Homeबातम्याठाण्यात टेंभी नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण, धारधार शस्त्राने केले वार

ठाण्यात टेंभी नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण, धारधार शस्त्राने केले वार

Newsworldmarathi Thane: शहरातील टेंभी नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आफ़्रिन आणि तिच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टेंभी नाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे हिंसक हल्ल्यात रूपांतर झाले. हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हाताने तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमा केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. टेंभी नाका या ठिकाणी किरकोळ वादातून दोन शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झाला आहे.

संतोष यांच्या समवेत एका सैनिकांवर परिसरात राहणार्‍या आफ्रिन या महिलेने गुंडांना घेऊन हल्ला केला आहे. सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारला. त्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला आहे. आफ्रिन महिला आणि तिच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमी शिवसैनिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments