Newsworldmarathi Pune: बोलके डोळे, निरागसता, नैसर्गिक अभिनय आणि बालवयातच प्रगल्भ अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या ‘जिप्सी’ चित्रपटांत झळकलेल्या बालकलाकार कबीर खंदारे चा एकता सेवा प्रतिष्ठान च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व महाराष्ट्राच्या शौर्य, प्रेरणा, आणि आस्थेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत कबीर च्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात.
यावेळी बोलताना गणेश शेरला म्हणाले “जिप्सी” चित्रपटासाठी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार तसेच भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार कबीर खंदारे ला महामहीम राष्ट्रपती श्रीम. द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मिळाला असून कबीर च्या या दैदिप्यमान यशामुळे मराठी चित्रपट क्षेत्रात दक्षिण उपनगराचा नावलौकिक वाढला आहे. चित्रपट क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळवत असल्याची बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे शेरला यांनी सांगितले.
यावेळी अजय गुटगे, शिशी खंदारे,बद्रीनाथ जन्म, धन्यकुमार गुगळे, सचिन पाटोळे,अश्विनी चिन्नी, अरुण गांजे, भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व एकता सेवा प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Newswroldmarathi Pune: प्रभाग क्र. २४ मधील सोमवार पेठेत नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित भव्य देवीची आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या प्रसंगी नगरसेवक तथा मा. सभागृहनेते गणेश बिडकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रविण तरडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
देवी आरतीच्या या सोहळ्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेश बिडकर आणि प्रविण तरडे यांनी मंडळाच्या कार्याची आणि नवरात्र महोत्सवाच्या भव्यतेची प्रशंसा केली. आरतीनंतर मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष सुनील पवार आणि अध्यक्ष प्रसाद गोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे तसेच सैरभ कर्डे यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला अधिकच ऊर्जस्वल वातावरण लाभले. समाजातील बंधुभाव, ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा अधोरेखित करण्याचे कार्य या महोत्सवातून घडत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
Oplus_16908288
नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोमवार पेठेतील नवरात्र महोत्सव अधिकच भव्य आणि उत्साहपूर्ण होत असून धार्मिक भावनांसह सांस्कृतिक एकतेचा संदेश देत आहे.
Newsworldmarathi Pune: शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या कार्यकर्त्या स्वाती चिटणीस यांनी आज औपचारिकपणे अजित पवार गटात प्रवेश केला. पुण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी स्वाती चिटणीस यांनी सांगितले की, “अजित दादांसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऊर्जा आणि जोमाने प्रामाणिकपणे काम करून महाराष्ट्रात त्यांचे हात बळकट करण्याचे काम करू.” त्यांनी सांगितले की, या प्रवेशादरम्यान त्यांच्या वतीने अनेक महिलांचा देखील पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला.
या प्रवेश सोहळ्यात इतर अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर तसेच काँग्रेस नेते रोहन सुरवसे यांचा समावेश आहे. यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखी वाढली असल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाला शहराचे अध्यक्ष सुनील आण्णा टिंगरे, सुभाष जगताप, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, हडपसर मतदारसंघ अध्यक्ष शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राकेश कामठे, बचत गट शहराध्यक्षा अश्विनीताई वाघ, रोहिणी शिरसागर, बिना कटंबनी, वैशाली शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाती चिटणीस यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गट अधिक मजबूत होणार असून, शरद पवार गटासाठी मात्र हा धक्का मानला जात आहे. या घडामोडीनंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
Newsworldmarathi Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. पक्षातील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला. विशेष म्हणजे सुरवसे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत दाखल होत पक्षाला संघटनात्मक बळ दिले आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहन सुरवसे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अलीकडेच बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) शिवाजीनगर येथील पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी औपचारिक पक्ष प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी सुरवसे पाटील यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत “पक्षात चांगले काम कराल” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, महादेव बाबार, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तसेच सुभाष जगताप, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, रुपेश संत आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात रोहन सुरवसे पाटील यांच्यासह सागर नायकुडे, पुष्कर ढमाले, आकाश नवले, देवेंद्र खाटेर, ज्ञानेश्वर जाधव, सोनू आंधळे, सचिन मोरे, सत्यजित गायकवाड, दीपक चौगुले, आदित्य शेटे, निखिल मुळीक, अॅड. सुधीर शिंदे, प्रशांत मोरे आणि गणेश शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
“अजित दादांसोबत काम करणार” – रोहन सुरवसे
“अजित पवार यांच्यासारखे कोणताही नेता काम करत नाही. त्यांचे काम पाहुन आम्ही प्रभावित झालो असून, त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दादा जे जबाबदारी देतील, त्यानुसार मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीने काम करू,”असा विश्वास रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केली.
Newsworldmarathi Pune: पुण्यातील शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून, लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा विशेष आकर्षण बनला आहे. हजारो भक्तांची येथे गर्दी उसळत असून, श्री लक्ष्मीमाता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे.
मंदिराभोवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून, प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एलईडी लाइट्ससह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, साकारण्यात आलेला ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा १००हून अधिक कारागिरांनी सुमारे १ महिना कष्टपूर्वक तयार केला आहे. विविध नैसर्गिक सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर दररोज केली जाते. मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने रोज सजविले जाते.
मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरती रोज होत असून, धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासामुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेच्या दिवशी येथे घटस्थापना पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. तसेच मीनाक्षीपुरम मंदिराच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन करण्यात आले. श्री लक्ष्मीमातेला सोन्याचा मुकुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजविण्यात आले आहे.
येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती, तसेच प्रसादवाटप होत असून, नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होत आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.००पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसविण्यात आले असून, पोलीस बंदोबस्तही चोख आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कार्यक्रम व स्पर्धा होत आहेत, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
Newsworldmarathi Pune: भंडारी समाजसेवा ट्रस्ट, श्री रेणुका माता मंदिर, केशवनगर यंदा आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष भक्तिभावात आणि उत्साहात साजरे करत आहे. या विशेष पर्वाचे औचित्य साधून, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रस्टच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान हे महादान असल्याचे सांगून अनेकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. या उपक्रमाची माहिती सभागृह नेते तसेच भंडारी समाजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी दिली.
भिमाले यांनी सांगितले की, दरवर्षी भंडारी समाजसेवा ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविणे, हीच ट्रस्टची ध्येयधोरणे आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात रक्तदान शिबिरासह इतर उपक्रमांद्वारे समाजातील बांधवांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिरामुळे अनेकांना जीवनदान मिळेल, याबाबत ट्रस्ट सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
श्री रेणुका माता मंदिरात सुरू असलेला शारदीय नवरात्र उत्सव भक्तिरसात आणि उत्साहात साजरा होत असून, रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा सामाजिक कार्याशी जोडल्याने या उत्सवाला अधिकच अर्थपूर्ण परिमाण मिळाले आहे.
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित क्रांती मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत २० ते ७९ वयोगटातील २५० महिलांनी सहभाग घेऊन विविध खेळांचा आनंद लुटला. यामध्ये संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, उखाणे, चेंडूने ग्लास पाडणे, रस्सीखेच यांसह महिलांना विविध प्रश्न विचारून अतिशय विनोदी व खेळीमेळीच्या वातावरणात रंगतदार अशा स्पर्धांचा महिलांनी आनंद घेतला.
होम मिनिस्टर स्पर्धेत :
अॅड मयुरी देवकर – प्रथम क्रमांक – वॉशिंग मशीन
राणी चौधरी – द्वितीय क्रमांक – मोबाईल
अश्विनी निकम – तृतीय क्रमांक – मिक्सर
योगिता पिंपळगावकर – चौथे क्रमांक – हॅण्ड मिक्सर
सुरेखा तापडिया – पाचवा क्रमांक – कुकर
सोनाली जांभुळकर – उत्तेजनार्थ
अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्याशिवाय सर्व महिलांना प्रत्येकी भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला.
प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले व महिला महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अनुजा वाघोलीकर, प्राजक्ता ढवळे, वृषाली बागुल, प्रियांका मैत्राणी उपस्थित होत्या
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तामिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर लगेचच मोठी संघटनात्मक जबाबदारी मोहोळ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.
पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर युवा मोर्चा, शिक्षण मंडळ, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापौर, प्रदेश महामंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजपा सहप्रमुख असा संघटनात्मक प्रवास केला आहे. सलग तीस वर्ष संघटनेसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल पक्षाकडून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय निवडीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाचा मोहोळ यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नवी जबाबदारीही या भूमिकेतून निभावणार आहे.
‘माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. नव्या जबाबदारीच्या रूपाने पार्टीने दाखवलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल. नव्या जबाबदारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वात नवी जबाबदारी पार पाडेल, हा विश्वास व्यक्त करतो’, असेही मोहोळ म्हणाले.
Newsworldmarathi Pune: बंगाली, हिंदी आणि मल्याळयम चित्रपटांना दर्जेदार संगीत देणारे दिवंगत संगीतकार सलील चाैधरी यांची कारकीर्द दिशादर्शक होती. बहुभाषात चित्रपटांना संगीत देणाऱ्या चौधरी यांनी विविध १३ भाषेत संगीत निर्मिती केल्याने त्यांचे चाहते देशभरात दिसून येतात. संगीता साेबतच ते बासरी, पियानो या संगीत वादनात देखील पारंगत होते. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकार यांना करिअरच्या सुरवातीच्या काळात संगीताचे प्रशिक्षण देण्यात त्यांचा पुढाकार होता.
१५० पेक्षा अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे संगीत अजरामर झाले असून त्यांच्या कारकीर्दीला जन्मशताब्दी निमित्ताने उजाळा देणे महत्वपूर्ण असल्याचे मत पुणे नवरात्रौ महोत्सवाचे प्रमुख आबा बागुल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संगीत क्षेत्रात “सलीलदा..” नावाने प्रसिद्ध असलेल्या सलील चौधरी यांचे “सुहाना सफर और ये मौसम हसीन..” हे गाणे गात आदरांजली वाहण्यात आली.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर याठिकाणी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निवेदक संदीप पंचवाटकर निर्मित ‘इश्क सुफियाना’ या सुफी संगीताची आराधना करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयाेजन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे वतीने करण्यात आले. नामांकित गायक संदीप उबाळे, प्रवीण अवचार, विनल देशमुख यांच्यासह गायिका राधिका अत्रे यांनी दर्जेदार सुफी गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. ईश्वराच्या एका नावाचा सातत्याने उच्चार करुन त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न सुफी गाण्यांचे माध्यमातून केला जातो. ईश्वराच्या प्रेमासाठी सुफी संगीत लिखाण केले जाते.
मात्र, चित्रपट मध्ये त्यांच्या गोष्टीनुसार ते गरजेप्रमाणे कलाकार यांच्यासाठी वापरले जाते. पवित्र प्रेमाची व्याख्या सुफी गाण्यातून करण्यात येते. स्वत:ला विसरुन स्वत:चे सर्वस्व त्यागून ईश्वाराला प्राप्त करण्याचा प्रयत्न सुफी गायनातून केला जात असल्याची भावना निर्माते संदीप पंचवाटकर यांनी व्यक्त केली. गायिका राधिका आणि गायक विनल यांनी “साजदा तेरा साजदा..” या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर “सैय्या” .. “मितवा” ..”दगाबाज रे”..” इश्क सुफियाना”…”पिया रे पिया रे”..या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढत नेली. गायक संदीप, प्रवीण आणि विनल यांनी एकत्रित गायन केलेल्या “लगी तुमसे..तेरे मस्त…तेरा दीदार” गाण्यानी कार्यक्रम आणखी सजत गेला. “ख्वाजा मेरे”.. या गाण्यास तर रसिकांनी टाळ्यांची साथ देत, वन्स मोअर..म्हणत कार्यक्रमात उत्साह वाढवला. “वंदेमातरम” गायनाने कार्यक्रमाची जल्लोषात सांगता करण्यात आली.
यावेळी गायकांना विविध गाण्यांना सिंथेसायझर वादनास सईद खान, बासरी- सचिन वाघमारे,बेस गिटार – विजय मूर्ती, ऑक्टोपॅड- असीफ इनामदार, ढोलकी- हर्षद गनबोटे तर तबला वर गोविंद कुडाळकर यांनी सर्मपक साथ दिली.
याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,विलास रत्नपारखी, ॲड.चंद्रशेखर पिंगळे, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: मराठी चित्रपटसृष्टी मध्ये तब्बल ६० वर्ष सुरेल संगीत गायन करणारे पद्मभूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगभूमीवरील त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये श्रीनिवास खळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गायन कार्यक्रमास सुरवात झाली. पुणे नवरात्रौ महोत्सवात २००० साली श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती पुरस्कार देऊन श्रीनिवास खळे यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच त्यांनी त्यावेळी कार्यक्रम देखील सादर केला होता या आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्यात आला. तसेच त्यांच्याशी संबंधित गाणी देखील गाण्यात आली.
३१वा पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. पुणे नवरात्रौ मोहत्सवचे आयोजक अध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल आणि जयश्री बागुल यांनी या सुरेख सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर आर. जे. बंड्या याने आपल्या ओघवत्या शैलीने करत प्रेक्षकांना संपूर्ण कार्यक्रमात खिळवून ठेवले.
१९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अभिषेक सराफ, अक्षय घाणेकर कल्याणी घाणेकर, तन्वी दाते यांनी वेगवगेळया सुरेल गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. नामांकित गायक ए. आर. रहमान , कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल यांच्या विविध गाण्यांचा समावेश यामध्ये होता. प्रेक्षकांनी १९९० च्या दशकातील सुरेल गाणी पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त करत टाळ्या वाजवून तसेच आवडती गाणी गुणगुणत जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. ए. आर. रहमान यांचे “दिल से रे…” हे गाणे गायक अभिषेक घाणेकर यांनी उत्साहपूर्ण वातावरणात गातच प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद देत “वन्स मोअर” म्हणत गाणे पुन्हा गाण्यास लावले.
श्रेया घोषल यांनी गायलेल्या ” जादू है नशा है” गाणे गायिका कल्याणी देशपांडे यांनी सुमधुर आवाजात गात उपस्थितांची मने जिंकली. गायक अक्षय घाणेकर आणि गायिका कल्याणी देशपांडे यांनी एकत्रित गायलेल्या सुप्रसिद्ध आशिकी चित्रपटातील गाण्याला तर प्रेक्षकांनी शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. बॉम्बे चित्रपटातील ए.आर.रहमान यांचे अजरामर गाणे “तू ही रे..तेरे बिना में कैसे जिऊ” गाण्यात तर प्रेक्षक ताल्लिन झाल्याचे पाहावयास मिळाले, गायका सोबत एकत्रित गाणे गात त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रथमच नवरात्रौ उत्सव मध्ये गायन करत असलेल्या तन्वी दाते हिच्या सुरेल गाण्यांनी देखील सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी नामांकित गायकांना संगीत वाद्य कलाकारांनी देखील उत्कृष्ट साथ दिली. ड्रम वादन_अभिजित भदे, रिदम मशीन_ओंकार इंगवले, सॅक्सोफोन_पीयुष तिवारी, पियानो_शंतनु जहागिरदार आणि भारत ढोरे, गिटार वादन अजय थोरात तर तबला वादन मंगेश जोशी यांनी केले. यावेळी आबा बागुल, नंदकुमार कोंढालकर, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, सुनील महाजन, निकिता मोघे, विलास रत्नपारखी, ॲड. चंद्रशेखर पिंगळे, द.स.पोळेकर उपस्थित होते.