Homeबातम्याबीड जिल्ह्याची लेक करणार भारताचं नेतृत्व

बीड जिल्ह्याची लेक करणार भारताचं नेतृत्व

Newsworldmarathi Beed : आपल्या बीड जिल्ह्यातील मौजे कळंबअंबा, ता-केज येथील सुकन्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे हिची खो – खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील एका कन्येने देशाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणं ही गोष्ट खूपच अभिमानास्पद आहे………..!!

Advertisements

बीडच्या केज तालुक्यातील कळमअंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रियंका हनुमंत इंगळे या युवतीची “खो-खो ” च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय. आज 13 पासून सुरू होणाऱ्या खो-खो वल्डकप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.

आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

तालुक्यातील कळंबआंबा येथील हनुमंत इंगळे हे मागील काही वर्षांपासून रोजगाराच्या निमित्ताने भोसरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले. वडील हनुमंत इंगळे व आई सविता इंगळे या दाम्पत्याला प्रियंका व प्रणय अशी दोन मुले आहेत. शालेय शिक्षण घेत असताना प्रियंकाला खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिची खेळातील आवड विचारात घेऊन त्यांनी तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो प्रशिक्षण दिले. तिने निवडलेल्या क्षेत्रात मेहनत व सराव करून खो-खो सारख्या क्रीडा प्रकारात नैपुण्य संपादन केले. त्यामुळे तिला सात वेळा खो-खो च्या राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या संधीचे सोने करत तिने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात आपले योगदान दिले. तिच्या या उत्कृष्ट कामगीरीची दखल घेऊन तिला यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील राणी लक्ष्मीबाई व राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 12 ते 19 जानेवारी 2025 याकालावधीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टडियमवर होणार्‍या खो-खोच्या विश्‍वकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या संधाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड झाली आहे. सध्या दिल्लीत खो-खो च्या वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय खो -खो संघाचे अध्यक्ष सुधांगु मित्तल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यापासून खेळाडू सराव करत आहेत.

खो-खो स्पर्धेत जगभरातील चोवीस देशांचे खो-खो संघ सहभागी होत आहेत. कर्णधारपद प्रियंका इंगळे हिला मिळाले आहे. तिच्या या संघात आश्‍विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निरमला भाटी, निता देवी, चैत्रा आर, सुभाश्री सिंग, मगाई माजी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, मोनिका व नाझिया या खेळाडूंचा भारतीय खो-खो संघात समावेश आहे. प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे. सव्वीस वर्षीय प्रियंका इंगळेने आतापर्यत खो-खोच्या 17 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या प्रियंका खेळाडूंच्या कोट्यातून पुणे येथे क्रीडा अधिकारी पदावर नुकतीच सेवेत रूजू झाली आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments