२६ वर्षांनंतर नवा राजकीय टप्पा; प्रशांत जगताप थोड्याच वेळात करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पुण्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, प्रशांत जगताप थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे प्रशांत जगताप नाराज होते. विशेषतः शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेनंतर त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २६ वर्षे राष्ट्रवादीसोबत काम केलेल्या प्रशांत जगताप यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला पुणे शहरात संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या प्रवेशाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
वडगाव शेरीत शिवसेनेला जागा द्यावी : उध्दव गलांडे
Newsworldmarathi Pune: वडगाव शेरी प्रभाग पाच मध्ये शिवसेनेने अनेक वर्ष प्रतिनिधत्व केले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे गटाची) ताकद आहे. यामुऴे या प्रभागात किमान दोन जागा शिवसेना शिंदे गटासाठी द्यावेत अशी मागणी शिवसेना उपशहर संघटक उध्दव गलांडे यांनी पत्रकार परिषेदेत केली
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युती असली, तरी जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मधील शिवसैनिक (शिंदे गट)शिवसेना पुणे शहर उपशहर संघटक उद्धव गलांडे यांच्या संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला छाया रविंद्र गलांडे, रमेश साळुंके, चेतन गलांडे, शाहरुख कुरेशी, विपुल दळवी, विकास गायकवाड आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गलांडे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत खांद्याला खांदा लावून समान कष्ट घेतले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपातही शिवसेना शिंदे गटाला समान संधी मिळावी. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.
या मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक मतदान मिळत आले आहे. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. येरवडा येथे शिवसेनेचे तीन नगरसेवक होते. तसेच खराडी, लोहगाव आणि वाघोली भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद भक्कम आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी जागा देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळीवडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष हेमंत बत्ते यांनी सांगितले की, “वडगाव शेरी मतदारसंघात शिवसेना घराघरात पोहोचली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथे शिवसेनेने निवडणूक लढवणे आवश्यक आहे. त्यामुळे युतीत शिवसेनेला जागा सोडाव्यात.”
पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी सांगितले की, “वडगाव शेरीत निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने आहेत. संपूर्ण मतदारसंघात किमान प्रत्येक प्रभागात दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.
आजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांसाठी खुला; मुंबई महानगर प्रदेशाला मोठा दिलासा
Newsworldmarathi Mumbai : आजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या असलेली प्रवासी आणि उड्डाणांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा विमानतळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात अत्याधुनिक प्रवासी सुविधा, विस्तीर्ण व सुरक्षित धावपट्ट्या, आधुनिक टर्मिनल इमारती आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे. प्रारंभी निवडक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह विमानतळाची सेवा सुरू करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने उड्डाणांची संख्या आणि प्रवासी क्षमता वाढवण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
या विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण तसेच आसपासच्या औद्योगिक व व्यापारी पट्ट्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग, पर्यटन, सेवा क्षेत्र आणि रोजगारनिर्मितीला यामुळे गती मिळणार आहे. तसेच मुंबई शहरातील वाहतूक कोंडी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
एकूणच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली असून, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘गुरुजयंती’; संतांच्या मूळ पादुकांचे भव्य दर्शन: विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने आयोजन
Newaworldmarathi Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम घडवणारा ‘गुरुजयंती’ हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतातील विविध संत, महंत आणि शक्तीपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. समस्त भक्त मोहंबा रामदासी यांच्या विशेष प्रयत्नातून हा अभूतपूर्व सोहळा साकारला जात असून, श्रद्धाळूंना एकाच ठिकाणी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.
या सोहळ्यात प्रभु श्रीराम, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), गजानन महाराज शेगाव, श्री सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) तसेच पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भक्तांना घडणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी दत्त मंदिर, लोंढवाडी, मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन, महाप्रसाद आणि सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड प्रभाग ७ चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘गुरुजयंती’; संतांच्या मूळ पादुकांचे भव्य दर्शन: विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने आयोजन
Newaworldmarathi Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम घडवणारा ‘गुरुजयंती’ हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतातील विविध संत, महंत आणि शक्तीपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. समस्त भक्त मोहंबा रामदासी यांच्या विशेष प्रयत्नातून हा अभूतपूर्व सोहळा साकारला जात असून, श्रद्धाळूंना एकाच ठिकाणी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.
या सोहळ्यात प्रभु श्रीराम, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), गजानन महाराज शेगाव, श्री सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) तसेच पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भक्तांना घडणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी दत्त मंदिर, लोंढवाडी, मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन, महाप्रसाद आणि सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड प्रभाग ७ चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य, गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून २७ हजार नागरिकांना लाभ
Newsworldmarathi Pune: नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळावा या उद्देशाने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रांमुळे आतापर्यंत तब्बल २७ हजार नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. जवळपास प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती या सेवांचा लाभार्थी ठरल्याने जनसंपर्कादरम्यान नागरिकांकडून बिडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.
केंद्र, राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या विविध योजनांची अंमलबजावणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवार व रास्ता पेठ परिसरात महा ई-सेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली. या केंद्रांमधून उत्पन्न व रहिवासी दाखले, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड आदी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी ‘टीम बिडकर’च्या कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत आजवर ७ हजार विविध दाखले, ४ हजार १७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४ हजार ४२९ मतदान ओळखपत्र तसेच १ हजार ८०० ई-श्रम कार्ड वितरित करण्यात आली आहेत. एका ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून महा ई-सेवा केंद्र प्रभावीपणे कार्यरत असल्याचे चित्र आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आता पूना ऑर्गॅनिक
Newaworldmarathi Pune: देशभरात आरोग्यदायी आहार आणि शाश्वत जीवनशैलीबाबत वाढत्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर पूना ऑर्गॅनिक कंपनी ऑर्गॅनिक अन्न क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून पुढे येत आहे. शुद्धता आणि पारदर्शकतेवर भर देत कंपनी १०० टक्के नैसर्गिक, रसायनमुक्त आणि प्रमाणित ऑर्गॅनिक उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.
विश्वासार्ह व प्रमाणित शेतकऱ्यांशी थेट भागीदारी करून पूना ऑर्गॅनिक कंपनी उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रामाणिकता कायम राखते. शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या या उत्पादनांमध्ये कृत्रिम रसायने, कीटकनाशके व संरक्षकांचा वापर टाळण्यात येतो, तसेच नैसर्गिक पोषणमूल्ये जपली जातात.
कंपनीकडून तांदूळ, डाळी यांसारखी धान्ये व कडधान्ये, शुद्ध व नैसर्गिक मसाले, पोषणमूल्ये जपणारी कोल्ड-प्रेस्ड तेले तसेच ताजी सेंद्रिय भाजीपाला व इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात. प्रत्येक उत्पादन नैसर्गिक चव, ताजेपणा आणि आरोग्यदायी गुणधर्म टिकवून तयार केले जाते.
आरोग्यदायी अन्नपुरवठ्याबरोबरच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे हेही कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. न्याय्य खरेदी प्रक्रिया आणि दीर्घकालीन सहकार्याच्या माध्यमातून पूना ऑर्गॅनिक कंपनी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत आहे.
आरोग्यदायी खा, चांगले जगा आणि निसर्गाशी नाते जोडा’ या दृष्टीकोनातून पूना ऑर्गॅनिक कंपनी ऑर्गॅनिक अन्न बाजारात आपली भक्कम उपस्थिती निर्माण करत असून, वेगवान जीवनशैलीत आरोग्य आणि शाश्वततेचा समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.– राहुल देशमुख व्यवस्थापकीय संचालक पूना ऑरगॅनिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात थेट तुमच्या एसएमएसला उत्तर
Newsworldmarathi Team: नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात पाठवलेल्या एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा अन्य डिजिटल माध्यमांवरील संदेशांची स्वतः मुख्यमंत्री दखल घेत असून, अनेक प्रकरणांमध्ये थेट उत्तर दिले जात असल्याचे समोर आले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे.
नागरिकांकडून आलेल्या संदेशांवर केवळ दखलच घेतली जात नाही, तर संबंधित खात्यांना तात्काळ सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले जात आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, महसूल, पोलिस यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारींवर जलदगतीने हालचाली सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यावर त्वरित निर्णय घेणे, हा प्रशासनाचा विश्वास वाढवणारा बदल मानला जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य नागरिकांना थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून थेट प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासकीय यंत्रणेतही अधिक जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. एकूणच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा उपक्रम प्रशासनात सकारात्मक बदल घडवणारा ठरत असून, लोकशाही व्यवस्थेला अधिक बळ देणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
२६ वर्षांचा सहवास संपला; प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याने पुण्यात राजकीय चर्चा
Newsworldmarathi Pune: महापालिकेतील सत्ताकारण स्थानिक नेत्यांकडेच असावे, अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २६ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, “दोन्ही गट एकत्र येणार असतील तर मी पक्षात राहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका प्रशांत जगताप यांनी आधीच मांडली होती. अखेर त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत राजीनामा दिला. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना राष्ट्रवादीच्या दोन वरिष्ठ नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चा आहे. केवळ नाराजी व्यक्त केल्यामुळे एका अनुभवी स्थानिक नेत्याला डावलले गेले, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नेमके काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नेतृत्व नाराज होऊन बाहेर पडल्याने पक्ष संघटनेवर आणि आगामी महापालिका राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुगलचे हे प्रॉडक्ट तुम्हाला माहित आहेत?
Newaworldmarathi Team: तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे विविध प्रॉडक्ट्स आणि त्यांची माहिती आज सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी सहज उपलब्ध आहे. इंटरनेटच्या माध्यमातून गुगलने जगभरातील लोकांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि वेगवान केले आहे. सर्च इंजिन म्हणून ओळख मिळवलेल्या गुगलने कालांतराने अनेक उपयुक्त प्रॉडक्ट्स आणि सेवा विकसित केल्या आहेत.
गुगल सर्च, जीमेल, गुगल मॅप्स, यूट्यूब, गुगल ड्राइव्ह, गुगल फोटोस, गुगल कॅलेंडर यांसारखी प्रॉडक्ट्स आज कोट्यवधी लोक नियमितपणे वापरत आहेत. याशिवाय अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, गुगल क्रोम ब्राउझर, गुगल पे, गुगल मीट आणि गुगल क्लाउड यांसारख्या सेवा देखील महत्त्वाच्या ठरत आहेत. प्रत्येक प्रॉडक्टबाबत सविस्तर माहिती गुगलच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
गुगल आपल्या प्रॉडक्ट्समध्ये वेळोवेळी अपडेट्स आणि नवीन फिचर्स जोडत असते. वापरकर्त्यांची सुरक्षितता, गोपनीयता आणि सोयीसुविधा यावर कंपनी विशेष भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून गुगल अधिक स्मार्ट सेवा देत आहे.
आज शिक्षण, व्यवसाय, प्रवास, मनोरंजन आणि आर्थिक व्यवहार अशा विविध क्षेत्रांत गुगलची प्रॉडक्ट्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे गुगलच्या प्रॉडक्ट्सची माहिती जाणून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.
Google चे प्रमुख प्रॉडक्ट्स खालीलप्रमाणे आहेत
1) Google Search – इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी
2) Gmail – ई-मेल सेवा
3) Google Maps – नकाशे, दिशादर्शन, ट्रॅफिक माहिती
4) YouTube – व्हिडिओ पाहणे व अपलोड करणे
5) Google Chrome – वेब ब्राऊझर
6) Android – मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम
7) Google Drive – क्लाऊड स्टोरेज
8) Google Docs / Sheets / Slides – डॉक्युमेंट, एक्सेल, प्रेझेंटेशन
9) Google Photos – फोटो व व्हिडिओ स्टोरेज
10) Google Meet – व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
11) Google Pay (GPay) – डिजिटल पेमेंट
12) Google Assistant – व्हॉईस असिस्टंट
13) Google Play Store – अॅप्स, गेम्स, मूव्हीज

