Newsworld Pune : बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत. त्यावरून गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरू आहे. त्यांची बाजू ऐकण्यासाठी ज्येष्ठे नेते शरद पवार आज मारकडवाडी येथे पोहचले. त्यांनी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेतली. त्यांचा कशामुळे विरोध आहे याची माहिती त्यांच्याकडूनच घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी ग्रामस्थांना याप्रकरणी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर हा विषय घालण्याचे आश्वासन दिले.
.कोणता कायदा असा आहे. या ठिकाणी मी भाषण करतो. तुम्ही ऐकत आहेत. उद्या पोलीस खात्याने निर्णय घेतला मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हा कुठला कायदा. असा कुठं कायदा आहे. तुम्हाला इथे जमायचं नाही. जमावबंदी. तुमच्याच गावात ही गंमतीची गोष्ट आहे. हे का केलं मला समजत नाही.” असा टोला त्यांनी लगावला. ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी भाषण केले.
तुमच्या मतदानाच्या विचारामुळे मी येथे यायचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगीतले. “तुम्ही असं ठरवलं आपल्या गावात फेरमतदान घेऊ. ते अधिकृत नव्हतं. ते सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने ठरवलं. पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. हा तुमचा अधिकार होता. पण हा निर्णय तुम्ही घेतल्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली.