Newaworldmarathi Mumbai : भाजपकडून पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ या दोन सख्या मैत्रिणींना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांची मंत्रीपदावर वर्णी लागल्याने राज्यात चर्चेला उधाण आले आहे. या दोघींची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, आणि आता त्या एकत्र मंत्रिमंडळात काम करताना दिसतील.
पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपमधील ओबीसी चेहरा आहेत तर माधुरी मिसळ या शहर आणि ग्रामीण दोन्ही भागांशी समन्वय साधून काम करणाऱ्या नेत्यांपैकी आहेत. दोघीही महिला सक्षमीकरण या विषयावर अनेक वर्ष काम करत आहेत.
पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ यांची मैत्री ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. दोघीही एकमेकींच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, आणि सार्वजनिक जीवनात एकमेकींना पाठिंबा देत असतात.
या दोघींना भाजपने मंत्री मंडळात स्थान देऊन महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे यावरून दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिला सक्षमीकरणावर भर देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या प्रश्नांवर एकत्रित काम करण्याची अपेक्षा या दोघींवर आहे.
या दोघी मैत्रिणी एकत्र काम करत महिला, ओबीसी, आणि सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर ठोस योगदान देतील, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे.