Newsworldmarathi Pune: महसूल प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी, पीएमआरडीएच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल रवींद्र बर्गे (वय- 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.
हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक यावर त्यांनी कडक कारवाई केली होती. अर्धन्यायीक अपील प्रकरणे विहित मुदतीत मार्गी लावली होती. त्यानतंर अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पीएमआरडीएचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या आई भारती बर्गे या डॉक्टर, तर बहीण पल्लवी बर्गे या जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.


Recent Comments