Homeपुणेराजेंद्र पोकळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

राजेंद्र पोकळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Newsworldmarathi Pune : वॉवेल्स द पीपल असोसिएशन (VOPA) आणि बजाज फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या VOPA सामाजिक संस्थेचे शिक्षक राजेंद्र पोकळे यांना राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळा (दांडेकर पूल) यांच्याकडून प्रतिष्ठित “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

Advertisements

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी निळू फुले सभागृह (कलामंच), दांडेकर पूल येथे आयोजित सोहळ्यात राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे, VOPA (वोपा) संस्थेच्या संचालिका ऋतुजा जेवे, “आप्पी आमची कलेक्टर” फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र पोकळे यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांमुळे तसेच VSchool डिजिटल शिक्षण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना राजेंद्र पोकळे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, वोपा मधील माझ्या सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि वोपा संस्थेचे संचालक मा. प्रफुल्ल शशिकांत यांच्या सहकार्याचा आहे. हा सन्मान मला भविष्यात आणखी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करेल.”

साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे मॅडम म्हणाल्या, ‘राजेंद्र पोकळे सर व्ही-स्कूल डिजिटल शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्नशील आहेत. त्यांचा हा सन्मान इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल.” वोपा संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेले व्ही-स्कूल हे अप्लिकेशन मराठीमध्ये मोफत उपलब्ध असून ते गेल्या तीन वर्षात 30 लाख लोकांनी वापरले आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments