Newsworldmarathi Pune : उडान याेजनेच्या माध्यमातून छाेटी व माेठी शहरे एकमेकांशी जाेडली जात अाहे. या याेजनेच्या माध्यमातून दीड काेटी नागरिकांनी मागील दाेन ते अडीचवर्षात प्रवास केला अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने विमान प्रवास सर्वसामान्यांचे अावाक्यात अाला अाहे. केंद्राचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी उडाण याेजना पुढील दहा वर्ष कायम ठेवणार अाहे. पुढील पाच वर्षात चार काेटी लाेक या याेजनेतून प्रवास करतील. विमानतळावर सर्वसामान्य प्रवाशांना खाद्य पदार्थ महाग मिळतात अशा तक्रारी येत हाेत्या.
त्यानुसार उडाण याेजने प्रमाणे उडाण यात्री कॅफे सुरु करण्यात अाले. कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, याठिकाणी हे कॅफे सुरु झाले असून अाता प्रवाशांना याचा लाभ पुणे विमानतळावर देखील मिळणार अाहे. २० रुपयात काॅफी, सामाेसा, मिठाई , दहा रुपयात चहा, पाणी बाॅटल प्रवाशांना उपलब्ध हाेईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच ही याेजना मुंबई विमानतळावर देखील सुरु हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Oplus_131072
माेहाेळ म्हणाले, देशात दहा वर्षापूर्वी ७४ विमानतळ हाेते ती संख्या अाज १६० पर्यंत वाढलेली अाहे. पूर्वी लाेक एसटी, रेल्वे मागणी करत हाेते अाज विमान मागतात हा बदलत्या भारताचा अाणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकेत अाहे. २०४७ चा विकसित भारत संकल्प पंतप्रधान यांनी देशासमाेर ठेवला असून यात विमान क्षेत्राचा वाटा माेठा असणार अाहे. ४०० विमानतळे विकसित करण्याचा संकल्प अाहे. पुणे विमानतळ मध्ये माेठा बदल झाला अाहे. पुण्यात दरराेज २०० विमाने ये-जा करत अाहे. ५२ हजार चाैरस मीटर नवीन टर्मनिल झाले असून दरवर्षी ९० लाख लाेक या विमानतळावरुन प्रवास करत अाहे. ३४ चेकिंग काऊंटर निर्माण झाली. २५ डीजी यात्रा सुरु झाले अाहे. जुने टर्मिनल देखील पुर्नविकास हाेणार असून १४ नवीन काऊंटर निर्माण हाेतील त्यामुळे अधिक १० ते १५ लाख प्रवासी प्रवास करु शकतील. १०.६६ टक्के प्रवासी क्षमता वाढ, ६० टक्के प्रवासी वाढ, कार्गे वाहतूक ८.४५ टक्के वाढली असल्याने अामूलाग्र बदल पुणे विमानतळावर दिसून येत अाहे. पुणे- भाेपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदाैर, डेहराडून विमानसेवा नव्याने सुरु झाली अाहे. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणबाबत सातत्याने बैठक सुरु अाहे. २०० एकरपेक्षा अधिक जागा ताब्यात घेण्याचे सुत्र ठरले अाहे. विमानतळ विस्तारीकरणसाठी राज्यशासन भूसंपादन करेल. कार्गाेसाठी प्राेत्साहन देण्यात येणार अाहे.
पुणे विमानतळ मेट्राे मार्गशी जाेडणार
खडकवासला ते खराडी हा मेट्राे मार्ग पुणे विमानतळाला जाेडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा झाल्या अाहे. महा मेट्राे, मनपा यांच्याशी संबंधित विषय असून मनपा अाणि मेट्राे याबाबत डीपीअार करण्यासाठी प्रयत्न करेल. पुण्यातील चार मेट्राे मार्ग निगडी ते स्वारगेट, हिंजवडी ते शिवाजीनगर, वनाज ते रामवाडी ,खडकवासला ते खराडी हे सर्व मेट्राे मार्ग विमानतळाशी मेट्राेने थेट जाेडण्याचे नियाेजन सुरु अाहे. पुणे शहराची लाेकसंख्या ६० लाख तर जिल्हामिळून एक काेटीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे पुढील ५० वर्षाचा विचार करता अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहिली असे माेहाेळ यांनी सांगितले.
Newsworldmarathi Pune: रुई (ता. बारामती) गावचे सुपुत्र अभिजित रामदास चौधर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत देशात ४८७ वा क्रमांक मिळवून IAS/IPS सेवेसाठी यशस्वी निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरण, बारामती परिमंडळातर्फे मा. मुख्य अभियंता पेठकर साहेब यांच्या शुभहस्ते अभिजित यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
अभिजित रामदास चौधर यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिजित यांनी पाच वेळा अपयशाचा सामना केला, मात्र हार न मानता सहाव्या प्रयत्नात देशात ४८७ वा क्रमांक मिळवून अखेर स्वप्नपूर्ती केली. येत्या वर्षभरात ते आयपीएस अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणार आहेत.
त्यांच्या वडिलांनी रामदास चौधर यांनी परिस्थिती कठीण असतानाही मुलाच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. शेती आणि इतर कष्टाची कामे करत त्यांनी आर्थिक तजवीज केली व अभिजितला शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले.
अभिजित यांनी जिद्द, अथक परिश्रम आणि सचोटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून दाखवून दिले की, प्रतिकूल परिस्थितीतूनही स्वप्नवत यश मिळवता येते. त्यांच्या या यशाने रुई गावासह संपूर्ण बारामती तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.
Newsworldmarathi Team : कॅनडामध्ये राहणारे भारतीय अनेक समस्यांचा सामना करत आहेत. देशातील घरभाड्याचे दर प्रचंड वाढले आहेत, ज्यामुळे नागरिकांना घराच्या हफ्त्यांमध्ये अडचणी येत आहेत. ‘घराचे हफ्ते थकले, घरभाडं परवडेना अन् नोकऱ्याही नाहीत’ अशी परिस्थिती अनेक कॅनडियन भारतीयांच्या जीवनात आहे. कॅनडामध्ये अलीकडील काळात घरभाड्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत, जेणेकरून मासिक खर्च अधिक वाढला आहे.
त्याच वेळी, कामाच्या संधी कमी होण्याची समस्या देखील गंभीर बनली आहे. अनेक भारतीयांना नोकरी मिळवण्यासाठी लांब प्रतीक्षा करावी लागते. तसेच, काही लोकांना कॅनडाच्या रोजगार बाजारात योग्य संधी मिळत नाहीत, ज्यामुळे जीवनावश्यक खर्च पूर्ण करणे कठीण होऊन बसले आहे.
कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आधाराशिवाय, कॅनडामध्ये जीवन जणू अधिक किचकट आणि खर्चिक होऊन बसले आहे. सध्या, कॅनडामध्ये वस्ती वाढल्यामुळे अनेक भारतीयांसाठी आपल्या आर्थिक स्थितीला सुसंगत ठेवणे एक मोठे आव्हान बनले आहे.
कॅनडात भारतीयांसाठी राहणं कठीण होण्याचे मुख्य कारण म्हणजे घरभाड्याचे वाढलेले दर, नोकऱ्यांच्या संधींची कमतरता, आणि उच्च जीवनमानाची मागणी.
1.घरभाड्याचे वाढलेले दर: कॅनडात घरभाड्याचे दर अत्यधिक वाढले आहेत, खासकरून टोरंटो, वॅन्कुव्हर आणि ओटावा सारख्या मोठ्या शहरांमध्ये. काही ठिकाणी घरभाड्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत, ज्यामुळे अनेक कुटुंबांना घराच्या हफ्त्यांची भांडी भरणे कठीण झाले आहे. यामुळे भारतीय स्थलांतरितांना मोठ्या आर्थिक दबावाचा सामना करावा लागतो.
2.नोकऱ्यांची कमतरता: कॅनडामध्ये एकाच वेळी अनेक लोक स्थलांतर करतात, त्यामुळे नोकऱ्यांच्या संधी कमी होतात. भारतीय नागरिक, जेथे उच्च शिक्षण आणि कौशल्य असतानाही, त्यांना कॅनडातील रोजगार बाजारात त्यांचे स्थान मिळवण्यासाठी जास्त वेळ लागतो. तसेच, कॅनडातील काही नोकरींच्या मागणीतील बदल आणि डिजिटल क्षेत्रातील स्पर्धा नोकरी मिळवणे आणखी कठीण करते.
3.आर्थिक दबाव: कॅनडात उच्च जीवनमान आणि महागाईमुळे, कुटुंबांना गरजेच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसले आहे. या सर्व कारणांमुळे भारतीयांसाठी कॅनडात राहणं अधिक कठीण होत आहे.
Newsworldmarathi Mumbai : अवघ्या १२ व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी आता आयपीएलमध्येही चमकला आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत धडाकेबाज शतक ठोकले. त्याच्या खेळीत ११ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.
वैभवचा जन्म ताजपूर गावातील शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि कुटुंबाच्या संघर्षामुळे त्याने लहान वयातच क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. स्थानिक स्पर्धांतून सुरुवात करत त्याने बिहार क्रिकेट असोसिएशनचे लक्ष वेधले. आज त्याच्या कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्याकडे वळवले आहे.
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, वैभवमध्ये भारतीय क्रिकेटला नवे क्षितिज गाठण्याची ताकद आहे.
बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर गावातून आलेला वैभव सूर्यवंशी सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला वैभव अवघ्या चार वर्षांपासून बॅट हातात धरून मैदान गाजवत आहे. वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाच्या स्वप्नासाठी सर्व काही पणाला लावले; आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी वैभवला खेळण्याची संधी दिली.
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधील कामगिरीतून वैभवने आपली चमक दाखवली आणि बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (BCA) दृष्टीत भरला. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करत त्याने भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात तरुण खेळाडूचा मान पटकावला.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले. कुटुंबाने आर्थिक अडचणींना तोंड देताना जमीन विकण्यापर्यंत मजल मारली, पण वैभवच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही
वैभवने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून आपली चमक दाखवली आणि लवकरच बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (BCA) नजरेत आला. त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला वयाच्या 12व्या वर्षीच रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, ज्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला.
28 एप्रिल 2025 रोजी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. अवघ्या 35 चेंडूत 100 धावा ठोकत त्याने आयपीएलमधील सर्वात कमी वयातील शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीत त्याने तब्ब 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने गुजरात टायटन्सच्या दिग्गज गोलंदाजांचा आत्मविश्वासही ढासळला.
Newsworldmarathi Pune: पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वे क्रमांक २०४९५ व २०४९६ या दोन रेल्वेगाड्या नियमीतपणे हडपसरवरून धावणार आहेत. त्यामुळे राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच रेल्वे प्रवासाचे बुकिंगही सुरु करण्यात येणार आहे.
जिल्हयातील संपूर्ण राजस्थानी समाजातर्फे मागील अनेक वर्षापासुन ही सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. राजस्थानमधील खासदार पी. पी. चौधरी, गजेंद्रसिंग शेखावत, पुण्याचे खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर मान्यवरांनी ही सेवा सुरु करण्यासंबंधी राजस्थानी समाजाच्या वतीने रेल्वे मंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, अशी माहिती राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिली.
Oplus_131072
रेल्वेसेवेची मागणी पूर्ण झाल्याने संपुर्ण राजस्थानी समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून पुणे-जोधपूरदरम्यान रोज साधारणतः ६० ते ७० बसेस सुरु आहेत. रोज अपघात होत असून निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागत होते. संघटनेने केलेल्या मागणीनुसार साप्ताहिक रेल्वे सुरु झाली परंतु सर्वांची मागणी ही नियमित रेल्वेची होती ती आज पुर्ण झालेली आहे त्याबद्दल रेल्वेखाते आणि अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करत ही सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी असेही राठी यांनी सांगितले.
Newsworldmarathi Sangali : काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्येचे निधन झाले आहे. भारतीताई महेंद्र लाड यांच्या अकाली मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी याबाबत माहिती दिली.
विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.’
पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांचे पती महेंद्र लाड हे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे एनआयए औपचारिकपणे या हल्ल्याचा तपास करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने हल्ला झाल्यापासून पहलगाममध्ये तळ ठोकला आहे. आता केंद्र सरकारने अधिकृतपणे संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून सखोल तपास सुरू आहे. पहलगमामधील हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी येथील सुरक्षेची जबाबदारी प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एनआयए लवकरच या हल्ल्याच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करेल. हल्ल्याचा कट कोणी व कुठे रचला? यामध्ये सहभागी दहशतवादी संघटना, त्यांची भूमिका, स्लीपर सेलचा संभाव्य धोका याविषयीचा तपास करून लवकरच गृह मंत्रालयाला अहवाल सादर करेल.
हल्ल्याचे गांभीर्य ओळखून घेतला निर्णय
एनआयएने या प्रकरणाशी संबंधित प्राथमिक माहिती गोळा केली आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा तपास राष्ट्रीय पातळीवर पुढे नेता येईल. सुरुवातील जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, हल्ल्याचे गांभीर्य, नागरिकांची सुरक्षितता, मोठा दहशतवादी कट व आगामी धोके लक्षात घेता गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. पहलगामधील हा हल्ला भारतातील सुरक्षा यंत्रणांपुढील मोठे आव्हान आहे. संरक्षण यंत्रणा व गुप्तचर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन येथे घुसून पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या हल्ल्याचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे हे संरक्षण यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच तपास यंत्रणांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल.
Newsworldmarathi Mumbai: पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात विविध गुन्ह्यांची यशस्वी उकल करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवला आहे. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल २७ वर्षांपूर्वी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘मुद्देमाल निर्गती मोहिमे’ अंतर्गत १९९७ मध्ये जप्त केलेले १७.५० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मूळ मालक विनोदकुमार जीव लाल शहा (रा. दादर, मुंबई) यांना परत मिळाले.
धीरज विनोदकुमार शहा व विनोदकुमार जीव लाल शहा यांनी मुद्देमाल परत मिळवण्यासाठी करण्यात आलेले अर्ज, संबंधित व्यक्तींचे निधन आणि न्यायालयीन प्रक्रिया अशा विविध टप्प्यांमुळे प्रकरण रखडले होते. २०१७ मध्ये निर्गतीचे आदेश झाले असतानाही संबंधित व्यक्तींना त्याची माहिती नव्हती.
सहा. पोलीस आयुक्त संजय ऐनुपरे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे व त्यांच्या पथकातील मपोहवा ज्योती दुधाने व मपोकॉ सुशिला सवार यांनी अथक परिश्रम घेऊन मुंबईतून विनोदकुमार यांचा शोध घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अखेर त्यांच्याकडे हा मौल्यवान मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
आपले वाडवडिलांचे पिढीजात दागिने परत मिळाल्याने विनोदकुमार जीव लाल शहा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी संपूर्ण पोलीस विभागाचे मनापासून आभार मानले.
Newsworldmarathi Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील यशदा येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे’, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात राज्याची मोठी गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी 5 वर्षांमध्ये आपल्याला नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक 5 किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. ‘लखपती दीदी’सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Newsworldmarathi Pune :जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांचा मृत्यू झाला होता. गनबोटे आणि जगदाळे या दोन्ही पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून, आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.
याप्रसंगी गनबोटे यांच्या कोंढवा येथील गंगानगरच्या घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी
मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. या वेळी गनबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतला. दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभगनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. गनबोटे आणि जगदाळे दोघे जिवलग मित्र होते.