Newsworldmarathi Pune : सागर ढोले पाटील यांनी मेहनतीने संस्था मोठी करत, विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासासाठी ते झटत आहेत. शिवाय दिव्यांग शिबीर सारखे सामाजिक उपक्रम राबवून समाजात आदर्श ठरत आहेत. सागर ढोले पाटील यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात सागर ढोले पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन करतो. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष करत असताना आई वडिलांची पुण्याई व सर्वांची साथ मिळाल्याने ही शक्य झाले आहे असे कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात सांगितले. भविष्यात सामाजिक कार्य सोबत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थान त्यांनी आव्हान केले.
दिव्यांग मित्र या पुरस्काराने विनय खटावकर यांना मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला.या शिबिराद्वारे अनेक दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सुविधा व सहाय्य पुरविण्यात आल्या. शिबिराचा लाभ 22 जिल्ह्यांतील दिव्यांग व्यक्तींनी घेतला.डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी या उपक्रमासाठी वेळोवळी मार्गदर्शन केले.