विकासकामांसाठी भीमाशंकर मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा

0
Newsworldmarathi Pune: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यासाठी मंदिर तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील भाविकांचे लक्ष वेधले गेले असून यासंदर्भात प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू आहे. भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे. ही कामे सुरळीत व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी मंदिर काही कालावधीसाठी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. या संदर्भात झालेल्या बैठकीचा सविस्तर अहवाल तसेच भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मंजुरीनंतर आणि आदेश निर्गमित झाल्यानंतरच मंदिर बंद करण्याची अधिकृत घोषणा केली जाईल. प्रशासनाकडून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मंदिर बंद असताना विकासकामे जलदगतीने पूर्ण करून भाविकांसाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. दरम्यान, मंदिर बंद करण्याबाबतचा अंतिम आदेश कधी जारी होणार, तसेच बंद कालावधीची अचूक तारीख काय असेल, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांना विद्यार्जन बरोबरच कलागुणांना वाव देणे गरजेचे – पोलिस अधीक्षक तानाजी चिखले

0
Newsworldmarathi Pune: पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात संत तुकाराम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांचा ‘२०२५-२६’ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘भारतीय सांस्कृतिक वारसा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. या स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड हायवे सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.तानाजी चिखले, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. फुलचंद चाटे, सौ. वैशाली चाटे, प्राचार्य गौरव राऊत, सुवर्णा कुलकर्णी यांच्यासह शाळेचा सर्व शिक्षक कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित श्री.तानाजी चिखले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कष्ट आणि शिस्ती महत्वाची असून विद्यार्थी दशेत लागलेली शिस्त ही आयुष्यभरासाठी फायदेशीर होत असते. स्पर्धेचे युग असून वेळेचे नियोजन महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराने जिंकली एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवले. यामध्ये प्रामुख्याने ‘आम्ही मावळे होणार’ या सादरीकरणातून शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे भरतनाट्यम नृत्य सादर करण्यात आले. यासोबतच विविध देशभक्तीपर गीते आणि नृत्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. पालकांचा उदंड प्रतिसाद हा सोहळा पाहण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृहात पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. “द रिअल वे टू द रॉयल सक्सेस” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

तांदळाच्या नवीन हंगामामध्ये आंबेमोहोरांचे भाव तेजीत

Newaworldmarathi Pune: पुणेकरांचा विशेष पसंतीचा आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन हंगामाच्या सुरुवातीला यावर्षी सुद्धा 25 ते 30 टक्क्याहून वाढून घाऊक बाजारात 12000 ते 14000 प्रतिक्विंटल सुरुवात झाली आहे.गेल्या दोन वर्षात आंबेमोहोर तांदळामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली,भाव वाढीचे प्रमुख कारण नॉन बासमती मध्ये निर्यात व उत्पादन कमी. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहर तांदळांपैकी 80 टक्के तांदूळ मध्यप्रदेश मधून तर उर्वरित 20 टक्के तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो.यावर्षी सुद्धा या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे,त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी सुरुवातीलाच आंबेमोहर तांदळाची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो,हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो.विशेषता पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे.वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर,इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळांपैकी आंबेमोहोर चांगली मागणी आहे.त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचा दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते.महाराष्ट्रात कामशेत भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते काही वर्षांपूर्वी आंबेमोहोर सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते परंतु हा तांदूळ पिकवणाऱ्या पुणे,मावळ,भोर, कामशेत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनीला चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले म्हणून आंबेमोहर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे.तसेच आंबेमोहोर तांदळाच्या भाव वाढीमुळे पुणेकरांचा मावळ इंद्रायणी या तांदळाची मागणी वाढत आहे. यावर्षी देशातील तांदळाचे उत्पादन 1250 लाख टन एवढे आले आहे त्यामुळे आंबेमोहोर शिवाय बासमती, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळाचे दर वर्षभर स्थिर राहतील. नवीन हंगामातील तांदळाची आवक आज रोजी आली आणि त्याची विधीसर पूजा करून विक्रीस सुरुवात झाली. अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शाह यांनी दिली. घाऊक बाजारात नवीन तांदळाचे दर प्रतिक्विंटल बासमती 12000 ते 13000 इंद्रायणी 6000 ते 7000 सुरती कोलम 6000 ते 7000 घाऊक बाजारात आंबेमोहोर तांदळाचे मागील तीन वर्षातील प्रतिक्विंटल दर 2023-2024 7000 ते 8000 2024-2025 8000 ते 9000 2025-2026 12000 ते 14000

पुण्यात मोठी राजकीय घडामोड; प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाला राजीनामा, राष्ट्रवादी एकत्रीकरणाला विरोध ठरला कारण?

Newaworldmarathi Pune: पुणे शहरातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, या एकत्रीकरणास प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट विरोध दर्शविला होता. याच भूमिकेचा फटका त्यांना बसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुणे शहराध्यक्ष असतानाही या समितीतून प्रशांत जगताप यांना वगळण्यात आल्याने असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशांत जगताप पुढे काय भूमिका घेणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.

कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या पाचव्या भव्य चित्रप्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील कला चळवळीला चालना देणाऱ्या कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित पाचव्या भव्य चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दिनांक २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कला दालन, पुणे येथे भरविण्यात आले असून दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार आदरणीय प्रमोद कांबळे, आदरणीय रामकृष्ण कांबळे आणि मा. घनश्याम देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्यास कला क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनात संस्थेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विषयांवरील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या चित्रांमधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, रंगांचा समतोल आणि सृजनशील दृष्टी स्पष्टपणे जाणवते. निसर्ग, मानवी भावना, सामाजिक प्रश्न तसेच अमूर्त कलेचे विविध पैलू विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे चित्ररूपात सादर केले आहेत. उपस्थित कला प्रेमींनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे भरभरून कौतुक केले. यावेळी कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. पूनम पोटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कलेच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलाविषयक जाणिवा अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे चित्रप्रदर्शन नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत असून पुणेकर कला रसिकांकडून या उपक्रमाला विशेष दाद मिळत आहे.

भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल; पुणेकरांची भीमथडीत खरेदीची लयलूट

0
Newsworldmarathi Pune: अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भीमथडीच्या आजच्या 3 ऱ्या दिवशीही पुणेकरांचे पाय भीमथडीकडे वळले. ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी हाताने बनविलेले विविध पदार्थ खरेदी करताना पुणेकर दिसत होते. त्यामध्ये उन्हाळी पदार्थ, चिया सिड्स, गवतीचहा, पुदिना व आले पावडर, विविध मसाले, गावरान तूप, विवध प्रकारची लोणची, सिद्धटेकच्या प्रसिद्ध चमड्याच्या वस्तू आदी वस्तू खरेदी करताना पुणेकर दिसत आहेत. कर्जत–जामखेड विधानसभा मतदारसंघातील महिलांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनामुळे विविध महिला बचत गटांनी आपली उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, कापड, कंदी पेढे, लाकडी बैलगाडी, काठवट , पोळपाट, बेलने, अगरबत्ती, धूप, खारमुरे , गुडीशेव, गावरान गाईचे तूप, हस्तकला वस्तू, शेतीपूरक व स्थानिक उत्पादनांचा समावेश आहे. त्याच बरोबर मटन थाळी, चिकन थाळी, काळा मसाला मधील चिकन, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, उंबरहंडी, असे विविध खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. हीच बाब ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करत आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवतआहे. आज बचत गटातील महिला लाखो रुपयात आर्थिक उलाढाल करून दाखवत आहेत. भीमथडी उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळाले असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. महिलांचा हा पुढाकार भविष्यातील उद्योजकतेसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी भिमथडीला भेट द्यावी असें आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे www.bhimthadijatra.com या वेबसाईटवर पुढील 3 दिवसाचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ उपाय; श्रीनाथ भिमाले यांची सेवाभावी कार्यशैली

Newsworldmarathi Pune: प्रभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ती तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणे हेच माझे ध्येय आहे, असे ठाम मत पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा माजी सभागृहनेते, पुणे महानगरपालिका श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी व्यक्त केले आहे. प्रभागातील कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही व्यक्तीला समस्या भेडसावत असल्यास माझ्या कार्यकर्ता कार्यालयातून तात्काळ संबंधित ठिकाणी कार्यकर्ता पाठवला जातो आणि त्या नागरिकाची अडचण सोडवली जाते, असा विश्वासही त्यांनी दिला आहे. श्रीनाथ भिमाले हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून संघटन बांधणी, लोकसंपर्क आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात त्यांचा विशेष अनुभव आहे. पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते म्हणून काम करताना त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रभागातील नागरिकांसाठी कार्यकर्ता कार्यालय हे केवळ कार्यालय न राहता एक मदत केंद्र म्हणून कार्यरत आहे. लहान-मोठ्या तक्रारी असोत किंवा तातडीच्या समस्या, प्रत्येक बाबीवर तत्परतेने दखल घेतली जाते. या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये श्रीनाथ भिमाले यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे. लोकसभा समन्वयक प्रभारी या नात्यानेही त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणे, युवकांना जोडणे आणि जनतेशी थेट संवाद साधणे, या माध्यमातून त्यांनी प्रभावी नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे. “जनतेच्या प्रश्नांसाठी माझे दार नेहमी खुले आहे. नागरिकांच्या सेवेसाठीच माझे राजकारण आहे,” अशी भूमिका श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केली असून त्यांच्या या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रभाग ४० मधून स्वाती चिटणीस यांचा अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधील राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आला असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वाती चिटणीस यांनी अधिकृतपणे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सादर केल्याने प्रभागातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्वाती चिटणीस या युवा नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून संघटन कौशल्य, लोकसंपर्क आणि सामाजिक कार्यातील त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग हा त्यांच्या कार्याचा प्रमुख आधार मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद राहिला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची विश्वासार्ह आणि कार्यक्षम कार्यकर्ती अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ४० मधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही पाहायला मिळते. सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, युवकांशी संवाद तसेच स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. यामुळेच त्यांच्या उमेदवारी अर्जाची प्रभागात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. अर्ज दाखल करताना स्वाती चिटणीस म्हणाल्या की, “पक्षाने मला संधी दिल्यास त्या संधीचे निश्चितपणे सोने करेन. प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.” त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग ४० मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या स्वाती चिटणीस यांना नागरिकांची वाढती पसंती

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या स्वाती चिटणीस यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये त्या सातत्याने भेटीगाठी घेत असून नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा भर असल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास वाढत आहे. आज टिळेकर नगर परिसरात स्वाती चिटणीस यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत भेटीगाठी घेतल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. या संवादादरम्यान स्वाती चिटणीस यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व विकासात्मक कार्याची माहिती नागरिकांना दिली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन स्वाती चिटणीस यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, तसेच प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि व्यापारी वर्गाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीगाठी दरम्यान नागरिकांनीही आपल्या अपेक्षा, सूचना व समस्या मोकळेपणाने मांडल्या. स्वाती चिटणीस यांनी त्या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या या संवादात्मक आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

नगरपरिषद –नगरपंचायत निवडणुकांत भाजपाला यश; प्रभाग २१ मध्ये लाडू वाटप

0
Newaworldmarathi Pune: महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवत राज्यात नंबर एकचा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाकडून मिळालेल्या या विजयाबद्दल प्रभागातील प्रमुख दहा चौकांमध्ये नागरिकांना लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा आनंदोत्सव गुलटेकडी चौक, संत नामदेव शाळा चौक, संत ज्ञानदेव शाळा चौक, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, सिटी प्राईड थिएटर सातारा रोड, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस चौक, मार्केट यार्ड प्रेमनगर चौक, डॉ. आंबेडकर नगर चौक, संदेश नगर भिमाले कॉम्प्लेक्स तसेच ज्योती हॉटेल चौक, समता नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २१ (ब) ओबीसी महिला राखीव गटातील प्रमुख दावेदार सौ. समृद्धी अरकल-शेरला यांच्यासह संदीप शेळके, महेश कारंडे, ईश्वर वायाळ, बापू कांबळे, गणेश शेरला, महेश सकट, बसवराज गायकवाड, अविनाश गायकवाड, अनिल निळुलर, बाळासाहेब शेलार, चितामणी जगताप यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागरिकांना स्वतः लाडू बनवत व वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात तसेच उंटावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “जय श्रीराम” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाजपाच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.