Newsworld Mumbai : महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, उद्या (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर होणारा शपथविधी सोहळा हा मोठ्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या घटक पक्षांमध्ये मंत्रिमंडळातील जागावाटपावर चर्चा सुरू असून, या प्रक्रियेनंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. या घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.
या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून. हजारो उपस्थितितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.
उद्याच्या सोहळ्यासाठी शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.