Newsworld marathi Pune : रमणबागेच्या फरसबंद चौकात बसलेले दीड दोन हजार विद्यार्थी. व्यासपीठावरून होत असलेली व्हायोलिन, तबला आणि पेटीची जुगलबंदी हा खरोखरच एक दिव्य असा अनुभव होता.निमित्त होते व्हायोलिन अकॅडमी तर्फे आयोजित संगीत मैफिलीचे. पं.तेजस उपाध्ये (व्हायोलिन), पं. अनिरुद्ध पंडित(तबला), पं. अजय पराड(हार्मोनियम) या दिग्गज कलाकारांनी रमण बागेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जुगलबंदीने अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले. भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध राग, काही गीते, तसेच वंदे मातरम् या गीतांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.द्वितीय सत्राच्या बहुआयामी तासिकेला या कार्यक्रमाद्वारे सुरुवात झाली. मुख्याध्यापिका श्रीमती चारुता प्रभुदेसाई, पर्यवेक्षक श्रीमती अंजली गोरे, श्रीमती मंजुषा शेलुकर यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. बहुआयामी तासिका प्रमुख श्री रवींद्र सातपुते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सौ दीप्ती डोळे यांनी सूत्रसंचालन केले.