Newsworld marathi Mumbai : Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis phone called Eknath Shinde) यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेल्यानंतर ते आजारी पडले. दरम्यान, एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी असून आज ते ठाण्यासाठी रवाना होणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार
-एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे.