Newsworldmarathi Pune : ऑफिसच्या मित्रानेच कोयत्याने वार केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीमध्ये एका तरुणीवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.
शुभदा कोदारे (वय.२८ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणीनीचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 30 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शुभदा हिचा तिच्याच कृष्णा सत्यनारायण कनोजा सहकाऱ्यासोबत पैशांवरुन वाद झाला होता. यातूनच शुभदा ऑफिस सुटल्यानंतर पार्किंगमधून गाडी काढण्यासाठी गेली असता तिच्यावर कृष्णा याने धारदार शस्त्राने वार केले. यानंतर शुभदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने शुभदाचा मृत्यू झाला.
दरम्यान, शुभदा कोदारे ही पुण्याच्या कात्रज भागामध्ये बालाजी नगरला राहते. वर्षांचा कृष्णा कनोजा पुण्याच्या शिवाजीनगर भागात खैरेवाडी येथे राहतो. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला ताब्यात घेतलं आहे.