Newsworldmarathi Pune: सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी ने यावर्षीही आपला प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. यंदा या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपल्या असाधारण कार्याने समाजाला नवी दिशा दिली आहे, त्यांच्या कौतुकाचे प्रतीक म्हणून ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान’ प्रदान करण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरूप:
हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील ९ कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या योगदानाचे सखोल मूल्यांकन करून दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप म्हणून सन्मान चिन्ह (ट्रॉफी), मानपत्र आणि रु. २१,०००/- (एकवीस हजार रुपये) रोख रक्कम ओमा फाउंडेशनकडून प्रदान केली जाते. हा प्रेरणादायी पुरस्कार सोहळा पुणे येथे लवकरच आयोजित केला जाणार आहे
‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान २०२५’ प्राप्तकर्त्या (९) महिलांची यादी:
यंदाच्या ‘नवदुर्गा २०२५’ सन्मानासाठी निवड झालेल्या कर्तृत्ववान महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
डॉ. साधना गोडबोले (एक्सिकॅटिव्ह चेअरमन आणि एम. डी., प्रसन्न ऑटिसम सेंटर, पुणे)
अंजली देशपांडे (चेअरमन, मधुर भाव फाउंडेशन, पुणे)
अंजली कुलथे (हेड नर्स, कामा हॉस्पिटल, मुंबई)
अनुराधा भोसले (प्रोग्राम कोऑर्डिनेटर, अवनी ऑर्गनायझेशन, कोल्हापूर)
हिना मुल्ला (सेक्रेटरी, मिक्स मार्शल आर्टस्, ठाणे जिल्हा)
कांचनमाला पांडे (आंतरराष्ट्रीय ब्लाइंड स्वीमर, नागपूर)
साळुंखा सुळे (मानमोडे शेतकरी उत्पादक कंपनी, नंदुरबार)
सुमेधा चिथडे (अध्यक्ष, सिर्फ फौंडेशन, पुणे)
योगिता गायकवाड (प्रस्टिन कश्यू)
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी सामाजिक बांधिलकी जपत, अशा गौरवशाली उपक्रमांतून समाज आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध आहे.
Newsworldmarathi Pune : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वषार्तून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, पुरातन काळापासून दस-याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते.
विजयादशमीला रात्री ९ वाजता प्रतिकात्मक रावणदहन कार्यक्रम
विविध सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर रात्री ९ वाजता करण्यात आले आहे. यावेळी तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात येईल. प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी केले आहे.
Newsworldmarathi Pune: २७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता आज महाआरतीने संपन्न झाली. शिवदर्शन-सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिरात एक हजारहून अधिक महिलांनी श्री लक्ष्मीमातेची महाआरती केली. प्रारंभी देवीची गाणी सादर केली गेली. वेदिका निकम हिने जोगवा सादर केला. त्यानंतर महाआरती संपन्न झाली.
तेव्हा सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. एस. सरोदे (प्रथम क्रमांक), माला कांबळे (द्वितीय क्रमांक), पद्मा धनगर ( तृतीय क्रमांक) याशिवाय असंख्य उत्तेजनार्थ ५०हून अधिक महिलांना बक्षिसे देण्यात आली.
अशा प्रकारे हा २७वा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यशस्वी झाला. विविध स्पर्धांमध्ये ५०००हून अधिक महिला सहभागी झाल्या आणि हा महोत्सव यशस्वी केला, याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.
Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात पर्वती मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २१ मधील प्रेमनगर आणि आंबेडकर नगर परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. परिसरातील विविध मंडळांनी भव्य सजावट, देवीची आरास आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय केले होते.
या पार्श्वभूमीवर मा. सभागृह नेते, पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमले यांनी विशेष भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्यांनी जय भवानी मित्र मंडळ, महिला मंडळ येडेश्वरी, महालक्ष्मी महिला मंडळ, विजय तरुण मंडळ, अखिल मातोश्री मित्र मंडळ, तुळजा भवानी महिला मंडळ, युवक क्रांती मंडळ, प्रेमनगर तरुण मंडळ, जय तुळजा भवानी महिला मंडळ, श्री ओम मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, जागृती मित्र मंडळ आणि महर्षीनगर युवक संघटना अशा अनेक मंडळींना भेट दिली.
Oplus_16908288
भेटीदरम्यान श्रीनाथ भिमले यांनी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधून नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर सामाजिक एकतेचा आणि सामुदायिक सहभागाचा द्योतक असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत आपुलकी व्यक्त केली.
या सोहळ्यातून समाजात एकात्मता, बांधिलकी आणि प्रगतीचा संदेश दृढ व्हावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली. प्रेमनगर आणि आंबेडकर नगर परिसरातील भक्तिमय वातावरणात झालेल्या या भेटीमुळे नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
Newsworldmarathi Pune: अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव यंदा भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरला. मा नगरसेविका अर्चना पाटील आणि उपाध्यक्ष तुषार पाटील व मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या “मार्तंड भैरव खंडोबाचा मंगल विवाह सोहळा” यांसारख्या भव्य जिवंत देखाव्यांनी भाविकांची मने जिंकली.
उत्सवाचा सर्वोच्च क्षण ठरला तो म्हणजे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला भव्य महिला महाआरतीचा सोहळा. हजारो महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या महाआरतीने देवीच्या जयघोषाने आणि मंगल आरतीच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देवीची महाआरती केली. कत्यानंतर त्यांनी महिला भगिनींशी आणि नागरिकांशी संवाद साधत “समाजात एकजूट आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे” असा संदेश दिला. पोलिस आयुक्तांचा सत्कार नगरसेविका अर्चना पाटील आणि उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केला.
या सोहळ्याला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या नियोजन आणि शिस्तबद्धतेमुळे कार्यक्रमाची शान अधिकच वाढली. अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या यशस्वी आयोजनामुळे हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक ऐक्य व समुदायभावनेचा एक प्रेरणादायी सोहळा ठरला.
Newsworldmarathi Pune: संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा यांची त्रैवार्षिक निवडणूक 2025 ते 2028 मराठा शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेजच्या सभागृहामध्ये नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीमध्ये राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सेक्रेटरी शिवाजी खांडेकर यांची संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
शिवाजी खांडेकर हे गेले 25 वर्ष शिक्षण चळवळीत काम करीत आहेत वेगवेगळ्या संघटनांमध्ये प्रमुख पदाधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांची भूमिका ते मांडत आले आहेत. यापुढील काळात विशेष करून मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्था चालक संघटनेतील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
संस्थाचालक शिक्षण मंडळाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली याप्रसंगी अनिल मेहेर, गणपतराव बालवडकर व प्रमिला गायकवाड यांनी शिवाजी खांडेकर यांचे निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वि. ल. पाटील यांनी कामकाज पाहिले.
Newsworldmarathi Pune: आई तुळजाभवानी प्रतिष्ठान, मा. नगरसेविका वर्षा साठे आणि ओबीसी अध्यक्ष भीमराव साठे यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव २०२५ चे औचित्य साधून रास दांडियाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
संध्याकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रंगीबेरंगी पोशाख, नृत्याची तालावर थिरकणारी तरुणाई आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दांडियाच्या उत्साहाने उजळून निघाला. महिलांनी आणि तरुणांनी पारंपरिक गार्बा व दांडियामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देवी आईची आरती पर्वती मतदारसंघाच्या रणरागिणी, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत करण दादा मिसाळही प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांचा सन्मान वर्षा साठे व भीमराव साठे यांनी केला. आरतीच्या वेळी वातावरणात भक्तिरस ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाला प्रशांत दिवेकर, प्रशांत थोपटे, मा. नगरसेविका दिपाली ओसवाल, अजयभाऊ भोकरे, विकास लवटे, संतोष लड्डा, मंदार रांजेकर, अरुणा पवार यांसह असंख्य मान्यवर उपस्थित राहिले. मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला व तरुणाई यांचा सहभाग लक्षणीय होता.
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसाठी केंद्र सरकारने ३३२ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली असून त्यामुळे पुणे शहरातील नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघात सिंहगड रस्ता परिसरातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, “अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेअंतर्गत या मलनिस्सारण प्रकल्पाची एकूण किंमत १,४३७.९४ कोटी रुपये असून, त्यापैकी ५३३.८५ कोटी रुपयांचे काम आधीच मंजूर झाले आहे. त्यात नव्याने ३३२.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला गती मिळणार आहे.”
मोहोळ पुढे म्हणाले, “या आराखड्यांतर्गत जुन्या ड्रेनेज लाईन्स बदलण्यात येणार असून जवळपास ४७२ किलोमीटर नवीन पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. यासोबतच ८ नवीन मलशुद्धीकरण केंद्रे (STPs) उभारली जाणार असून त्यांची एकत्रित क्षमता २०१ एमएलडी (मिलियन लिटर प्रति दिवस) इतकी असेल.”
खडकवासला, नऱ्हे, जांभुळवाडी, नांदोशी, किरकटवाडी पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, किर्कटवाडी, भिलारवाडी, सुस, म्हाळुंगे, गुजर निम्बाळकरवाडी, आणि मंगदेवाडी या गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती ही मोहोळ यांनी दिली.
पुणेकर नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीतील हा मोठा टप्पा आहे. समाविष्ट गावांमध्ये स्वच्छ व शास्त्रशुद्ध मलनिस्सारण यंत्रणा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण !
सामान्य पुणेकरांच्या समस्या प्रश्न अडीअडचणी सुटाव्यात यासाठी मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन वेळा हे अभियान राबवण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. नागरिकांचे प्रश्न या अभियानाद्वारे सुटत असल्याने दिवसेंदिवस या उपक्रमात अधिकाधिक पुणेकर सहभागी होताना पाहायला मिळत आहेत.
Newsworldmarathi Pune: भंडारी समाजसेवा ट्रस्ट, रेणुका माता मंदिर, केशवनगर येथे सुरू असलेल्या 25 व्या रौप्यमहोत्सवी नवरात्र उत्सवानिमित्त भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देवी रेणुका मातेस दर्शन देऊन आरतीचा लाभ घेतला. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
भंडारी समाजसेवा ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. या विशेष वर्षात म्हणजेच रौप्यमहोत्सवी उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक नागरिक, महिला मंडळे आणि तरुणाई उत्साहाने सहभागी होत असून उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Oplus_16908288
धीरज घाटे यांनी रेणुका मातेसमोर समाजातील ऐक्य, सुख-समृद्धी व जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. या भेटीवेळी त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी भंडारी समाजसेवा ट्रस्टच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ट्रस्टच्या वतीने मा. सभागृहनेते श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी धीरज घाटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी घाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
Newsworldmarathi Pune: २७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आयोजित म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. सुरेल गाण्यांच्या साथीने खेळलेली ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, महिलांना आनंद, मैत्री आणि स्नेहबंध दृढ करण्याची संधी ठरली.
ही स्पर्धा पुण्यातील सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित आणि आकाश सोळंकी यांच्या मधुर गायनाने घेण्यात आली. त्यांच्या गायनामुळे वातावरण अधिकच रंगतदार व सुरेल झाले.
शिवदर्शन–सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या या स्पर्धा कार्यक्रमात प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सामूहिक आरती झल्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. यामध्ये २००हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला पुढीलप्रमाणे –
1st Row – रतन मोरे
2nd Row – नंदा भट्टड
3rd Row – शकुंतला सिकची
4 Corner – सुप्रिया पुरोहित
1st Five Songs – दीपाली घाटे
Full हाऊजी – वर्षा बेंद्रे
विजेत्या महिलांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमामुळे महोत्सवात उत्साह, हास्य आणि आनंदाची रंगत भरली. महिलांच्या जोशपूर्ण सहभागामुळे वातावरणात खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव रंग चढला.
याप्रसंगी श्रुतिका बागुल, वृषाली बागुल आणि वैष्णवी वाघोलीकर यांची विशेष उपस्थिती होती.