Newsworldmarathi Pune महिला दिनानिमित्त राष्ट्र सेवा दल संचालित साने गुरुजी विद्यालय प्राथमिक शाळा पुणे व चक्रभेदी सोशल फौंडेशन देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ नाथ पै सभागृह पुणे येथे गुणवंत पालक, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा संपन्न झाला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.महिला पालकांनी स्री भ्रुणहत्या व सावित्रीबाई च्या जीवनातील प्रसंगावर आधारित कार्यक्रम सादर केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी समतेच्या वाटेनं खणकावित पैंजण यावं हे समुहगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी विधवा अनिष्ठ प्रथा म्हणजेच नवरा वारल्यांनतर तिचे बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, जोडवी काढणे इ. समूळ नष्ट झाली पाहिजे. तसेच चक्रभेदी संस्था शिव्या मुक्त समाज अभियान राबवत आहे त्या अनुषंगाने नुकताच गुहागर पाचेरी आगर गावात ८मार्च दिनी महिला सभेत शिव्या मुक्त गावचा ठराव घेण्यात आला त्याच धर्तीवर उपस्थित सर्वांना उद्देशून यशदा ट्रेनर सावंत यांनी शिव्या मुक्त शाळा असा ठराव घेऊया का? असे विचारले सर्वांना मान्य असेल तर हात वर करा असे सुचवले असता सर्वांनी मान्य केले.
शाळेच्या आवारात कोणीही शिव्या द्यायच्या नाहीत असा एकमताने ठराव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील ही पहिली शाळा व्यवस्थापण कमिटी आहे जिने अशा प्रकारचा ठराव केला आहे. त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सावंत यांनी नम्र आवाहन केले
यावेळी व्यासपीठावर संकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना बिडवे, लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक दिपक होमकर, महाराष्ट्र लोकविकास मंचचे उपाध्यक्ष एस एन कोंढाळकर, प्रशासक मंडळाचे सदस्य प्रा भगवान कोकणे,साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे, ज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे, व्यवस्थापन समिती सदस्य अविनाश खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी भूषवले.
महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करताना संवाद क्षमता, मार्केटिंग स्कील असावे लागते ते सर्व संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून दिले जाईल असा विश्वास उपस्थित महिला पालकांना चेतना बिडवे यांनी दिला.
यावेळी शाळेचे पालक सुषमा शिंगाडे व पूनम कदम यांच्या पुढाकाराने सेवा ज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे यांचा कृतज्ञता म्हणून आकर्षक फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी खांडेकर यांनी शिव्या मुक्त शाळा हा ठराव पास करण्याविषयी समाधान व्यक्त केले .तसेच पालकांकडून स्वयं स्फुर्तीने एखाद्या शिक्षकाचा सन्मान होणे ही महाराष्ट्रातील एक अनमोल घटना असल्याचे सांगितले. शिक्षक सोपान बंदावणे यांचा पालकांकडून झालेला सत्कार हे शिक्षणक्षेत्रात वेगळे पाऊल असल्याचे विचार त्यांनी मांडले.
लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक दिपक होमकर यांनी विविध उदाहरणांद्वारे महिलांचे कुटुंबातील स्थान कसे असावे याबाबत प्रभावी मांडणी केली. यावेळी वर्षभरात उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना स्व शिला खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अविनाश खंडारे पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला तर स्व वामनराव उबाळे यांच्या स्मरणार्थ मीना काटे पुरस्कृत गुणवंत पालक पुरस्कार देण्यात आला.
इनरव्हील क्लबच्या वतीने शाळेतील दहा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संगिता गोवळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी तर आभार शितल खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फूलफगर , लक्ष्मी कांबळे तसेच सुषमा शिंगाडे, पूनम कदम, स्वाती चौरे, सारिका नांगरे, रेणुका गरड मनाली बेंद्रे इ पालकांनी परिश्रम घेतले.


Recent Comments