Newsworldmarathi Pune : मुंबई येथे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख करत गाणे सादर केले. याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कुणाल कामरा याचा
खार येथील दि हॅबिटेट स्टुडिओमध्ये तोडफोड केली.
या घटनेबाबत आता महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी सोशल मीडिया वर ट्विट करत कुणाल कामराचा आबरा का डाबरा करायला वेळ लागणार नाही असा इशारा दिला आहे.
पुढे ते ट्विट मध्ये म्हणाले, कुणाल कामरा याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याविषयीच्या अश्लाघ्य वक्तव्याचा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करत असून राज्याच्या लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत आहेत. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे. अशा नेत्याविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हे केवळ शिंदे साहेबांचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.
कुणाल कामरा याने आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा या कुणाल कामराचा आबरा का डाबरा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी सक्षम यंत्रणांनी पावले उचलावीत, अशी ही मागणी त्यांनी केली आहे.


Recent Comments