Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. अश्यातच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला नाराज नेतेमंडळींची मनधरणी करता येत नसल्याचेच दिसून येत आहे. पक्षातील नेतेमंडळींमध्ये समन्वय नसून अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की,
“सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अश्या आशयानेच मी आजवर काम करत आलोय. पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे काम केले आहे. जनप्रश्र्नांसाठी अनेक आंदोलने केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो.
२०२१ सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमच न्याय देण्याचे आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किंबहुना ती वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहिलो आहे.
काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार आणि हा पक्ष आजही तळागाळातील आणि गावकुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे.”
Newsworldmarathi Pune: खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज येथील अपूर्ण पुलाच्या कामाची पाहणी केली. जागेच्या हस्तांतराअभावी हे काम रखडले आहे. स्थानिक नागरिकांनी काम लवकर पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली आहे, कारण या पुलामुळे परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खा. सुळे यांनी नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्या व लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, स्वाती पोकळे, अमृता बाबर, अधिकारी व पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: “आलेच मी…” या गाण्यावर गौतमीने डान्स केला आहे. या व्हिडिओत ती “आलेच मी…” गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबत सईदेखील थक्क झाली आहे. सईने गौतमीच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करत “विषय कट” असं म्हटलं आहे.
सबसे कातील गौतमी पाटील नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. ट्रेंडिंग गाण्यावर गौतमी रील व्हिडिओ बनवताना दिसते. आता गौतमीने सईच्या लावणीवर ठेका धरला आहे. “आलेच मी…” या गाण्यावर गौतमीने डान्स केला आहे. या व्हिडिओत ती “आलेच मी…” गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबत सईदेखील थक्क झाली आहे. सईने गौतमीच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करत “विषय कट” असं म्हटलं आहे.
गौतमीने आजवर तिच्या लावणीवरील नृत्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. आता तिने सईच्या ‘आलेच मी’ या गाण्यावर खास लावणी नृत्य सादर केलं आहे. अभिनेत्री सई पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. ‘देवमाणूस’ या चित्रपटातील ‘आलेच मी’ या गाण्यावर पहिल्यांदाच सईने फक्कड अशी लावणी सादर केली आहे. सईच्या या पहिल्या वहिल्या लावणीला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या लावणीवर अनेक चाहते आणि नेटकरी नृत्य सादर करत आहेत. त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गौतमी पाटीललादेखील (Gautami Patil) सईच्या लावणीची भुरळ पडली आहे.
Newsworldmarathi Beed : नारळी सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस गहिनीगडावर आले होते. यावेळी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा देखील उपस्थित होत्या. वामनभाऊंचा गड दत्तक घ्या, अशी मागणी यावेळी पंकजा मुंडेंनी फडणवीसांकडे केली.
ह.भ.प. संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताह सांगता सोहळ्यास घाटशीळ पारगाव ता. शिरूर कासार जि.बीड येथे मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांची उपस्थित होते.
बीड जिल्ह्याला वारकरी संप्रदाय आणि संताची मोठी परंपरा आहे. ही परंपरा जपण्याचे काम गहिनीनाथ गड प्रामुख्याने करत आहे. महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र जींच्या माध्यमातून गहिनीनाथ गडावर विविध विकासकामे सुरू आहेत.
Oplus_131072
अध्यात्माला समाजकारणाची जोड देवून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल, असा विश्वास यावेळी बोलतांना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मठाधिपती ह.भ.प विठ्ठल महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आ.मोनिकाताई राजळे, आ.नमिताताई मुंदडा, आ.सुरेश धस, मा.आ.जयदत्त क्षीरसागर, मा.आ.भीमराव धोंडे, मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, प्रा.लक्ष्मण हाके, घटशीळ पारगाव चे सरपंच नवनाथ खेडकर आणि ग्रामस्थ यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Newsworldmarathi Beed : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेताल व निराधार विधानं करणाऱ्या बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाने त्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रणजीत कासले यांनी भारत निवडणूक आयोग आणि शासनाविषयी बदनामीकारक व खोटी विधानं करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. लोकसेवक असतानाही त्यांनी भारताची सार्वभौमत्व आणि सुरक्षितता धोक्यात येईल अशी वक्तव्ये करून निष्काळजीपणा दाखवला.
कासले यांनी असेही म्हटले की, त्यांच्या बँक खात्यात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० लाख रुपये जमा झाले होते आणि हे पैसे परळी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशिनपासून दूर राहण्यासाठी आणि छेडछाडीवर गप्प बसण्यासाठी दिले गेले, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल जनतेमध्ये संशय निर्माण होऊ शकतो, तसेच निवडणूक आयोग आणि शासनाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.
Newsworldmarathi Beed : बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडावर नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षण पाहायला मिळाला. या कार्यक्रमात भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस एकत्र मंचावर आले. विशेष म्हणजे, सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करत आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले.
या अध्यात्मिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस एकत्र येताच, राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच ऊत आला. अनेकांनी या उपस्थितीचा राजकीय अर्थ लावायला सुरुवात केली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडाशी संबंधित आठवणी सांगितल्या. त्या म्हणाले, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखवणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
नारळी सप्ताहाची थोर परंपरा आहे. येथून सर्व वारकरी संप्रदायचा जन्म होतो. वामन भाऊंचा आदरयुक्त धाक आहे. भगवान बाबांच्या जीवनात सर्व वैभव आणि संपत्ती होती. त्यानंतर त्यांनी सर्व सुखाचा त्याग करुन ईश्वराच्या मार्गाने जाण्याची वैभवशाली परंपरा सुरु केली. ज्याच्या कार्मात वैभव आहे, तोच जीवनात पुढे जाऊ शकतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले
Newsworldmarathi Pune: पुण्यातील खाजगी बांधकाम व्यवसायिकांची सर्वोच्च संस्थाअसलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी २०२५-२७ या कार्यकाळासाठी श्री.मनीष जैन यांची निवड करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व प्लांट बायोटेक्नॉलॉजीक्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनीयुनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न मिसिसिपी येथून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनीष जैन म्हणाले, “ही भूमिका स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि पुण्याच्या रिअल इस्टेटक्षेत्राच्या वाढीसाठी आणि शाश्वततेसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे. क्रेडाई पुणे मेट्रोकडून विकासक, घर खरेदीदार आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी चांगले भविष्यघडविण्यासाठी नावीन्यपूर्णता, पारदर्शकताआणि सहयोगी प्रयत्नांवर भर दिला जाईल.”
त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अनेक महत्त्वाच्या विषयांवरलक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये पीसीएमसी (PCMC)व आजूबाजूच्या ५ किमी परिसरातील पर्यावरण मंजुरीच्या समस्या सोडवणे, पीएमआरडीएचा (PMRDA) विकास आराखडा (DP) अंतिम करणे,प्रकल्पांसाठी योग्य पाणी वाटप व मीटरिंग सुनिश्चित करणे, तसेच उद्योग सुलभतेसाठी प्रक्रियांत सुधारणा करणे यांचा समावेश आहे. तसेचबांधकाम क्षेत्रातील दर्जा,वेग आणि खर्च कार्यक्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबवाढविण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या कार्यपद्धती व प्रणालींच्या सविस्तररचनेवरही ते देखील लक्ष केंद्रित करतील.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन यांनी माजी अध्यक्ष आणि आता क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. नवीन कार्यकारिणीत _उपाध्यक्ष म्हणून अरविंद जैन, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, आय.पी.इनामदार, नितीन न्याती, जे.पी.श्रॉफ, सचिव म्हणून अश्विन त्रिमल आणि संयुक्त सचिव म्हणून तेजराज पाटील आणि अखिल अगरवाल हे खजिनदार म्हणून असतील तसेच जनसंपर्क प्रमुख म्हणून कपिल गांधी_ यांच्याकडे ही जबाबदारीराहील.
व्यवस्थापकीय समितीमध्ये _संजय देशपांडे, मनीष कनेरिया, अनुप झमतानी, पुनित ओसवाल, केतन रुईकर, दिलीप मित्तल, रिंकू शेवानी, सिद्धार्थ मूर्ती, ईशान मगर, कपिल त्रिमल, सपना राठी, मिलिंद तलाठी, हिरेन परमार, आशिष जैन, भूषण पलशरे आणि भूषण पलशरे_ यांचा समावेश आहे.
या नवीन कार्यकारिणीचा अधिकृत स्थापना चेंज ऑफ गार्ड समारंभ २६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केला जाणार आहे.
Newsworldmarathi Beed : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे दिल्याच्या पुरावा सहित तक्रार दाखल केली आहे.
रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे कार्यरत होता, त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली. डिसेंबर 2024 मध्ये रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारी ने मागणी केली.
एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी मला दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा आग्रह केला होता मात्र मी तसे न करता वैयक्तिक त्यांच्याच बँक खात्यावर पैसे पाठवले. त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो, असे सांगितले होते. साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली.
माझे पैसे मला गरजेच्या वेळी परत न दिल्यास मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले, किंवा त्यांनी गुजरात मधून मला काही रक्कम पाठवली. तसेच सायबर ठाण्यातील गिरी नामक कर्मचाऱ्यांच्या हाताने दोन लाख रुपये, असे तीन वेळा मिळून साडे सात लाख रुपये परत दिले आहेत. तर उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारी सोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन कासले वर काय कारवाई क याकडेही आता लक्ष लागले आहे.
Newsworldmarathi Pune : ‘तरुणांनो, टोकाचा निर्णय घेऊ नका. बोलते व्हा, आपले मनमोकळे करा. मनातील नैराश्याचे ओझे दूर करून कणखरपणे उभे राहा,’ अशी साद कनेक्टिंग ट्रस्टने तरुणाईला व समाजात नैराश्य, तणावाने ग्रस्त लोकांना घातली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात २२४ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, १७७ आत्महत्या पुरुषांनी केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. तरुण पिढीच्या मानसिक व भावनिक समस्यांकडे अतिशय गंभीरतेने बघायची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कनेक्टिंग ट्रस्टने टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन केले आहे. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध यासाठी २० वर्षांपासून कनेक्टिंग ट्रस्ट हेल्पलाईनद्वारे काम करीत आहे. तणावाखाली, नैराश्यात असलेल्याना भावनिक आधार देत, त्यांना व्यक्त होण्याची संधी देत आत्महत्येपासून परावृत्त केले जात आहे. यासाठी ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या दोन विनामूल्य हेल्पलाईन आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कार्यरत आहेत. कॉलच्या सुविधेसह अपॉइंटमेंटद्वारे प्रत्यक्ष भेटून बोलायची सोयही आहे. विनामूल्य अपॉइंटमेंट ८४८४०३३३१२ ह्या क्रमांकावर फोन, मेसेज करून घेता येते. ईमेलद्वारे व्यक्त व्हायचे असेल, तर distressmailsconnecting@gmail.com यावर बोलता येते. या सर्व सुविधा विनामूल्य आहेत.
कनेक्टिंग ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार म्हणाले, “गेल्यावर्षी (२०२४) एकूण ९३४० कॉल आले. त्यामध्ये ६५ टक्के पुरुषांचे, तर ३५ टक्के महिलांचे कॉल आले होते. या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींकडून आल्याचे निरीक्षण आहे. हेल्पलाईनवर कोणतेही सल्ला न देता व कोणतीही वैयक्तिक किंवा नैतिक निकष लावलेले निर्णय न देता केवळ सहृद्ध भावनेने त्यांचे ऐकून घेऊन भावनिक आधार दिला जातो. मन मोकळे होऊन भावनिक ताण कमी होण्यास मदत होते. सध्या ४७ प्रशिक्षित स्वयंसेवक ही हेल्पलाईन चालवत आहेत. या कार्यात नवीन स्वयंसेवकांना जोडण्याची संधी आहे. त्यासाठी जूनमध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण आयोजिले आहे. इच्छुकांनी ९८३४४०६०३३ ह्या क्रमांकावर चौकशी करावी.”
“एका बाजूला तरुण वर्गामध्ये मानसिक आरोग्याविषयी वाढत असलेली जागरूकता आणि संवेदनशीलता दिसते, तर दुसरीकडे याच तरुणाईमध्ये तीव्र मानसिक ताणतणाव आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण बघायला मिळते. शिक्षण व नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या, नातेसंबंधांमधील तणाव, आर्थिक अडचणी, मानसिक आजार, कौटुंबिक कलह, सामाजिक विषमता, लैंगिक समस्या, प्रेम प्रकरणातील ताण, व्यसनाधिनता या आणि अशा अनेक समस्या आजच्या तरुणवर्गाला भेडसावत आहेत. या समस्यांचे रूपांतर मानसिक नैराश्यात होऊन आत्महत्येच्या विचारांमध्ये होत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याची कारणमीमांसा करायला गेलो, तर अनेक तर्क केले जातात. पुरुष आपल्या समस्यांविषयी सहज बोलते होत नाहीत. पुरुष हा घरातला कर्ता असल्यामुळे त्याने मानसिकरीत्या सक्षम असले पाहिजे, आपला समाज पुरुषांना अतिसंवेदनशील असू देत नाही, अशी काही कारणे यामागे आहेत. तसेच सर्व कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक अपेक्षांच्या ओझ्याखाली बहुतेक पुरुषवर्ग दबला गेला आहे. ज्यामुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त करणे कठीण होऊन बसते. पुरुष आपल्या मानसिक, भावनिक ताण किंवा समस्यांविषयी आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात बोलू शकत नाहीत. भौतिक समस्या, तीव्र भावनिक ताण, नैराश्य आणि कुचंबणा याचे रूपांतर आत्महत्येच्या विचारांमध्ये होते,” असेही पवार यांनी नमूद केले.
Newsworldmarathi pune : नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई-मेन-२०२५ या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला असून या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या चाटे क्लासेस, व ज्युनियर कॉलेजच्या २३१ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश मिळविले असून ते सर्व विद्यार्थी जेईई अॅडव्हॉन्ससाठी पात्र ठरले आहेत. समुहाच्या रूद्र माळगी (९९.४९), यशदिप पोरे (९९.३८), आर्या खापणे (९८.९०), आयुष पोवार (९८.६४), ओम फराकटे (९८.५५) या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे. हे यश चाटे पॅटर्ननुसार मेहनत घेणार्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन समुहाचे संचालक प्रा. फुलचंद् चाटे यांनी केले.
या निकालाविषयी सविस्तर माहिती देताना प्रा.फुलचंद चाटे म्हणाले, देशभरातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि राज्य पातळीवरील शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी कॉलेजमधील सर्व प्रवेश जेईई-मेन्स आणि अॅडव्हान्स या परीक्षांच्या आधारे पूर्ण होतात. या परीक्षेमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई-अॅडव्हान्स ही परीक्षा १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंबंधी अधिकची माहिती आणि मार्गदर्शनासाठी चाटे शिक्षण समुहाच्या शाखेवर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आवाहन चाटे व्यवस्थापनातर्पेâ करण्यात आले आहे.
‘जेईई-अॅडव्हान्स २०२५’ साठी पात्र ठरलेले चाटे शिक्षण समुहाचे काही विशेष गुणवंत विद्यार्थी व त्यांचा एनटीए स्कोर पुढीलप्रमाणे – रूद्र माळगी (९९.४९), यशदिप पोरे (९९.३८), आर्या खापणे (९८.९०), आयुष पोवार (९८.६४), ओम फराकटे (९८.५५), मिहीका कुंभोजकर (९७.६३), हर्षवर्धन शिंदे (९७.३०), सोहम खतकर (९६.५७), श्रेयस फराकटे (९५.४०), ओंकार पाटील (९५.२३), अखिलेश कदम (९४.६४), प्रथम जैन (९४.४७), सृजन कापसे (९४.३७), शृती दिसले (९४.१०), सेजल जाधव (९४.०६), पृथ्वीराज निचिते (९४.०२), सिद्धांत देशमुख (९३.९५), जयवर्धन मोहिते (९३.५५), ओम जंगम (९३.४७), हर्षवर्धन साळुंखे (९३.२९), नीरज कामत (९३.०४), विनीत वडीणगेकर (९२.९०), अभिनव मिश्रा (९२.२९), आयुष पाटील (९२.२७), उझेर सय्यद (९२.१६), तेजस उपड (९१.८३), आदर्श कुंभार (९१.६१), सोहम गुरव (९१.०२).
चाटे शिक्षण समुहाचे कॉलेज व क्लासचे सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक, प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या़ .