Newsworldmarathi Pune : पुण्यातील वैकुंट स्मशानभूमीत अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक आहे. ही घटना स्मशानभूमीतील व्यवस्थापनातील हलगर्जीपणाचे उदाहरण आहे. मृतदेह पूर्ण जळविण्यात आले नाहीत, यावरून स्मशानभूमीत योग्य देखरेख आणि प्रक्रियेचे पालन होत नसल्याचे स्पष्ट होते.
स्मशानभूमी परिसरात स्वच्छता आणि कुत्र्यांसारख्या भटक्या प्राण्यांवर नियंत्रण नसल्यामुळे अशी दुर्दैवी घटना घडली आहे. अशा घटना मृत व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी भावनिकदृष्ट्या खूप क्लेशदायक आहेत.
वैकुंट स्मशानभूमीतील ही घटना अत्यंत भयानक आणि मानवी संवेदनांवर आघात करणारी आहे. अर्धवट जळलेले मृतदेह आणि त्यांचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याचे प्रकार हे व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाचे ज्वलंत उदाहरण आहेत. ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे.
मे. निकिता बॉयलर ठेकेदार कंपनीला येथील वैकुंठ स्मशानभूमितील व्यवस्थापनाचे काम दिले आहे. पण या कंपनीच्या हलगर्जीमुळे मृतदेह पूर्णपणे जळविण्यात आले जात नाहीत त्यामुळे येथील भटकी कुत्री अर्धवट जाळलेले मृतदेह खात आहेत.
स्मशानभूमी परिसरात भटक्या प्राण्यांचा मुक्तपणे वावर असणे हे व्यस्थापनेच्या दुर्लक्षमुळे घडत आहे. मृतदेहांचे योग्य प्रकारे अंतिम संस्कार न होणे आणि त्यांचे तुकडे प्राण्यांकडून खाल्ले जाणे, हे माणुसकी आणि सुसंस्कृततेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मे. निकिता बॉयलर ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी नागरिक करत आहेत.