Newsworld Pune : भिमाकोरेगाव शौर्यदिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी अशी मागणी भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केली.
शौर्यदिनाच्यै अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राहुल डंबाळे यांनी समाजाच्या वतीने भूमिका मांडताना वरील मागणी केली ” मागील वर्षीपेक्षा जास्त गर्दी यावर्षी होणार असल्याने त्या तुलनेत सुविधांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे . संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्तंभाची याही वर्षी सजावट करावी अशी मागणी देखील डंबाळे यांनी केली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली.
” ज्येष्ठ नागरिक व इतर अनुयायांच्या सुविधांसाठी एक जानेवारी सोबतच 31 डिसेंबर रोजी देखील सर्व पायाभूत सुविधा देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून यंदाचा उत्सव हा अधिक आनंदात साजरा केला जाईल ” असा विश्वास देखील डंबाळे यांनी यावेळी बैठकीत दिला.