Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभा मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, प्रभाग क्रमांक २१ ड (मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क) येथून सर्वसाधारण पुरुष गटातून श्रीनाथ भिमाले यांनी भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्ष, तसेच इतर मित्र पक्षांच्या महायुतीतर्फे श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी देण्यात आली असून, पक्षाने त्यांच्या आजवरच्या सामाजिक व लोकहिताच्या कामांवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, पुण्यनगरीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ तसेच शहराध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे यांनी श्रीनाथ भिमाले यांना मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
या संधीबद्दल श्रीनाथ भिमाले यांनी पक्षातील सर्व सन्माननीय वरिष्ठांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आजवर लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कामांचा प्रवास पुढील काळातही अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. देशहित आणि पुणेकरांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी तसेच पुणेकरांच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीनिशी कार्यरत राहण्याचा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.


Recent Comments