स्त्री शक्ती फाउंडेशनच्या प्रशिक्षण बॅचचा उत्साहात समारोप; संध्या टिळेकर यांचा कौतुकास्पद उपक्रम
Newsworldmarathi Pune : “स्त्री शक्ती फाउंडेशन” आयोजित रांगोळी, आरी वर्क, कुकिंग आणि बेकिंग या प्रशिक्षण बॅचचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याचा संकल्प केलेल्या या महिला आता स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.
“स्वावलंबी महिला, सक्षम समाज” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेला हा उपक्रम आज खऱ्या अर्थाने फळाला आला आहे, असे स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या योगेश टिळेकर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे महिलांनी केवळ कौशल्य मिळवले नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण केली आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनीही आपले अनुभव मांडताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे त्यांना केवळ हाताला कामच मिळाले नाही, तर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची ताकद मिळाली आहे.
संध्या टिळेकर यांनी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फाउंडेशनकडून महिलांसाठी शिवणकाम, आरी वर्क, रांगोळी, पाककला, मेकअप, बेकिंग यांसारख्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेले हे प्रयत्न समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालणाऱ्या या महिलांनी आज नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अशा उपक्रमांमुळे “स्त्री शक्ती फाउंडेशन” हे नाव महिलांच्या प्रगतीचा आणि सामाजिक सक्षमीकरणाचा पर्याय बनले आहे.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानकडून पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची मदत
Newsworldmarathi Pune: मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने ५१ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मदतींचा धनादेश करण्यात सुपूर्द करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानी मुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना संघटनेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. यापूर्वी राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली होती.
दरम्यान सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पुणे पत्रकार प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी डुडी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त राजेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार उमेश शेळके, मुस्तफा अत्तार, गजानन शुक्ला आदी उपस्थित होते.
मल्हार सानपने दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली
Newsworldmarathi Pune: सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पी एम डी टी ए (पुणे मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन) यांच्या वतीने आयोजित दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मल्हार सानपने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. उपांत्य फेरीत मल्हारने आहान नारगोळकर यांच्याविरुद्ध चुरशीच्या लढतीत ५-४ (३) असा टायब्रेकमध्ये विजय मिळवला.
मल्हारने संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत मल्हारने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत आपली प्रतिभा सिद्ध केली. अंतिम सामन्यात मल्हारकडून आणखी सरस खेळाची अपेक्षा आहे. पी एम डी टी ए आयोजित ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे.
मल्हारच्या या यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनी अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात मल्हार कोणत्या रणनीतीने खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी
Newsworldmarathi Pune: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेसह महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक संघटना, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन तसेच कासार सोशल ग्रुपच्या वाटीने देखील यावेळी मदतीचा धनादेश आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, “आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे.”
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस श्री. अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, कासार सोशल ग्रुपचे चंद्रशेखर रासने, तुकाराम रासने, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, मिलिंद केळकर, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे शिरीष राणे, दिलीप ठोंबरे आदी उपस्थित होते.
विविध संस्थांकडून लाखोंची मदत
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना पुणेच्या वतीने ५१ लाख ५१ हजार, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्या माध्यमातून ५ लाख, कासार सोशल ग्रुप पुणेच्या वतीने १ लाख २१ हजार, श्री. विठ्ठल दिनकर बोरकर यांच्या माध्यमातून १० हजार रुपये तसेच श्री. चंद्रशेखर तुकाराम झेडगे यांच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.
धनगर समाजाने विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे: कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांचे आवाहन
Newaworldmarathi Pune: धनगर समाजाने अधिवेशनातील विविध सत्रातील विविध विषयाची माहिती घेऊन त्या तज्ञ अनुभवी लोकांचे ऐकून विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी पुणे येथील सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात व्यक्त केले.
तसेच आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत विविध समाजाशी एकोप्याचे वातावरण निर्माण करायला हवे असे मत व्यक्त केले. धनगर समाजाने आता समाजाची सामाजिक व राजकीय ओळख निर्माण करायला हवी. आगामी काळात समाजातील तरुणांनी व्यवसाय व उद्योगाची वाट धरून स्वतःच्या उन्नतीचे मार्ग तयार केले पाहिजेत. धनगर समाजाचे सामाजिक संघटन देखील आगामी काळात निर्माण करून त्यामधून समाजाच्या उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर धनगर समाजाने आता ओबीसीचे नेतृत्व करावे असे मत मांडले. गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात आयोजित कार्यक्रमावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे नेते डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्राप्तिकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, संयोजक ॲड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, संतोष शिंदे, यशपाल रायभोगे, ज्ञानेश्वर नरुटे, गणेश सोनटक्के, गणेश दुगाने, धुळदेव टेळे, अनुजा जानकर, शंकर ढेबे, महादेव वाघमोडे, संतोष ढवळे, शालिनी शिंदे, ॲड. शिवाजी मदने, संतोष वरक, रमेश टकले, यशवंत गोवेकर, मनिषा दुगाणे, रसिका माने, प्रियंका सोनटक्के, अहिल्या गोफणे, स्वाती देवकाते, पूजा सोलनकर, स्वाती लवटे, अर्चना लाळगे, सुरेखा खरात, मनिषा मदने आदी उपस्थित होते.
यावेळी धनगर आरक्षणासाठी आजवर ज्यांनी उपोषण केले अशा उपोषणकर्त्या बांधवांचा गौरव कृषीमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत वाघमोडे, देवालाल मंडलिक, भगवान भोजने, जयप्रकाश हूलवाण, संतोष गोरड, महादेव नरवटे, रामराव कोल्हे यांच्या सह अनेक उपोषणकर्ते यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. विकास महात्मे म्हणाले, “धनगर समाज आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी नेहमीच एकवटलेला आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही. धनगर समाजाने शिक्षण, संघटन आणि हक्क यांची त्रिसूत्री अंगीकारली पाहिजे. समाजातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले तर आरक्षण आणि आर्थिक उन्नतीचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकसंघ व्हावे.”
प्रास्ताविकात ॲड. विजय गोफणे यांनी अधिवेशनाचे स्वरूप विशद केले. ‘आर्थिक सक्षमीकरण, उद्योगाच्या संधी व गरज, संस्थात्मक निर्मिती’, ‘सामाजिक सुधारणा, रूढी व परंपरा, विवाह पद्धती बदल, प्रबोधन व शैक्षणिक सुधारणा’, ‘समाज संघटन, संघटनात्मक संरचना, शाखा कार्यपद्धती, वार्षिक उपक्रम व नियोजन, केडर बांधणी’, ‘महिला सक्षमीकरण, चळवळीतला सहभाग, प्रबोधन व प्रशिक्षण, कुटुंब व्यवस्थापन आरोग्य, कायदे विषयक, प्रगतीच्या वाटा’, ‘नेतृत्व निर्मिती काळाची गरज राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व अन्य स्वरूपाच्या नेतृत्वाचा विकास’, ‘धनगर एसटी आरक्षण: वर्तमान स्थिती, भविष्यातील लढ्याचे नियोजन, छत्तीसगड प्रकरणाचे वास्तव’, ‘माध्यमातील धनगर समाजाचे स्थान, अडथळे, संधी, माध्यम हाताळणी, व्यवस्थापन व भागीदारी’ आदी विषयांवर चर्चासत्रे झाली.
आभार श्री. यशपाल रायभोगे यांनी मानले.
अधिवेशनातील ठराव
१) धनगर ST आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी
२) महाराजा यशवंतराव होळकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाला आर्थिक सक्षमीकरण करण्यास सहकार्य करावे
३) आरक्षण आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत
४) मेंढपाळना एट्रोसिटी कायद्याचे कवच देऊन त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण द्यावे
५) जे आदिवासींना ते धनगराना अशी योजना २०१९ पासून सरकारने आणली व १००० कोटी प्रत्येक वर्षी देणार होते त्याची १०० % अंमलबजावणी करावी व अनुशेष भरून काढावा
याप्रमाणे ठराव घेण्यात आले.
४५१ दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी शिधा वाटप
Newsworldmarathi Pune: द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीपूर्वी दृष्टीबाधित व्यक्तींसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ४५१ दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम नांदेड फाटा, सिंहगड रस्ता येथील शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात पार पडला. या कार्यक्रमाला पुणे शहर तसेच आसपासच्या परिसरातील दृष्टीबाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शहा आणि कार्यकारी संचालक परवेझ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा चे प्रेसिडेंट विवेक पाटसकर, सेक्रेटरी डॉ. समीर शास्त्री, प्रोजेक्ट लीडर स्वाती कोटलीकर, नारायण चांडक तसेच अभिनव सेवा फाऊंडेशनचे सुनील गोवर्धन उपस्थित होते. काश्मिरा ठाकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
दृष्टीबाधित व्यक्तींची दिवाळी आनंदाची आणि उत्साहवर्धक व्हावी, या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही संस्था १९६२ पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. संस्थेमार्फत दृष्टीबाधित निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम, १८ ते ३५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्निकल ट्रेनिंग सेंटर तसेच डोळ्यांच्या आजारांवरील उपचारासाठी अत्याधुनिक रुग्णालय अशा विविध प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील अनेक दृष्टीबाधित व्यक्तींना या प्रकल्पांचा लाभ होत असून, समाजकल्याणाच्या क्षेत्रात संस्थेचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
दक्षिण पुण्याच्या पाणी प्रश्नावर आमदार टिळेकर आक्रमक; संघर्ष दिवसानिमित्त दुचाकी रॅली
Newsworldmarathi Pune: दक्षिण पुण्याच्या पाणीप्रश्नावर गेल्या २३ वर्षांपासून सातत्याने लढा देत असून, आंदोलने, पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाच पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, तसेच पाईपलाइन टाकण्यात आल्या. तरीही कात्रज-कोंढवा परिसराला आजही एक दिवस क्लोजर या अन्यायकारक पद्धतीला सामोरे जावे लागत आहे.
महायुती सत्तेच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवित असताना, दिवाळीपूर्वी हा क्लोजरचा कलंक दूर करावा अशी ठाम मागणी विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी केली.
दक्षिण पुण्यातील पाणी समस्येबाबत ५ ऑक्टोबर २०२० रोजी स्वारगेट येथे आमदार टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी ४१ कार्यकर्त्यांसह टिळेकर यांना चार दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. या आंदोलनाच्या पाचव्या वर्धापनदिनी, शेकडो कार्यकर्त्यांनी आज दुचाकी रॅली काढून संघर्ष दिवस साजरा केला.
रॅलीनंतर पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, वृषाली कामठे, विरसेन जगताप, राणी भोसले, मनिषा कदम, प्रभाकर कदम, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, तुषार कदम, अनिल येवले तसेच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि उपअभियंता नितीन खुडे उपस्थित होते.
“आम्ही पाण्यासाठी जेलमध्ये गेलो, गुन्ह्यासाठी नव्हे” – आमदार टिळेकर
‘खून, मारामारी किंवा जमिनी हडप करण्याचे गुन्हे केले नव्हते; तर नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी आम्ही जेलमध्ये गेलो. तो दिवस काळा नव्हे, तर संघर्षाचा आणि अभिमानाचा आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित कामांना गती देऊन १५ एमएलडी पाणी वाढवून मिळावे. प्रशासनाने वेळ न दवडता पूर्ण दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करून नागरिकांना न्याय द्यावा.
वंडरसिटी येथे २३ कोटींच्या निधीतून १२५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. फक्त १० टक्के काम बाकी असून, लाईन टाकणे, पंप बसवणे तसेच भूसंपादन, वाहतूक परवानग्या यांमुळे काम काहीसे रखडले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. परिसरातील नागरिकांना वेळेत आणि पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकल्पाला आमदार योगेश टिळेकर यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले असून, काम पूर्ण झाल्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नाही.
नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका राघवेंद्र मानकर यांची भाजप पुणे शहर सरचिटणीसपदी पुनर्निवड
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी राघवेंद्र मानकर यांची पुनर्निवड करण्यात आली. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी घाटे यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत पुन्हा एकदा शहर कार्यकारिणीत मानकर यांना काम करण्याची संधी दिली. याबद्दल मानकर यांनी आभार व्यक्त केले.
मानकर यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पक्षाच्या ‘राष्ट्रप्रथम’ या विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवून ते कार्य करणार. त्यांनी पुढेही पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, नामदार चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार हेमंतभाऊ रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार्यास अधिक गती देण्याचे आश्वासन मानकर यांनी दिले.
त्यांच्या पुनर्निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुणे शहर भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवचैतन्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कोंढवे धावडेतील लक्ष्मी स्पर्श सोसायटीत सौर ऊर्जा प्रकल्पाचे भव्य उद्घाटन
Newsworldmarathui pune: कोंढवे धावडे परिसरातील लक्ष्मी स्पर्श ए, बी, सी अँड डी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या प्रतिष्ठित सोसायटीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सौर ऊर्जा प्रकल्पाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास सोसायटीचे सभासद, पदाधिकारी तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.
या उपक्रमामागे सोसायटीचे चेअरमन समीर महाले आणि सचिव मनोज गायकवाड यांचे विशेष प्रयत्न असून, त्यांच्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे साकार झाला. पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराला चालना देत सोसायटीचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाढत्या वीजदराच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र दांगट आणि सुधीर धावडे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढले. यावेळी पाहुण्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि अशा उपक्रमातून समाजात ऊर्जा बचत व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होईल, असे मत व्यक्त केले.
या सोहळ्यात सभासदांमध्ये पिंटू साळुंखे, ॲड. रवींद्र सुतार, गोरक्ष भरम, प्रसाद गायकवाड, नागेश पाटील, नितीन धावडे, नथु धावडे, वाघाजी निरगुडे, हनुमंत घाडगे या सदस्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला वेगळेच औचित्य प्राप्त झाले.
सोसायटीतील महिला वर्गानेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सामूहिक सहभागातून उभारलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प केवळ आर्थिक बचत घडवून आणणारा नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल करण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. भविष्यात अशा प्रकल्पांतून शाश्वत विकासाला चालना मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी म्हणजे विश्वास, प्रगती आणि सहकाराची परंपरा
Newsworldmarathi Team: भारतातील सहकार क्षेत्र हे सामान्य जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या परंपरेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी पारदर्शक कार्यपद्धती, ग्राहककेंद्री सेवा आणि सहकारभावनेवर आधारित कामकाज या वैशिष्ट्यांमुळे बँकेने अल्पावधीतच ठोस विश्वास संपादन केला आहे.
महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी उद्देश केवळ बँकिंग सेवा पुरवणे एवढाच नसून, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. “सहकारातून प्रगती” या ब्रीदवाक्याला धरून बँकेने ग्रामीण व शहरी भागात ठोस कामगिरी बजावली आहे. ठेवी स्वीकारणे, कर्जपुरवठा करणे, महिला व लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ देणे, शेती व शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी विशेष योजना राबवणे अशा विविध उपक्रमांद्वारे बँकेने व्यापक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सोसायटीच्या महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही शाखा असून, आता गुजरातमध्येदेखील शाखा विस्तार होणार आहे महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सर्वसामान्य नागरिकाला
अर्थसहाय्य मिळवून देणे आणि त्यांच्यात बचतीचा मूलमंत्र रुजवणे या उद्देशाने याची निर्मिती झाली. बँकांच्या किचकट अटी आणि नियमांमुळे सर्वसामान्य माणसांना कर्ज मिळवणे मुश्किल तरत होते, अशा काळात कमीत कमी अटी आणि सोप्या प्रक्रियेने नागरिकांना कर्ज देण्यास महेश नागरीने सुरुवात केली. त्यादुष्टीने मगराज राठी यांनी कायमच सामान्यातील सामान्य लोकांना मदत मिळवुन देण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमाही जनमानसात तशीच तयार झालेली आहे.
छोट्या आकर्षक योजना
अवघ्या ३४ हजार रुपये भांडवलावर था सीसायटीने सुरूवात केली. अल्पावधीतच १०० कोटींच्या ठेवी जमा केल्या. आज संस्थेकडे २०० कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी आहेत भाजी विक्रेत्यापासून उद्योगपतीपर्यंत सर्वच सोसायटीचे खातेदार आहेत. मध्यमवर्गाला तसेच काबाडकष्ट करणाऱ्या वर्गालाही या सोसायटीचा आधार वाटतो. महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्व म्हणजे छोट्या आकर्षक योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा विकास साधणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सोसायटी सातत्याने करते
पन्नास हजार खातेदार
को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कशी चालवावी यासंबंधी सरकारचे नियम आहेत. या नियमांचे काटेकोर पालन करून सामान्य माणसाची आर्थिक बाजू, बळकट करण्याचे काम सोसायटी प्रामुख्याने करते. जो माणूस रोज दोनशे ते पाचशे रुपये कमवती, अशा माणसाकडून बैंका इन्कम टॅक्स रिटर्नची मागणी करतात. जाचक नियमांमुळे सामान्य माणसांना स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करता येत नाही. त्यांच्या मदतीला महेश नागरी क्रेडिट सोसायटी याचून येते. ज्या ग्राहकांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना ते फेडल्यानंार पुढे चार लाखांचे कर्ज दिले जाते. ज्याने चार लाखांचे कर्ज घेतले, त्याला आठ लाखांचे कर्ज देऊन त्याची वाढती गरज भागवली जाते. सामान्यांची एक आर्थिक ओळख निर्माण करण्यात सोसायटीने मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे आज या सोसायटीचे पक्षास हजार खातेदार आहेत
शैक्षणिक कर्जाची सुलभ तरतूद
सर्वसामान्य नागरिकांची गरज असणान्या गृहतारण, शैक्षणिक, सोनेतारण कर्ज यासाठी सोसायटीने सोप्या योजना तयार केल्या आहेत. येथील रिकरिंग योजना विशेष लोकप्रिय आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांची की पुढील वर्षी भरायची असेल तर आजपासूनच महिन्याला एक छोटी रक्कम भरण्याची सोय सोसायटीने केली आहे. या सोयीमुळे विद्यार्थ्यांला शैक्षणिक फीची मोठी रक्कम वेळेवर भरता येते. विम्याचे हप्ते तसेच मेडिक्लेमसाठीही अशीच योजना अमलात आणली जाते. आज या सोसायटीच्या सुखसागर नगर, टिळक रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, सोमवार पेठ या ठिकाणी शाखा आहेत, लवकरच पिंपरी-चिंचवड आणि गुजरातमधील सुरत या ठिकाणी नव्या शाखा उघडल्या जाणार आहेत.
महिलांकडून चालवली जाणारी सोसायटी
महेश नागरी सोसायटीचे आज २६ प्रतिनिधी काम करतात. सौसायटीमुळे त्यांना रोजगार मिळाला असून, बचतीचा संदेश देणारे दूत म्हणूनच ते काम करतात. महेश नागरी सोसायटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सगळे अधिकारी आणि काउंटरवर काम करणारे कर्मचारी या महिला आहेत.
राठी यांचे सामाजिक योगदान
सामाजिक कामालाही हातभार संस्थेचे सामाजिक कामदेखील मोठे आहे. अनाथांची माय म्हणून ज्यांची ओळख होती, त्या सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सतन या ठिकाणी पतसंस्थेतर्फे दरवर्षी भाऊबीज साजरी केली जाते. मकर संक्रांत आणि नवरात्र आदी कार्यक्रम देखील साजरे केले जातात. एखाद्या ग्राहकाला अचानक आर्थिक गरज पडल्यास मदतीसाठी सोसायटी धावून जाते आणि त्वरित अर्थसहाय्य करते
सर्वसामान्यांसाठी उपयुक्त धोरणे
सोसायटीत दररोज पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपये जमा करणारे ग्राहक निर्माण झाले आहेत. येत्या काळात सोसायटीच्या माध्यमातून लघु उद्योगांना आर्थिक मदत देण्यासाठी यौजनता राबवली जाणार आहे. वर्षाला दीन याप्रमाणे शाखांचे जाळे देखील पुढील काही वर्षांमध्ये विस्तारले जाणार आहे. सोसायटीने लॉकर आणि कोअर बँकिंग प्रणाली सुद्धा विकसित केली आहे. तसेच डेली कलेक्शन देखील विकसित केले आहे. उत्तम टीम, भविष्यवेधी योजना, सर्वसामान्यांसाठी उपयुक्त धोरणे यामुळे महेश नागरी सोसायटीची ठेगवान घौडदौड सुरू आहे. आज सोसायटीच्या माध्यमातून छोट्यातील छोटा माणूस हा प्रगत झाला आहे. सर्वसामान्य कटुंबातील मुलांचे शिक्षण आणि करिअरची स्वप्रे पूर्ण झाली आहेत, सोसायटीच्या ख्यातीमुळे तिच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि गोवा येथील सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी पुण्यात आले होते.
बचतीबाबत समाजात उदासीनता असताना बचतीची सवय लावून आर्थिक शिस्त निर्माण करण्याचे महत्त्वाचे सामाजिक काम मगराज राठी यांनी महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह केडिट सोसायटीच्या माध्यमातून केले आहे. खातेदारांचा विश्वास आणि उत्तम सेवा याच्या माध्यमातून सोसायटीने सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.
आयएसओ मिळवणारी पहिली सोसायटी
मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नियमांचे पालन करून उत्तमरीत्या काम करणारी सोसायटी म्हणून महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा मल्टीस्टेट फेडरेशनतर्फे गौरव करण्यात आला आहे सोसायटीला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडून बिझनेस आयकौन हा पुरस्कार नुकताच मिळाला आहे. आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून महेश नागरी क्रेडिट सोसायटीला मान मिळाला आहे या सगळ्या प्रवासाविषयी महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक मगराज राठी म्हणतात, “आम्ही सुरुवातीपासूनच विकासाच्या मार्गावर आहोत, नियम आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. आम्ही अचानक झेप घेण्याऐवजी स्थिर, सातत्यपूर्ण वाढीचर विश्वास ठेवती, आम्ही आमच्या अंतर्गत व्यवस्था मजबूत करण्यासाठी सतत काम करती बैंकिंगमध्ये सेवेशिवाय विकायला तुसरे काही नसते. हे लक्षात घेऊन आम्ही सुरुवातीपासूनच उत्तम प्रकारची सेवा आणि पारदर्शक व्यवहार करत आहोत. दर्जेदार सेवेमुळेच नागरिकांचा आणि खातेदारांचा विश्वास मिळवण्यात आम्ही यशस्वी झाली लवकरच महेश नागरी क्रेडिट सोसायटीला तीस वर्षे पूर्ण होतील. पुढेही अशीच उत्तम आणि विश्वासार्ह सेवा सतत देत राहण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे
ते पुढे म्हणतात, आमची सोसायटी कदाचित अशा काही मोजक्या क्रेडिट को-ऑपपैकी एक आहे जी केवळ सुरक्षित कर्जे प्रदान करते. आम्ही रिअल इस्टेट किवा मोठ्या कंपन्यांना वित्तपुरवठा करत नाहीं आणि आम्ही कोणत्याही क्लायंटला कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देत नाही. आमचे लक्ष स्थानिक समुदायाच्या आणि दलित लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर आहे.
फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. त्यांच्या आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची दमदार वाटचाल अखंडीतपणे सुरू आहे.
कष्टकऱ्यांच्या ध्येयांना पंख देण्यास कटिबद्ध
आधुनिक जगात वेग, ताणतणाद स्पर्धा आणि असुरक्षितता यांचा पगडा वाढत असताना, मानवाला खऱ्या शांततेची, आत्मिक बळाची आणि समन्वयाची गरज अधिक भासते. या पार्श्वभूमीवर ध्यानगुरु रघुनाथ येमुल (ध्यानगुरुजी) यांनी आपले आयुष्य अध्यात्म, विज्ञान, सामाजिक सेवा आणि दिव्यांग यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अर्पण केले आहे. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे साधना, विज्ञान संशोधन, सेवा, संस्कार आणि समाजजागृतीचा एक अद्भुत पंगम आहे.
ज्या लोकांना बँकांचे व्यवहार परवडत नाहीत आणि त्र्यांचे उत्पन्न कमी आहे. अशा कष्टकरी वर्गाला पतसंस्था ही नेहमी आपली वाटत असते. या श्रेणीमध्येच गेल्या २८ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांची स्वप्रे पूर्ण करणाऱ्या महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा समावेश होतो. या सोसायटीने उत्तम सेवा आणि विश्वासाच्या जोरावर बचतीचा आदर्श घालून दिला आहे. २०० कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या या सोसायटीचे ५० हजार खातेदार आहेत. महेश नागरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिचे सर्व कामकाज महिलाच चालवतात सोसायटीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सदस्यांना आणि ग्राहकांना डिजिटलाइज्ड सिस्टीमच्या मदतीने चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न सोसायटी करत आहे. महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची २० वर्षांची यशस्वी घोडतौड सुरू आहे. या संस्थेची धुरा सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक मगराज राठी सांभाळा आहेत.
महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सुरूवात १९२० साली सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या स्व. वनराज राठी बांनी केली. दिनांक १ ऑक्टोबर १९९८ रोजी विजया दशमी या शुभविवशी संस्थेचे काम सुरू झाले. सद्यस्थितीत राजेश राठी हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर मगराज राठी हे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.