Homeपुणेबारामतीचा सुपुत्र बनला अजितदादांचा स्वीय सहाय्यक…

बारामतीचा सुपुत्र बनला अजितदादांचा स्वीय सहाय्यक…

Newsworldmarathi Pune : सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकांची मोठी फेररचना केली असून, त्यांचे एक स्वीय सहाय्यक गजानन पाटील सध्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले असून, दुसरे हनुमंत पाटील हे एमआयडीसीचे विभागीय अधिकारी बनले आहेत. आता अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयात मोठा फेरबदल केला असून दहा जणांच्या चमूमध्ये बारामतीचे सुपुत्र व खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उर्फ बापू जगताप यांचाही समावेश झाला आहे.

Advertisements

या नव्या फेरचनेमध्ये बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील सुपुत्र व राज्याच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप हे आता अजित पवारांचे स्वीय सहाय्यक असणार आहेत. मृदू स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व उत्तम प्रशासकीय कौशल्य यामुळे बिपिन जगताप यांनी खादी ग्रामोद्योग मंडळात आपली छाप पाडली होती.

व्यसनमुक्तीच्या आंदोलनापासून सुरुवात झालेला बिपिन जगताप यांचा प्रवास पत्रकारितेतून खादी ग्रामोद्योग विभागाकडे झाला. मधुमक्षिका पालनामध्ये त्यांनी केलेले प्रचंड कार्य राज्यातील त्या त्या काळातील उद्योगमंत्र्यांना देखील भावले. आता त्यांची ऋणानुबंधाची गाठ पुन्हा एकदा बारामतीशी जोडली जात आहे.

दरम्यान अजित पवारांच्या या नव्या फेररचनेमध्ये उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व नगरविकास रचनेचे प्रधान सचिव विकास ढाकणे हे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव बनले असून, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे हे खाजगी सचिव तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील हे जनसंपर्क अधिकारी बनले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांना तीन स्वीय सहाय्यक असतात. यामध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन भगवान जगताप तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई चे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आणि मुंबईच्या अंमलबजावणी विभागाचे मुख्य निरीक्षण अधिकारी व शिधावाटपचे नियंत्रक विनायक निकम हे तिघेजण स्वीय सहाय्यक बनले आहेत.

मंत्रालयाच्या गृह विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी नितीन चांदुरकर, सामान्य प्रशासन विभागातील नील परब व सामान्य प्रशासन विभागातील आनंद आंग्रे हे अजित पवारांचे नवीन सहाय्यक कक्ष अधिकारी असतील, तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनील वसंत दळवी हे लिपिक म्हणून काम पाहतील.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments