Newsworldmarathi Pune : पुणे येथील पंचम डेव्हलपर्सचे संचालक व धडाडीचे कार्यक्षम असे युवा कार्यकर्ते तसेच युवकांचे प्रेरणास्थान महेंद्र सुंदेचामुथा वा सहकारयांनी गेली सोळा वर्षांपूर्वी आनंद दर्शन युवा मंच (ADYM) या नावाने युवकांसाठी संस्था स्थापन केली असून या संस्थेमध्ये आज जवळजवळ पुणे व पुणे परिसरातील चारशेहून अधिक सदस्य असुन सात-आठ हज़ार युवक जोडले गेले आहेत. त्यामुळे हा एक नूसता मंच राहिला नसून ती एक पुणे शहरातील मोठी संस्था निर्माण झाली आहे.
महेंद्र सुंदेचामुथा हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून युवकांसाठी दर महिन्याला ते वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात व वर्षातून दोन वेळा युवकांच्या संपूर्ण परिवारासाठी ते स्नेहमेळावा घेऊन यामध्ये मनोरंजनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. दरवर्षी डिसेंबर महिन्यांमध्ये हुरडा पार्टी व गेट टू गेदर म्हणून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. महावीर जयंतीला तीन ते चार हज़ार युवकासह अचल जैन याच्या मार्गदर्शन घेऊन बाइकरॅली काढण्यात येते. यावर्षी सुध्दा त्यांनी रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी कोंढवा – सासवड रोडवरील येवलेवाडी येथील नव्यानेच झालेल्या ह्युटोन ग्रीनस् ॲंन्ड रिसाॅर्ट मध्ये हुरडा पार्टी व गेट टू गेटर म्हणून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते, यामध्ये आनंद दर्शन युवा मंचच्या सर्व युवकांच्या परिवारासह पंधराशे पेक्षा अधिक बंधू भगिनींनी हजेरी लावून या स्नेहमेळावा व गरमागरम सुरती हुरड्याचा आनंद लुटला.
या स्नेहमेळावा व हुरडा पार्टीसाठी उद्योगपति सुहासजी खाबिया, श्री ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स, दिल्लीचे निवर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी चोरडिया, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेबजी धोका, उद्योजक डॉ, सुमतिलालजी लोढा, जितोचे पुणे चेप्टर चे अध्यक्ष इंदरजी छाजेड, दिनेशजी ओसवाल, अजयजी मेहता, लक्ष्मीकांतजी खाबिया जीतो चे अनेक पधादिकारी दिलीपजी कटारिया,भाजपा प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदिपजी भंडारी, आय.ए.एस, अधिकारी आनंदजी भंडारी, उद्योजक सचिनजी नहार, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाषबाबू लुंकड, जैन परंपराचे संपादिका रुपल चोरडिया, महाराट्र जैन वार्ता चे अजितजी डुंगरवाल, सौ, कविता सेठीया, तसेच ह्युटोन ग्रीनस् रिसाॅर्टचे गोपीनाथ कामटे, सौ अश्विनीताई कामटे, सत्यवान पुणेकर, विकास नाना फाटे, कैलास बापू कामटे, भाऊ निंबाळकर, जयवंतराव होडगे, संपतजी पोकळे, अभिजित दिवेकर, शरद गायकवाड आदी उपस्थित होते, यांनी ह्युटोन ग्रीनस् रिसाॅर्ट या कार्यक्रमासाठी देऊन विशेष सहकार्य केले, व या सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून हुरडा पार्टी व महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घेतला, यावेळी आनंद दर्शन युवा मंचच्या वतीने जानेवारी या नवीन वर्षात होणाऱ्या बालेवाड़ी हाय स्ट्रीट ट्रीमोन्ट एडिवाएम क्रिकेट टुर्नामेंट साठी संघाच्या खेळाडूंना विशेष टिशर्टचे वितरण अविनाश चोरडिया यांच्या हस्ते तसेच विजेता व उपविजेता संघाला देण्यात येणाऱ्या करंडक कप याचे प्रकाशन सिरिमिरी बैंक्वेट चे देवेंद्रजी लोढा व चेतक जैन या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्नेहमेळाव्यासाठी आलेल्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर आनंद दर्शन युवा मंचच्या वतीने महाराष्ट्रीयन परंपरागत चंदनाचे कुंकुम व चमकीने औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांनी प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते, प्रत्येकजण ढोलीबाज्याच्या तालावर ठेका धरून आपल्या वयाचं भान न ठेवता जोडीने किंवा ग्रुपने नाचत-गाजत आनंद घेत होते, कपलजोडीसाठी एंकर पूजा जैन यांनी काही मजेशीर गेम्स घेतल्या, हुरडा पार्टीमध्ये नेवासा येथील सुरती हुरडा व हुरड्याबरोबर काळ्या मिरीची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, गुळ, दही, रेवडी, गोडीशेव, बोरं, हरभरा, पेरू, आवळे, उकडलेले स्विट काॅर्न कणीस, उकडलेले शेंगदाणे असे अनेक व्यंजन पाहाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे अनेक पदार्थ ठेवण्यात आले होते.
तर महाराष्ट्रीयन जेवणामध्ये मसालेदार कांद्याची भाजी, मटकीची भाजी, सुका बटाटा, कांदा भजी, जिलेबी, मसालेभात, ज्वारीची व बाजरीची भाकरी, चपाती, मिरचीचा ठेचा,लसूणची लाल चटणी, कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, मिनरल वॉटर शिवाय चहा-काॅफी, बर्फ गोळा असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते, या सर्व खाद्यपदार्थाचा लाभ सर्वांनीच मनसोक्तपणे घेऊन आनंद घेतला, विशेष करून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे आनंद दर्शन युवा ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र सुंदेचा कार्याध्यक्ष सौरभ धोका, खजिनदार पंकज बाफना, उपाध्यक्ष उमेदमल धोका, सेक्रेटरी आनंद गादिया, प्रकाश बोरा व दोस्ती ग्रुप सर्व सदस्यांनी केले, तर जेवणाची व्यवस्था दिलीपजी कटारिया व ग्रुपचे काही सदस्यांनी केले, रिसाॅर्ट मधील सर्व व्यवस्था व आलेल्यांची ठेप पाहिल्यानंतर जातांना सर्वजण न विसरता महेंद्रजी सुंदेचामुथा व सर्व सदस्यांचे कौतुक करून आभार व्यक्त करीत होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ धोका, महेश लुंकड यांनी केले.