Homeपुणेपंढरपूर ते लंडन सर्वात मोठी दिंडी निघणार

पंढरपूर ते लंडन सर्वात मोठी दिंडी निघणार

Newsworldmarathi Pune: चैतन्य उत्पात,रा. पंढरपूर अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात यु के म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहे.

यानिमित्ताने पुढील महिन्यात (एप्रिल २०२५ ते जून २०२५) पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयन्तशील आहेत.

याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी गेल्या ७ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. अमेरिका, यूरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही, यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक ईच्छा आहे असे ते म्हणाले. परदेशात मॉरिशस, जर्मनी, न्यू जर्सी येथे भारतीय मंदिरे आहेत, पण वारीची परंपरा, विश्वमालक पांडुरंग यांचे मंदिर नाही, ही मराठी माणसाची खंत होती.

खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे २२ देशातून १८००० किलोमीटर चा प्रवास करत ही दिंडी निघणार असून भक्तीची परंपरा भारता बाहेर पोहोचणार आहे. दिनांक, १५ एप्रिल ला पंढरपूर येथूनपासूनमार्गस्थ होणार आहे. दि १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किमी एवढा प्रवास करत कारने या पादुका घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बावीस देशातून वारीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुर्ण सहकार्य केले असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उत्तम नियोजन केले आहे.

या उपक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एम आय टी चे विश्वनाथ कराड व वारकरी संप्रदयाच्या व्यक्तिनी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. यूके मधील ४८+ मराठी मंडळ, आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी मंडळ संलग्न होत असून लवकरच भव्य मंदिर उभे करण्यात येणार आहे. तमिळ, कानडी, गुजराथी, तेलगू भाविकही या निमित्ताने जोडले जात आहेत. या लोकांना मराठी भाषा येत नाही पण अभंग म्हणता येतात.

महाराष्ट राज्यातील सातशे वर्षांची जुनी परंपरा, राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल जगभरात पोहोचणार आहे!

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments