सुखसागरनगर अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे स्वस्थ नारी – सशक्त परिवार उपक्रमाचे आयोजन

Newsworldmarathi Pune: सुखसागरनगर येथील श्री अंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वस्थ नारी – सशक्त परिवार या सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आहे होते. या उपक्रमात परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य व सशक्तिकरणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे होते. महिलांसाठी आरोग्य तपासणी, मार्गदर्शन तसेच मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य याविषयी तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सहभागी महिलांनी या उपक्रमातून आत्मविश्वास, आरोग्याची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी याबाबत सकारात्मक अनुभव घेतला. ट्रस्टचे पदाधिकारी मगराज राठी यांनी सांगितले की, “महिला सशक्त झाल्या तर संपूर्ण कुटुंब आणि समाज मजबूत होतो. त्यामुळे आरोग्यदायी व जागरूक महिलांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, भविष्यात अशा सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची मालिका राबविली जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकतेची भावना वाढीस लागली असून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यास मोठी मदत झाली आहे. उपस्थित महिलांनी ट्रस्टचे आभार मानले व या उपक्रमामुळे त्यांना लाभदायक माहिती मिळाल्याचे सांगितले. स्वस्थ नारी – सशक्त परिवार हा उपक्रम महिलांच्या आरोग्य, जागरूकता आणि सशक्तिकरणाचा एक आगळावेगळा प्रयत्न ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रभाग ३८ मधील महिलांना मिळाले अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन; व्यंकोजी खोपडे यांचा कौतुकास्पद उपक्रम

0
Newsworldmarathi Pune: गोरक्ष स्मृती फाउंडेशन आणि गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी मारुती खोपडे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३८ मधील माता-भगिनींसाठी मोफत महालक्ष्मी दर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. सर्वांनी भक्तीभावाने ‘जय अंबाबाई’च्या घोषणांमध्ये यात्रेची सुरुवात केली. या यात्रेत शेकडो माता-भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला व आई अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनानंतर सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि श्रद्धेचे तेज दिसत होते. खोपडे यांनी या यात्रेचे आयोजन केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न ठेवता समाजातील एकता, सेवाभाव आणि सामूहिक श्रद्धेचा सुंदर संगम घडवून आणला. हा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरल्याचे उपस्थित महिलांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या पार पडले असून यात्रेतील सर्व व्यवस्थेमुळे सहभागी महिलांना कोणताही त्रास जाणवला नाही. गोरक्ष स्मृती फाउंडेशनने या माध्यमातून समाजकार्याची नवी दिशा दाखवली आहे. या यात्रेद्वारे धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि आनंदाचा संदेश मिळाला. सहभागी माता-भगिनींनी दिलेल्या प्रतिसादामुळे आयोजकांमध्ये आणखी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली. यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर सरपंच व्यंकोजी मारुती खोपडे यांनी सहभागी झालेल्या सर्व माता-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी भविष्यातही अशाच सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका

0
Newsworldmarathi Pune: घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप, लालित्यपूर्ण पदन्यास, सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे ‘वन्स मोअर’चे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’त रविवारी दुपारी १२ पासून सलग १२ तासांचा ‘लावणी धमाका’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित केला गेला. “महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज ‘लावणी महोत्सव’ पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३१ वर्षांपूर्वी सुरू केला. गेली ३१ वर्षे त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो,” असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनप्रसंगी काढले. विक्रमी लावणी महोत्सवात सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर (पाव्हनं फक्त तुमच्यासाठी), रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रील स्टार कुकू, वर्षा मुंबईकर (लावणी सुपरस्टार), सिनेतारका अर्चना सावंत, ज्योती मुंबईकर (मदनाची मंजिरी), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी कै. लता मंगेशकर यांच्या २८ सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्रास आबा बागुल यांच्यासमवेत लावणी कलावंतांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लावणी महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात गण-गवळण व मुजऱ्याने झाली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्याविष्कार सादर करून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री गणेश कला-क्रीडा रंगमंचाचे प्रेक्षागृह दुपारी १२पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्या व नृत्य करून लावणीला ‘वन्स मोअर’ची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता. ‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हनत्यात हो पुण्याची मैना’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. ‘विचार काय आहे तुमचा पाहुनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आजकाल पाटलाचा’, ’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनि अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गवळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली. याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’ या लावणीने ‘वन्स मोअर’ची दाद मिळविली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यांसह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका उर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूनि गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या लावण्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली. हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग १२ तास नृत्यांगनांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंत कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात कन्यापूजानात १००० कन्या सहभागी

0
Newsworldmarathi Pune: वयोगट ३ ते १२ वर्षांमधील १०००हून अधिक कन्या, रंगीबेरंगी ड्रेस, कपाळावर चुनरी, चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्रॉ, खाऊवाटप अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला. प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी, चंद्रकोर आणि कुमकुम तिलक पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी लावले. या सर्व लहान कन्यांचे पाय धुऊन त्यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले. त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी बालगीते व नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी या मुलींनी नऊवारी साडी, घागरा, पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. याशिवाय कालिका देवी, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, अर्धनारी नटेश्वर, कमळातील देवी अशी रूपे वेशभूषेतून साकारली होती. याप्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र, श्रीसूक्तपठण, दुर्गास्तुती तोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लकी ड्रॉमधील विजेत्या दुर्वा जाधव, नंदिनी राजपूत, अक्षरा कदम, समृद्धी पवार, आरुषी भारती या मुलींना सायकल, ब्लँकेट, कॅरम इत्यादी बक्षिसे देण्यात आली. तसेच लकी ड्राॅमधील अन्य १० मुलींना स्कूल बॅग्ज व प्रवासी बॅग्ज देण्यात आल्या. सहभागी सर्व मुलींना वॉटरबॅग व खाऊ देण्यात आला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला ‘’तू मोठी झाल्यावर काय होणार ?’’ असे विचारले. यावर अनेकींनी डॉक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञ अशी उत्तरे दिली. यावर आबा बागुल म्हणाले की, ‘’मुलींना मोठी स्वप्ने बघू द्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.’’ पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध व सुरक्षेबाबत आवाज उठविण्याचे आवाहन करून म्हटले की, ‘’पालकांनी मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे. मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा. त्याचबरोबर आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी या सर्वांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येबद्दल व सुरक्षेबद्दल जागरण करा.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बागुल, नूपुर बागुल आणि योगिता निकम यांनी केले. यावेळी डॉ. सौ. रांका, सौ. सुचेता अण्णा थोरात, उद्योगपती सुधीर वाघोलीकर उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

Newsworldmarathi pune: २७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १३ ते २० वर्षे, २१ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षांपुढील असे महिलांचे गट होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेचा सुंदर आविष्कार घडवीत देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविले. शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या महिलांच्या या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध वयोगटांतील २००हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. स्पर्धेत अनेक महिला कालीमाता, मीनाक्षी देवी यांच्या प्रभावी वेशभूषेत सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे काहींनी भारत माता, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, जनाबाई, शेतकरी स्त्री यांच्या रूपात अवतरून आपल्या सशक्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची छाप सोडली. विशेष म्हणजे एका स्पर्धक महिलेने प्लॅस्टिकचे रूप धारण करून समाजात पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. संपूर्ण स्पर्धा रंगतदार वातावरणात पार पडली. सहभागी महिलांनी सादर केलेली वेशभूषा, आत्मविश्वास व आकर्षक प्रस्तुतीमुळे प्रेक्षक भारावून गेले. महिलांचा सहभाग व उत्साह यांमुळे नवरात्रौ महिला महोत्सवाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले. प्रारंभी महिलांनी देवीची आरती केली. या उपक्रमाबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या अशा सहभागामुळे समाजात संस्कृती जपण्यासोबतच प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि सामाजिक संदेश अधोरेखित होत आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ४१ वर्षांपुढील वयोगट प्रथम क्रमांक – रोहिणी टिळक द्वितीय क्रमांक – नंदा जोशी तृतीय क्रमांक – स्वाती पवार चतुर्थ क्रमांक – रत्नमाला खिवंसरा २१ ते ४० वयोगट प्रथम क्रमांक – राजश्री हबीब तृतीय क्रमांक – योगिता पिंपळगावकर चतुर्थ क्रमांक – मयूरी देवकर १३ ते २० वयोगट प्रथम क्रमांक – श्रुती विश्वकर्मा द्वितीय क्रमांक – स्वरांगीता जाधव तृतीय क्रमांक – प्रांजल अवचिते चतुर्थ क्रमांक – सृष्टी धस बक्षिसे ३००० रुपये, २००० रुपये, १००० रुपये आणि ५०० रुपये अशी होती. सर्व स्पर्धकांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात आल्या.

ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदार योगेश टिळेकरांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी हजारांचा धनादेश

0
Newsworldmarathi Pune: राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओल्या दुष्काळाच्या छायेत बळीराजा आणि त्यांचे कुटुंब दडपून गेले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देण्यात आला. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा स्थलांतरित मजूर, कामगार आणि शेतमजुरांचा मोठा केंद्रबिंदू आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या घराघरांत ओल्या दुष्काळाचे तीव्र स्वरूप स्पष्ट दिसत होते. त्यातूनच तत्काळ आर्थिक मदतीचा निर्णय घेतल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले. “शहराचे शहरपण विसरून गावचे गावपण जपणे, हा आपला सामाजिक धर्म आहे,” असेही ते म्हणाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर पुणे शहरातील तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आणि व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार टिळेकर यांचे आभार मानले. “शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मात्र समाजातील प्रत्येक घटकाने यात हातभार लावणे गरजेचे आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या ग्रामीण भागात ओल्या दुष्काळाचे संकट गडद होत असताना लोकप्रतिनिधी, संस्था आणि नागरिक यांच्या अशा मदतीच्या हातांमुळे शेतकऱ्यांच्या दु:खावर थोडासा मरहम पडेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याच्या भव्य जिवंत देखाव्यास आमदार हेमंत रासने यांची उपस्थिती

0
Newsworldmarathi Pune: कसबा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हेमंत रासने यांनी अशोक तरुण मंडळ व संयुक्त अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित “मार्तंड भैरव खंडोबाचा विवाह सोहळा” या भव्य जिवंत देखाव्यास भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली. हा अद्वितीय सांस्कृतिक उत्सव नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून मोठ्या उत्साहात पार पडत आहे. देखाव्यात कलात्मकता, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या भेटीदरम्यान आमदार हेमंत रासने यांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी मंडळाच्या वतीने आमदारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, तसेच उमेश धुरांडे, छगन भुलाके, राजू परदेशी, माधव साळुंखे, पप्पू कोठारी, सुरेंद्र ठाकूर आणि इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील, भाजप उपाध्यक्ष तुषार पाटील आणि अशोक मित्र मंडळाने केले. मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण सोहळा सुरळीत आणि दिमाखदार पार पडला. यावेळी नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यक्त केले की, “अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपली परंपरा जपली जाते, आपली मुळे अधिक घट्ट होतात आणि सामाजिक एकोपाही दृढ होतो. हा सोहळा खर्‍या अर्थाने सामूहिक शक्ती व एकीचे दर्शन घडवणारा ठरला असून, नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहील.” मार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याचा हा देखावा फक्त धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरला. या भव्य सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आणि पारंपरिक संस्कृतीला नवे अधिष्ठान लाभले.

मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा ज्वालामुखी उद्रेक – मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की –”सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.” त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले – “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.” या मशाल मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील, अभय छाजेड, अरविंद शिंदे, मा.आ. मोहन जोशी, मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश अबनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

दि पूना गुजराती केळवणी मंडळाची शताब्दी वर्षातील निवडणूक बिनविरोध

0
Newsworldmarathi Pune: शिक्षण क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दि पूना गुजराती केळवणी मंडळाची नियतकालिक निवडणूक यंदाच्या शताब्दी वर्षात बिनविरोध पार पडली आहे. या संदर्भातील माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी दिली. २०२५-२०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंडळाचे प्रमुख म्हणून नितीनभाई देसाई यांची निवड झाली आहे. तर किरीटभाई शहा आणि राजेंद्रभाई शहा हे विश्वस्त म्हणून निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे २०२५-२०३१ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी सभासद म्हणून जनकभाई शहा, हेमंतभाई मणियार, विनोदभाई देडिया, दिलीपभाई जगड, मोहनभाई गुजराती, ब्रजेशभाई शहा, निलेशभाई शहा, किरणभाई शहा, दिपेनभाई शहा व निकुंजभाई शहा हे दहा सभासद बिनविरोध निवडून आले. “शिक्षण हे केवळ ज्ञानदान नसून सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे,” या दृष्टीकोनातून संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे. पारंपरिक मूल्ये व अत्याधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या मंडळ आर. सी. एम. गुजराती प्रशाला आवार (कसबा पेठ), हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय आवार (बुधवार पेठ), आणि PGKM स्कूल आवार (कोंढवा) या तीन ठिकाणी शैक्षणिक केंद्रे चालवित आहे. संस्थेच्या शैक्षणिक प्रवासात अलीकडेच एक मोलाची भर घालण्यात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात २०२५ पासून *बी.एस्सी. सायबर सुरक्षा (B.Sc. Cyber Security)* हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया वापर आणि डेटासुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हॅकिंग, फसवणूक, डेटाची चोरी यांसारख्या घटनांमुळे सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत. माफक शुल्कात दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देत, आजवर शेकडो विद्यार्थी राज्य व केंद्रातील विविध सेवांत उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. सध्या मंडळाच्या विविध संस्थांमध्ये मिळून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, शताब्दी वर्षात बिनविरोध निवडणुकीमुळे मंडळाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अधिक बळ मिळाले आहे.

500 महिलांनी केले श्री लक्ष्मी माता मंदिरात श्री सूक्त व सहस्त्र विष्णुनामाचे सामूहिक पठण

0
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या निमित्ताने 27 वर्षांपासून पुणे नवरात्रौ महिला महोत्सव सौ. जयश्री बागुल यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात चालू आहे. महिलांच्या कला गुणांना संधी मिळावी याकरिता महिलांना पुरस्काराने सन्मानित करावे आणि धार्मिक श्रद्धा परंपरा जोपासली जावी यासाठी शिवदर्शन-सहकारनगर परिसरात मा उपमहापौर आबा बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उभारलेल्या दाक्षिणात्य धाटणीच्या श्री लक्ष्मी माता मंदिरासमोर प्रांगणात भव्य नवरात्रोत्सव 10 दिवस हा संपन्न होतो. अशा श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात 500 हुन अधिक महिलांनी सामूहिक आरती केली आणि सूक्त व सहस्त्र विष्णुनामाचे सामूहिक पाच – पाच वेळा पठण सामूहिक पद्धती केले या प्रेक्षणीय सोहळ्यासाठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गेली 27 वर्षे हा अनोखा चालू असून महिलांनी समाधान व्यक्त केले. नंतर या कार्यक्रमात पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल स्वतः सहभागी झाले होते. याबद्दल देखील सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले.