Newsworldmarathi Mumbai: Mumbai Corona News : मुंबईत कोरोना संसयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
केईएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १३ वर्षीय मुलीचा आणि ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत रुग्णांवर मूत्रपिंड व कर्करोगाचे उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूचे कारण मृत्यू प्रमाणपत्रात ज्या आजारावर उपचार सुरू होते. त्याच आजाराने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासणी करतो त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, १३ वर्षीय चिमुकली मूत्रपिंडाच्या आजाराने तर ५९ वर्षीय महिला कर्करोगाने त्रस्त असल्याने दाखल केले होते. दोघीच्याही मृत्यू त्यांच्या मूळ आजारांमुळे झालेले आहेत, असे केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
घाबरण्याची गरज नाही : आरोग्य विभाग
मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्ग थांबवता येईल. गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची तयारीही विभागाने केली आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


Recent Comments