Newsworld Mumbai : जहांगीर हॉस्पिटल मध्ये मातंग समाजाच्या ३५ वर्षीय गृहिणीचे निधन झाले. सकाळी आज दि. 8 डिसें. 2024 रोजी सकाळी 09.00 वाजता मृत्यू झाला मात्र बिल भरले नाही, म्हणून मृतदेह ताब्यात दिला नाही. या अत्यंत संवेदनशील, संतापदायक – भयंकर बाबीचा निषेध करण्यासाठी मयत रुग्णाचे नातेवाईक पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल गेट समोर उपोषणास बसले आहेत.
Advertisements
विशेष म्हणजे ३५ वर्षीय तरुणीचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन यशस्वी होईल, असे सांगितल्याने हॉस्पिटलने आत्मविश्वासपूर्वक सांगितल्याने त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या वर्षभरात जहांगीर हॉस्पिटल मध्ये ५२ लाख रुपये खर्च केले आहेत.