Homeपुणेवाल्मिकी कराड प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले दत्ता खाडे काय म्हणाले?

वाल्मिकी कराड प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले दत्ता खाडे काय म्हणाले?

Newsworldmarathi Pune :सीआयडी चौकशीत नेमकं काय विचारण्यात आलं असं विचारलं असता दत्ता खाडे म्हणाले, वाल्मिक कराडने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर जी मालमत्ता घेतली आहे, त्यावेळी मी बिल्डरला पैसे कमी करायला सांगितले का? माझ्याकडून काही पैशाचा व्यवहार झाला का? माझे आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का? असे अनेक महत्त्वाचे फिरुन फिरुन तेच प्रश्न विचारण्यात आले.

Advertisements

त्यावेळी मी, यामध्ये माझा काहीही संबंध नाही. ज्या प्रभागात ही मालमत्ता येते त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे. माझं याच्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, असा दावा देखील खाडे यांनी यावेळी केला आहे.

तसेच कराड आणि तुमची ओळख कशी अस विचारलं असता, बीडमध्ये येण जाण होत होते तेव्हा हा वाल्मिक कराड आहे आणि मी दत्ता खाडे इतकचं एकमेकांना माहिती होत. त्याच्याशी कधी संबंध आला नाही. वाल्मिक कराड आणि माझी (दत्ता खाडे) फक्त तोंड ओळख आहे. मी कधीही त्यांच्यासोबत फोनवर बोललेलो नाही. या प्रकरणाशी माझं काहीही संबंध नाही, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

तसेच कराडला अटक करण्यात आली तेव्हा कराडला लपवून ठेवण्याच्या आरोपा तुमच्यावर झाले त्यावर विचारले असता, खाडे म्हणाले, तसं असतं तर पोलिसांनी त्याचवेळी मला अटक केली असती.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments