Newaworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेसच्या ॲड. राजश्री अडसूळ यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभागात प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या असून, नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांकडून त्यांचे स्वागत केले जात असून, सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲड. राजश्री अडसूळ या प्रभाग क्रमांक ७ मधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या काँग्रेस पक्षासाठी सातत्याने कार्यरत आहेत. संघटनात्मक काम, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका यामुळे त्या प्रभागात ओळखीचे आणि विश्वासार्ह नाव ठरल्या आहेत. पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क कायम आहे.
प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि महिला प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर नागरिक आपली मते मांडत आहेत. या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन भविष्यात महापालिकेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार ॲड. अडसूळ यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेसला बळ मिळत असल्याचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.


Recent Comments