“अभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” तोक्यो इथे साजरा
Newsworldmarathi Team: अंतरराष्ट्रीय मराठी मंच जपानने आयोजित केलेला “आभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” हा कार्यक्रम २३ सप्टेंबर २०२५ रोजी तोक्यो मधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला. या कार्यक्रमा प्रमुख पाहुणे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय डॉ. उदय सामंत होते.
या शिवाय महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र सरकारचे उद्योग सचिव श्री. अनबलगन, श्री योगेंद्र पुराणिक आणि इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे आयोजन एदॊगावा इंडिया कल्चर सेंटरचे प्रमुख जपानचे लोकप्रिय माजी आमदार आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. योगेंद्र पुराणिक आणि जपान आंतरराष्ट्रीय मराठी मंच समन्वयक निरंजन गाडगीळ यांच्या नेतृत्वा खाली केले गेले होते.
कार्यक्रमाला तोक्यो आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे ५०० मराठी लोकांची उत्साही गर्दी उपस्थित होती. कार्यक्रमात ढोल, ताशा आणि लेझीमसह पारंपारिक मराठी शैलीत मिरवणूक काढण्यात आली. ह्या व्यतिरिक्त मान्यवरांची भाषणे आणि स्थानिक मराठी कलाकारांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर केले गेले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे म्हणजे मराठी भाषा विभाग आणि तोक्यो मराठी मंडळ यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या अभिव्यक्त मासिकाच्या “अभिजात मराठी अभिमन मराठी विशेषांक” चे प्रकाशन. विशेषांकात स्थानिक लोकांनी केलेल्या लिखाणाचा दर्जा तसेच छापील विशेषांकाचा दर्जा बघून आपण स्थिमित झालो आहोत.
या कार्यक्रमांमध्ये टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. अशी प्रतिक्रिया डॉ. किरण कुलकर्णी आणि डॉ देवरे ह्यांनी व्यक्त केली. डॉ. उदय सामंत यांनी येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांच्या विभागांकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, ज्यामध्ये नियमित ऑनलाइन मराठी भाषेचे वर्ग, जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुस्तकांचे वाचनालय आणि बिगर-मराठी भाषिकांसाठी इतर प्रचारात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे.
जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे अशाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी खूप उच्च दर्जाचा मानदंड निर्माण झाला आहे असे मंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांना सोहोळ्या निमित्त विशेष तयार केलेली कापडी पिशवी तसेच विशेषांकाची परत आणि मिठाईचा बॉक्स भेट करण्यात आला. हा कार्यक्रम आता दर वर्षी सादर केला जाईल. या ठिकाणी हॉलची सजावट मीरा बागुल आणि अश्विनी बापट यांनी खूप सुंदररित्या केली होती.
उदय सामंत यांच्याकडून कलाकारांचे विशेष कौतुक
टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. या ठिकाणी सादर करण्यात आलेले कार्यक्रम पाहून राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कलाकारांचे अभिनंदन केले
“अभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” तोक्यो इथे साजरा
Newsworldmarathi Team: अंतरराष्ट्रीय मराठी मंच जपानने आयोजित केलेला “आभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” हा कार्यक्रम २३ सप्टेंबर २०२५ रोजी तोक्यो मधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला. या कार्यक्रमा प्रमुख पाहुणे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय डॉ. उदय सामंत होते.
या शिवाय महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र सरकारचे उद्योग सचिव श्री. अनबलगन, श्री योगेंद्र पुराणिक आणि इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे आयोजन एदॊगावा इंडिया कल्चर सेंटरचे प्रमुख जपानचे लोकप्रिय माजी आमदार आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. योगेंद्र पुराणिक आणि जपान आंतरराष्ट्रीय मराठी मंच समन्वयक निरंजन गाडगीळ यांच्या नेतृत्वा खाली केले गेले होते.
कार्यक्रमाला तोक्यो आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे ५०० मराठी लोकांची उत्साही गर्दी उपस्थित होती. कार्यक्रमात ढोल, ताशा आणि लेझीमसह पारंपारिक मराठी शैलीत मिरवणूक काढण्यात आली. ह्या व्यतिरिक्त मान्यवरांची भाषणे आणि स्थानिक मराठी कलाकारांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर केले गेले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे म्हणजे मराठी भाषा विभाग आणि तोक्यो मराठी मंडळ यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या अभिव्यक्त मासिकाच्या “अभिजात मराठी अभिमन मराठी विशेषांक” चे प्रकाशन. विशेषांकात स्थानिक लोकांनी केलेल्या लिखाणाचा दर्जा तसेच छापील विशेषांकाचा दर्जा बघून आपण स्थिमित झालो आहोत.
या कार्यक्रमांमध्ये टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. अशी प्रतिक्रिया डॉ. किरण कुलकर्णी आणि डॉ देवरे ह्यांनी व्यक्त केली. डॉ. उदय सामंत यांनी येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांच्या विभागांकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, ज्यामध्ये नियमित ऑनलाइन मराठी भाषेचे वर्ग, जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुस्तकांचे वाचनालय आणि बिगर-मराठी भाषिकांसाठी इतर प्रचारात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे.
जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे अशाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी खूप उच्च दर्जाचा मानदंड निर्माण झाला आहे असे मंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांना सोहोळ्या निमित्त विशेष तयार केलेली कापडी पिशवी तसेच विशेषांकाची परत आणि मिठाईचा बॉक्स भेट करण्यात आला. हा कार्यक्रम आता दर वर्षी सादर केला जाईल. या ठिकाणी हॉलची सजावट मीरा बागुल आणि अश्विनी बापट यांनी खूप सुंदररित्या केली होती.
उदय सामंत यांच्याकडून कलाकारांचे विशेष कौतुक
टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. या ठिकाणी सादर करण्यात आलेले कार्यक्रम पाहून राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कलाकारांचे अभिनंदन केले.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थ भागात कोथिंबीर वडी ,सुरळी वडी ,पाट वडी आणि आळू वडी व गोड भागात रबडी मालपुवा ,उपवास मोदक , लाल भोपळा बासुंदी ,मकाणा लाडू ,शिंगाडा नानकटाई ,उपवास धोंडस हे पदार्थ होते.
२५० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरितास् किचनच्या सरिता पद्मन होत्या. परीक्षक म्हणून किशोर सरपोतदार आणि कोमल पारखे यांनी काम पाहिले.
पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – स्वाती पंडित द्वितीय क्रमांक – सीमा नलावडे तृतीय क्रमांक – विद्या ताम्हणकर उत्तेजनार्थ – १. दिपाली धस २. राजश्री सिद्धेश्वर ३. मनीषा जाळीन्द्रे. यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – पूनम परमार द्वितीय क्रमांक -शीतल भळकर तृतीय क्रमांक – पुण्या सोनी उत्तेजनार्थ – १.मंगला हंकारे ,२. वर्षा तन्ना . यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० असे बक्षिसाचे स्वरूप होते. या प्रसंगी छाया कातुरे , संगीता बागुल , प्राजक्ता ढवळे यांची विशेष उपस्थिती होती.
पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – स्वाती पंडित द्वितीय क्रमांक – सीमा नलावडे तृतीय क्रमांक – विद्या ताम्हणकर उत्तेजनार्थ – १. दिपाली धस २. राजश्री सिद्धेश्वर ३. मनीषा जाळीन्द्रे. यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – पूनम परमार द्वितीय क्रमांक -शीतल भळकर तृतीय क्रमांक – पुण्या सोनी उत्तेजनार्थ – १.मंगला हंकारे ,२. वर्षा तन्ना . यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० असे बक्षिसाचे स्वरूप होते. या प्रसंगी छाया कातुरे , संगीता बागुल , प्राजक्ता ढवळे यांची विशेष उपस्थिती होती. जनता वसाहत परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मा नगरसेविका प्रिया गदादे यांचे निवेदन
Newsworldmarathi Pune: जनता वसाहत परिसरातील प्रमुख मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या प्रचंड गैरसोयीबाबत नगरसेविका प्रिया गदादे यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथविभाग प्रमुख मा. अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जनता वसाहत परिसरात फक्त एकच मुख्य रस्ता असून तोच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा आधार आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच दैनंदिन व्यवहारासाठी जाणाऱ्या नागरिकांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती व नियमित देखरेख करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या कामाची तातडीने दखल न घेतल्यास जनता वसाहत कुटुंबातील नागरिकांच्या वतीने आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेविका गदादे यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, माजी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नांसाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे आणि नागरिकांना योग्य सोयीसुविधा मिळेपर्यंत आपण पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.
निवेदनानंतर पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक ती रस्त्यांची दुरुस्ती जलदगतीने करण्यात यावी, असे निर्देश दिले. लवकरच या कामाला प्रारंभ होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
यामुळे जनता वसाहत परिसरातील नागरिकांमध्ये आता दिलासा आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेविका प्रिया गदादे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आई तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सवात रास दांडियाला उत्साहपूर्ण सुरुवात
Newsworldmarathi Pune: आई तुळजाभवानी प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव २०२५ निमित्त देवी आईचा भव्य आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडल्यानंतर काल मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ पासून रास दांडियाच्या कार्यक्रमांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली. परिसरातील नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे या दांडिया महोत्सवाला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रास दांडियामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची विशेष सोय करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, दुसऱ्या क्रमांकासाठी मोबाईल फोन, तिसऱ्या क्रमांकासाठी सोन्याची नथ, चौथ्या क्रमांकासाठी स्मार्ट वॉच, पाचव्या क्रमांकासाठी टेबल फॅन तर सहाव्या क्रमांकासाठी इस्त्री अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण रास दांडिया सोहळ्यात पैठणीही विशेष बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहे. या बक्षिसांमुळे कार्यक्रमात सहभागी होण्याची नागरिकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
रास दांडियाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नव्हे तर एकोपा, मैत्री आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडते. यंदाच्या दांडिया महोत्सवाला युवक, युवतींसह कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून, वातावरण रंगतदार आणि आनंदमय झाले आहे.
या प्रसंगी तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वर्षा साठे यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “हा दांडिया महोत्सव म्हणजे नागरिकांना एकत्र येऊन परंपरेतून आनंद घेण्याची संधी आहे. आकर्षक बक्षिसे ही नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे.”
तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे दांडिया महोत्सवात सहभागी होऊन या उत्सवाला अधिकच उजाळा द्यावा.”
सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची आरती
Newsworldmarathi Pune: नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात आरती सोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या हस्ते तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली.
नवरात्र म्हणजे देवीची उपासना, शक्तीचे प्रतीक आणि समाजातील स्त्रीशक्तीचा गौरव. याच पार्श्वभूमीवर देवीची आरती करण्यासाठी पोलिस महिला अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व लाभले.
या वेळी पोलिस महिला अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सन्मान अंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने संगीता राठी आणि मंजू राठी यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मान स्वीकारताना महिला पोलिस अधिकाऱ्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजातील प्रत्येक घटकासोबत सलोखा आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्याचे आश्वासन दिले.
अंबा माता मंदिर ट्रस्टचे मगराज राठी, पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अखिल अप्परच्या दुर्गामातेचे जल्लोषात आगमन
Newsworldmarathi Pune: नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अखिल अप्पर दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्टतर्फे देवीचे आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गामातेचे आगमन होताच वातावरणात भक्ती, आनंद आणि उत्साह यांचा मिलाफ दिसून आला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक मर्दानी खेळांच्या दमदार सादरीकरणाने मिरवणुकीला विशेष रंगत आली. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. देवीच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, फुलांचा वर्षाव केला आणि अबालवृद्धांसह माता-भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे आशीर्वाद घेतले. हा सोहळा एकता, परंपरा आणि भक्तीचे दर्शन घडवणारा ठरला.
देवीची भव्य आरती दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या महिला अध्यक्षा मा. नगरसेविका रूपाली धाडवे यांच्या हस्ते तसेच मंडळाचे आधारस्तंभ मा. नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी ‘दुर्गामातेचा जयघोष’ करत वातावरण अधिक भक्तिमय केले.
या वेळी उद्योजक सागरशेठ सोलंकी, ट्रस्टमधील सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने उत्साही देवीभक्त उपस्थित होते. आगमन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
अखिल अप्पर दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. यंदाही ट्रस्टतर्फे नवरात्र महोत्सवात विविध भक्तिमय उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे बावनकुळे यांच्याकडून कौतुक
Newsworldmarathi Pune: भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.”
बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले श्रीनाथ भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”

सर्व कलांना सन्मान आणि व्यासपीठ देणारा महोत्सव : विदुषी भाटे यांचे गौरवोद्गार ; पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा शानदार प्रारंभ
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्र महिला महोत्सवात सर्व शास्त्रीय कलांचा सन्मान केला जातो आणि या कलेच्या उपासकांना सातत्याने व्यासपीठ दिले जाते. याचे श्रेय महोत्सवाचे प्रवर्तन, आयोजक जयश्री बागुल आणि आबा बागुल यांचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ नृत्यांगना, गुरू, संरचनाकार विदुषी शमा भाटे यांनी मंगळवारी येथे काढले.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. या महिला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शमा भाटे बोलत होत्या. त्यांच्याच हस्ते यावेळी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, प्रवर्तक आबा बागुल, तसेच निर्मला जगताप, छाया कातुरे, प्रांजली गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विदुषी शमा भाटे पुढे म्हणाल्या, ‘पुणे नवरात्र महिला महोत्सवाशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेली आहे. या व्यासपीठावरून दरवर्षी नृत्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. जयश्रीताई आणि आबा बागुल यांना नाही म्हणता येत नाही, इतक्या आत्मीयतेने ते हे कार्य करतात. या महोत्सवात सर्व कलांना सन्मानाचे स्थान असते. मान्यवर कलाकारांचा सहभाग असतो. एक कलाकार म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते’.
मनोगत व्यक्त करताना दीप्ती भोगले म्हणाल्या, ‘मी एक भाग्यवान कलाकार आहे. नवरात्र महोत्सवात मी सातत्याने येत आहे. बागुल कुटुंब हे घरची माणसे असावीत, इतके जवळचे आहे कारण कोणत्याही अडचणीत ते धावून येतात. या महोत्सवाच्या माध्यमातून आबा आणि जयश्रीताई, विविध कलांना एका व्यासपीठावर आणून रसिकांना आनंद देतात’.
अर्चना देशमाने म्हणाल्या, ‘स्नेहवनच्या कार्याविषयी शब्दांतून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन कार्य पाहणे अधिक आनंदाचे आहे’.
जयश्री बागुल यांनी प्रास्ताविक करताना नवरात्र महिला महोत्सवाची माहिती दिली. शक्तीचे जागरण आणि शक्तीला अभिवादन, ही भावना असून, या निमित्ताने समाजातील विविध महिलांना एकत्र आणणे, संवाद साधणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू असतो, असे त्या म्हणाल्या.
स्वच्छता कर्मचार्यांच्या वतीने आशा भोसले यांनी प्रातिनिधिक मनोगत मांडले. ‘आबा आणि जयश्रीताईंनी आमची आठवण ठेवली आणि सत्कार केला, याचा फार आनंद झाला’, असे त्या म्हणाल्या. सुरवातीला नृत्याविष्काराच्या माध्यमातून देवीवंदना सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नम्रता जगताप यांनी आभार मानले तर गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.