Newsworldmarathi Pune : जिल्हा परिषदेने जनसुविधाअंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसातील दुसरी कारवाई आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई करून आणखी एक दणका दिला आहे. बांधकाम विभागामध्ये अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या चौकशी सुरू आहेत मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या प्रलंबित ठेवून एक प्रकारे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
झारगड हे बारामती पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वाघळवाडी येथे जनसुविधा अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते, ते काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तसेच संपूर्ण कार्यवाही ही कनिष्ठ अभियंता म्हणून झारगड यांच्याकडे होती