशात, राज्यात आणि पुणे शहरात केलेल्या सर्वांगीण विकासाच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे राहतील आणि प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वासही बाप्पु मानकर यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबई मनपा वॉर्ड १३५ मधून नवनाथ बन यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

0
Newsworldmarathi Pune: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे महाराष्ट्र राज्य माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १३५ मधून शेकडो समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. अर्ज दाखल करताना परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना नवनाथ बन म्हणाले की, या परिसरातील मूलभूत समस्या, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा मला पूर्णपणे माहीत आहेत. जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून, विजयाचा पूर्ण विश्वास मला आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, दर्जेदार नागरी सुविधा, पारदर्शक कारभार आणि वॉर्ड क्रमांक १३५ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे विकासाचे धोरण आणि भाजपची कार्यसंस्कृती घेऊन आपण मतदारांपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वॉर्ड क्रमांक १३५ मध्ये भाजपचा विजय निश्चित असून, ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा ठाम आत्मविश्वास नवनाथ बन यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपला सोडचिठ्ठी; अमोल बालवडकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी

0
Newsworldmarathi Pune: भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अमोल बालवडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अमोल बालवडकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमोल बालवडकर म्हणाले की, माझ्या आयुष्यातील कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन. कोणताही पक्ष मोठा व्हावा, मात्र त्या पक्षाने पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपामध्ये कार्यरत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे सांगत त्यांनी थेट भाजपवर टीका केली. पुढे बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, आता अमोल बालवडकर भाजपाला दाखवून देईल की खरा कार्यकर्ता म्हणजे काय असतो. या निवडणुकीत भाजपाला ‘धोबीपछाड’ देणार असून, ही कृती वचपा काढण्यासाठी नाही तर धोका देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमोल बालवडकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आणि उमेदवारीमुळे पुण्यातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नगरसेवक नसतानाही ९ वर्षांपासून २४ तास खुले ‘जनसंपर्क’ कार्यालय; बाप्पु मानकर यांना भाजपची उमेदवारी

0
Newaworldmarathi Pune: पुणे शहरातील पहिले २४ तास खुले जनसंपर्क कार्यालय सुरु करत, नगरसेवकपद नसतानाही गेल्या ९ वर्षांपासून २४x७ उपलब्ध राहणाऱ्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांना भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) येथून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. २०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. त्यावेळी याची जोरदार चर्चा झाली होती. गेल्या ९ वर्षांपासून हे कार्यालय आजपर्यंत अव्याह्तपणे सुरु आहे. भाजपचे शहरपातळीवरील पदाधिकारी म्हणून काम करत असतानाही हे कार्यालय सातत्याने सुरू ठेवत, त्यामाध्यमातून सुमारे ६ हजारांहून अधिक नागरिकांची कामे करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केला आहे. तक्रारी, अर्जांचा पाठपुरावा आणि प्रशासनाशी समन्वय या माध्यमातून हे कार्यालय नागरिकांसाठी व विशेषतः येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरल्याचे येथील नागरिक सांगतात. बाप्पु मानकर यांनी पक्षसंघटनेत पूर्णवेळ ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करताना, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरभर युवकांचे संघटन केले. एकीकडे शहरपातळीवरील काम सुरू असताना, दुसरीकडे प्रभागातील नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. शहरभर उभे केलेले संघटन, पक्षासाठी केलेले काम, आणि प्रभागातील दांडगा जनसंपर्क यामुळे भाजपच्या सर्वच वरिष्ठांनी त्यांना उमेदवारीची संधी देण्यासाठी अनुकूलता दाखवली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनांपासून ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत, पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडत, पक्षाने सोपवलेले काम प्रामाणिकपणे करण्यावर मी भर दिला. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. यामुळे पक्षाने मला संधी दिल्याचे, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’चे आयोजन.. कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी राबविलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेअंतर्गत बाप्पु मानकर यांनी मिशन स्वच्छ प्रभाग २५ अभियानाचे आयोजन केले होते. प्रभागातील गल्लीबोळात या अभियानाची टीम पोहोचली होती. कायमस्वरूपा अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचे आश्वासन या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

संघटन, संपर्क आणि सातत्यपूर्ण कामाने बाप्पु मानकर यांच्या उमेदवारीचा मार्ग केला सुकर..

0
Newaworldmarathi Pune : भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथून भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पु मानकर यांना उमेदवारी दिली आहे. पक्षसंघटनेतील विविध कार्यक्रमांचे नियोजन, शहरपातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि प्रभागातील नागरिकांशी टिकवून ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क या ‘मेरिट’वर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या सुमारे ९ वर्षांपासून बाप्पु मानकर पक्षसंघटनेत पदाधिकारी व पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे शहरभर संघटनेच्या कामासाठी कार्यरत असतानाच, त्यांनी प्रभागातील स्थानिक प्रश्नांकडेही सातत्याने लक्ष दिले. ‘भाजयुमो’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरभर युवकांची मोठी फळी उभारण्यात ते सक्रिय राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना, संघटनेने घेतलेल्या आंदोलनांमध्ये बाप्पु मानकर यांनी ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तत्कालीन सरकारविरोधात रान पेटवले होते. त्यांच्या भाजयुमो शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कोरोना दरम्यान केलेले रेमडीसीव्हीर इंजेक्शन साठीचे आंदोलन, कोविड काळात शालेय फी माफीसाठीचे आंदोलन, विद्यापीठ कायदाविरोधी आंदोलन अशी अनेक आंदोलने गाजली होती. ‘भाजयुमो’तील त्यांच्या संघटनात्मक कामाचा विचार करून पुढे पक्षाने त्यांच्यावर पुणे शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवत, शहर कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली. पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि शहरपातळीवरील उपक्रमांमध्ये संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची भूमिका महत्त्वाची राहिली. लोकसभा निवडणुकी दरम्यान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेसकोर्स येथील सभेचे नियोजन, पक्षाच्या राज्याव्यापी बैठका, व अनेक कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करत त्यांनी काम केले. २४ तास जनसंपर्क कार्यालय पक्ष संघटनेत काम करत असताना बाप्पु मानकर यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क तुटू दिला नाही. २०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील नागरिकांना कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्धता राहावी यासाठी हे कार्यालय सुरु केल्याचे मानकर यांनी सांगितले. शहरपातळीवरील संघटनात्मक कामाच्या व्यापातही नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. या कार्यालयाच्या माध्यमातून सहा हजारांहून नागरिकांची कामे मार्गी लागल्याची चर्चा या प्रभागात होत असते. शहरभर युवकांचे संघटन आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम केल्याची दखल घेत भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पुणेकर महायुतीला आशीर्वाद देणार, गणेश बिडकर यांनी भरला भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस उरला आहे. अद्यापही प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे उमेदवारी निश्चित करण्यात आलेल्या काही उमेदवारांना थेट पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा पहिला अर्ज माजी सभागृह नेते आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या रूपाने आज दाखल झाला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्र. २४ साठी गणेश बिडकर यांनी सोमवारी सकाळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हेमंत रासने यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापालिका निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. तसेच प्रभागातील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास बिडकर यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. संपूर्ण पुणे शहरात भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळून अर्ज दाखल करणारे गणेश बिडकर हे पहिले उमेदवार ठरले. बिडकर यांच्यासोबतीने प्रभागातील इतर तिन्ही उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरभरून मतदान केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही पुणेकर आमच्या मागे राहतील, जगातील सर्वात महत्त्वाचे शहर म्हणून पुणे जगाच्या नकाशावर यावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी गेल्या कार्यकाळात आम्ही अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्त्वास नेले आहे. येत्या कार्यकाळात पुण्याला आणखी पुढे न्यायचे आहे.”

भोसरीचे आमदार विलास शेठ लांडे यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

0
Newsworldmarathi पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार विलास शेठ लांडे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडे कुटुंबियांसोबत भोजनही केले. ही भेट राजकीय तसेच सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगमनावेळी माजी आमदार विलास शेठ लांडे यांचे सुपुत्र विराज विश्वनाथ लांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आपुलकीच्या वातावरणात चर्चा झाली. भोसरी परिसरातील विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात विविध मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला. विलास शेठ लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात परिसराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली. त्यांच्या घरी झालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ही स्नेहभावना आणि परस्पर आदराचे प्रतीक मानली जात आहे. या भेटीमुळे भोसरी परिसरातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी काळात स्थानिक पातळीवर सहकार्य आणि संवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

पर्वती विधानसभा मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग २१ ड मधून श्रीनाथ भिमाले भाजपाचे उमेदवार

0
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभा मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, प्रभाग क्रमांक २१ ड (मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क) येथून सर्वसाधारण पुरुष गटातून श्रीनाथ भिमाले यांनी भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पक्ष, तसेच इतर मित्र पक्षांच्या महायुतीतर्फे श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी देण्यात आली असून, पक्षाने त्यांच्या आजवरच्या सामाजिक व लोकहिताच्या कामांवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, पुण्यनगरीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ तसेच शहराध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे यांनी श्रीनाथ भिमाले यांना मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या संधीबद्दल श्रीनाथ भिमाले यांनी पक्षातील सर्व सन्माननीय वरिष्ठांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आजवर लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कामांचा प्रवास पुढील काळातही अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. देशहित आणि पुणेकरांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी तसेच पुणेकरांच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीनिशी कार्यरत राहण्याचा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.