Newsworldmarathi sambhajinagar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण याच अवकाळी पावसाचा फटका बसून काहील जणांना जीवही गमवावा लागला आहे.
मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत पडणाऱ्या वळवाच्या पावसात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे. यात विविध ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील हळद या गावी शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. उमेश उत्तम उंडाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तर अंबाजोगाईजवळील मोरेवाडी येथील एका मंदिर परिसरातही वीज कोसळली. मात्र, या घटनेत जीवितहानी झाली नाही. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात चार ठिकाणी वीज पडून शेळ्या, म्हैस, गाय दगावली आहे.
जालन्यात सलग पाच दिवसांपासून पाऊस पडत असून, भोकरदन तालुक्यात दोन तरुणांचा वीज पडून मृत्यू झाला. गणेश जाधव (वय ३२) आणि सचिन बावस्कर (वय २८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याच तालुक्यात रविवारीही दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. सलग पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


Recent Comments