Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालय उत्तमनगर मध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड क्लब अंतर्गत स्टॅंडर्ड रायटिंग व पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बी आय एस ही संस्था ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून जाणीव जागृती करते तसेच उच्च गुणवत्ता असलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मानकीकरण व प्रमाणीकरण करते. स्टॅंडर्ड रायटिंग स्पर्धेमध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी तर पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे निवृत्त शिक्षक व समाजसेवक शांताराम गाढवे हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थी करत असलेल्या जाणीव जागृती बाबत तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स बाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दोन वर्षांपूर्वी विद्यालयात स्थापन झालेल्या बीआयएस क्लब मधील विद्यार्थ्यांनी विविध ऍक्टिव्हिटीजद्वारे आपले नातेवाईक व परिसरातील नागरिकांपर्यंत बी आय एस केअर ॲप बाबत माहिती पोहोचविली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे नियोजन मार्गदर्शिका प्रांजली दीक्षित यांनी केले यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. हेमलता जावळकर, सुवर्णा पाटील, वैशाली करंजकर, हर्षदा शेणॉय, सुनील हराळे, योगेश जाधव ,सुनील शिंदे , चेतन डिंबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे मूल्यमापन अधिकारी श्री किरण देशपांडे व बी आय एसचे शुक्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील बी आय एस क्लब अंतर्गत विविध ऍक्टिव्हिटीज चे आयोजन केले जाते.