Newsworldmarathi Pune पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या श्रेष्टीकडे आपले निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. बागुल यांनी अपक्ष लढत दिली असली तरी त्यांचा पक्षाशी असलेला प्रदीर्घ संबंध आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा लक्षात घेता त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याचा आग्रह त्यांनी केला आहे.
आबा बागुल हे पुण्यातील एक अनुभवी आणि प्रभावी नेते आहेत. त्यांनी पर्वती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यांच्या या पावलामुळे पक्षाने कठोर भूमिका घेत त्यांना निलंबित केले होते.
आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये एकता टिकवून ठेवण्यासाठी बागुल यांच्या मागणीला पक्ष कसा प्रतिसाद देतो, याकडे लक्ष आहे