विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकही शाळेत गणवेशात येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा निर्णय

0
Newsworldmarathi Mumbai : शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड लागू होणार, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूतोवाच केले आहे. ‘ड्रेसकोडसाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेला त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. राज्यातील काही शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड आहे. तर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये गणवेश नाही, त्यामुळे सरकार सर्वच शाळांमधील शिक्षकांना गणवेश अनिवार्य करणार असल्याचं शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी म्हणाले. अजंगमधील शाळेत एका कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले, राज्यातील शिक्षकांनाही गणवेशात यावे लागेल. त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी अजंगच्या शाळेच्या व्यवस्थापनावर कौतुकाची थाप दिली आणि तेथील शिक्षकांचं कौतुक केलं. अजंगच्या शाळेतील शिक्षक हे गणवेशात आले होते, त्यामुळे दादाजी भुसे यांनी अजंगच्या शिक्षकांचं कौतुक केलं. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ‘ ड्रेसकोड ‘ लागू करणार असून त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR ) अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते. शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले.

निष्ठावंत हटके भक्तांमुळे गीतरामायणाला महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले

0
Newsworldmarathi Pune : मराठी माणसाच्या काळजातील एक खास कप्पा ‘गीतरामायण’ने व्यापलेला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांत कार्यरत असलेली अनेक मंडळी या हटके म्युझिकल ग्रुप द्वारे, आपापल्या मार्गाने या अजरामर काव्याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात,हीएक विलक्षण बाब आहे. ‘गीत रामायण’चा आदरभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हटके म्युझिक या ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहेत. या काव्यरचनेला जे महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले आहे,त्यामागचेखरे कारण म्हणजे अश्या प्रकारच्या निष्ठावंत हटके भक्तांचे अविरत कार्य आणिसमर्पणभाव, अशी भावना लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली. हटके म्युझिक ग्रुप यांची गीतरामायण सादरीकरणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रमम्हणून नोंद झाली आहे. यानिमित्त हटके गीत रामायण विश्वविक्रम सोहळा कार्यक्रमाचेआयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये करण्यात आले होते.यावेळी हटके म्युझिक ग्रुपचे संचालक शिरीष कुलकर्णी, जेष्ठ व्यावसायिक पुष्कराज ग्रुप चे सर्वेसर्वा शैलेन्द्र गोस्वामी, फ्लुइड कंट्रोल्स चे संचालक तानसेन चौधरी आणि श्रेष्ठ गायक आणि हार्मोनिअम वादक अनिल मोटे आदी उपस्थित होते. यावेळी गीतरामायणातील निवडक गीते सादर करण्यात आली. हटके म्युझिक ग्रुप या विश्वविक्रमाचे सर्व श्रेय – ज्यांनी गीत रामयणाचे लेखन केले ते आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि ज्यांनी संगीत दिले ते सांगीतिक दिग्गज बाबुजी यांना दिले आणि ते वंशा प्रमाणे सर्व माडगूळकर आणि सर्व फडके कुटुंबीयांना धन्यवाद व्यक्त केले. हटके म्युझिक ग्रुपच्या संगीत सेवेचे उपक्रम अत्यंत मनोभावे आणि सातत्याने पार पाडले आहेत. दि. २० एप्रिल २०२४ रोजीगीतरामायणातील संपूर्ण ५६ गीतांचे सलग आठ तास सादरीकरण विनामूल्य आणि सेवाभावातून करण्यात आले. त्यानंतर गीतरामायण महायज्ञ ५६ या उपक्रमाअंतर्गत हेच गीतरामायण ५६ वेळा विविध ठिकाणी देवालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम,आणिसमाजासाठी कार्य करणा-या संस्थांमध्ये सादर करण्याचा संकल्प घेऊन एक वर्षात तोपूर्ण सुद्धा झाला. १० दिवस सलग देवालयात सकाळीनिवडक गीतरामायणातील गीतेसादर करण्याचा संगीत सेवेच्या उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अनिल मोटे म्हणाले, गीत रामायण हे केवळ एक काव्यसंग्रहनाही, तर त्यातून अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. गीतरामायण हे मराठी भाषेच्या, उच्चारशुद्धतेच्या, लय, ताल, रागआणि रसांच्या शिक्षणाचेही एक अद्वितीय माध्यम आहे. शिरीष कुलकर्णी म्हणाले, यापुढेही हटके म्युझिक ग्रुप या माध्यमातूननवनवीन कार्यक्रम देत, सांगीतिक विश्वात तेजी आणून, अविरत संगीत सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करत राहील.

हवेली भूमी अभिलेख घोटाळा – उपअधीक्षक व मोजणी अधिकारीवर गुन्हा दाखल

0
Newsworldmarathi Pune :पुणे जिल्ह्यातील हवेली येथील भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन मोजणीच्या प्रकरणात ५० लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर ती दिली नाही म्हणून चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याप्रकरणी हवेली येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिकारी किरण येटाळे या दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय प्रकरण… याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराने हडपसर येथील मिळकतीची शासकीय शुल्क भरून मोजणी करून घेतली होती. त्यानंतर या मिळकतीची हद्द निश्चित करण्यासाठी संबंधित तक्रारदार हे हवेली भूमी अभिलेख कार्यालयात पाठपुरावा करत होते. या दरम्यान, त्यांना भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने हद्द निश्चित करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. तर मोजणी अधिकारी किरण येटाळे याने २५ लाख रुपयात हे काम करून देतो असं सांगितलं. तसेच तुम्ही रक्कम दिली नाही तर अमरसिंह पाटील हा अधिकारी हेलिकॉप्टर शॉट लावेल अशी धमकी देत मालमत्तेचं नुकसान करण्याची भीती घातली. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मिळकतीलगतच्या जमिनींची चुकीची ‘क’ प्रत तयार केली. त्यामुळं तक्रारदाराला अक्षरश: मानसिक आणि आर्थिक सोसावा लागला. या तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली. या प्रकरणी पोलिसांनी आता भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि मोजणी अधिकारी किरण येटाळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने यापूर्वी बारामतीतही काम केले आहे. हवेली येथे नियुक्ती झाल्यापासून हा अधिकारी चर्चेत होता

गौरव संविधानाचा’ कार्यक्रमातून उलगडला महामानवाचा संघर्षमय प्रवास

0
Newsworldmarathi Pune: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) तर्फे जागर संविधानाचा या उपक्रमाअंतर्गत आज ‘गौरव संविधानाचा’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला ‘गौरव संविधानाचा’ मधून उजाळा देण्यात आला.  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे  आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश संघटक  सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर  यांच्या पुढाकारातून  यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज  राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडीमध्ये दिमाखदार सांगीतिक कार्यक्रम  पार पडला. या कार्यक्रमाला पुण्यातील आंबेडकर प्रेमी जनतेची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सुमधूर व दर्जेदार गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त  दाद दिली. उदय साटम निर्मित – दिग्दर्शित ‘गौरव संविधानाचा’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा’ या गीताने करण्यात आली, त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यावरील  ‘दोनच राजे इथे ….’ , महात्मा फुले यांच्या वरील ‘धन्य धन्य ते महात्मा फूले’, ‘बुद्ध -कबीर – भीमराव – फुले’ यासह डॉ. आंबेडकर यांचा संघर्षमय जीवणप्रवास विविध गीते आणि संगीत नाटिका मधून उलगाडण्यात आला. या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन प्रतिक जाधव यांनी केले होते तर गायक दर्शन साटम, गायिका   उमा गावड, स्वाती हरवंदे यांनी गाण्यांचे सादरीकरण केले तर संगीत संयोजन शरद वाणी, अभिजीत मोरे यांनी केले होते.  यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते शैलेन्द्र चव्हाण, सांसकर्तीक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दुर्दैवी घटना…! नदीपात्रात पाय घसरुन पडलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; परिसर हळहळला

Newsworldmarathi Rajapur: राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे १७ एप्रिल रोजी सकाळी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नदीच्या पात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंधार अमित पळसुलेदेसाई (१५ मु. रायपाटण, कदमवाडी) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो रायपाटण येथील जिजामाता विद्यामंदिरात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंधार गुरुवारी सकाळी परीक्षा देऊन घरी निघाला होता. वाटेतच असलेल्या अर्जुना नदीवर हातपाय धुण्यासाठी मित्रांसमवेत तो गेला असता, नदीच्या पात्रातील एका दगडावर त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंधारला पाण्यातून बाहेर काढले आणि नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर गंधारचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी रायपाटण येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात गंधार याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, काका, आजी-आजोबा आणि इतर कुटुंबीय आहेत. दुःखद घटनेमुळे रायपाटण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यातील काँग्रेसला मोठा धक्का; संग्राम थोपटे उद्या करणार ‘मन की बात’

0
Newsworldmarathi Pune : Sangram Thopate राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून: थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या हालचालींनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग दिला होता. पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण थोपटे घराणं या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रभावी राहिलं आहे. भाजपच्या गोटात स्वागताची तयारी सुरू: भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि थोपटे यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. कारखाना अडचणीत असल्याने भाजप प्रवेश? संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती.

मंगेशकर रुग्णालयासंदर्भातला तो अहवाल जाळून टाका; खासदार सुप्रिया सुळे संतापल्या

0
पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना वाचवणारा अहवाल जाहीर झाला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात आमचे सहकारी प्रशांत जगताप हे न्यायालयात जात आहेत. त्यामुळे त्याचे मी जाहीर आभार मानते. एखाद्याची लेक, बायको, आई गेली आहे. असे असताना एखादा रिपोर्ट इतका चुकीचा कसा येऊ शकतो? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. एखादे सरकार महिलेबद्दल इतके असंवेदनशील कसे होऊ शकते? हे धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आम्ही तो अहवाल मानत नाही. त्या अहवालाला कचऱ्याच्या डब्यात नाहीतर जाळून टाकले पाहिजे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. प्रशांत जगताप या संदर्भात न्यायालयात लढत आहेत. आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकार माणुसकी विसरले असेल, मात्र आम्ही माणुसकी विसरलो नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात सुळे म्हणाल्या की, जाहीर झालेल्या या अहवालावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे अहवालात काय आहे? काय नाही? यामध्ये आम्ही वेळ घालवणार नाही. आमच्या राज्यात एका बहिणीची हत्या झाली आहे. त्या राज्यात आम्ही पुन्हा दुसऱ्या लेकीची किंवा महिलेची हत्या होऊ देणार नाही. सरकारच्या वतीने आरोपींना वाचवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळेच आम्हाला न्यायालयात जावे लागत आहे. या राज्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला न्यायालयात जावेच लागेल. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. मात्र, ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीची हत्या केली, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

खळबळजनक…! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार

Newsworldmarathi Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्राच्या घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जणांच्या टोळक्याने उचलून नेत त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) मध्यरात्री केडगावमध्ये बाह्यवळण रस्त्यावरील नेप्ती मार्केटजवळील मोकळ्या जागेत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करताना निर्दयी टोळक्याने त्याचे व्हिडिओ काढले. तसेच तिथे त्याला मारहाण करीत नग्न करून सामूहिक बलात्कार केला. याला जिवंत सोडून नका असे म्हणत कापडी पंचाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथनगर येथील रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) यांच्यासह अन्य सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत पीडित युवकाने तीन दिवसांनंतर गुरुवारी (दि. १७) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरकोळ वादातून १२ जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला मित्राच्या घरातून उचलून नेले. त्याला मारहाण करीत अनैसर्गिक अत्याचार केला. बेशुद्ध अवस्थेत मेला म्हणून सोडून दिल्याने सुदैवाने तो वाचला. या घटनेचं अधिक तपास कोतवाल पोलीस करत आहेत.

आई-वडिलांचे छत्र हरवलं; सासू सासऱ्यांनी वधूला आणण्यासाठी पाठवले हेलिकॉप्टर; धाराशिवमधील शेतकऱ्याची हटके स्टाईल

Newsworldmarathi Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड येथे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या वधूचे आदरयुक्त स्वागत करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी सासरच्या मंडळींनी अस्मिताला पाथरूड येथून नळी वडगाव फाटा येथील विवाहस्थळी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवत सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अस्मिता तिकटे असं वधूचं नाव आहे. अस्मिता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिच्या लहानपणीच डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अस्मिताचा मामाने सांभाळ केला आणि तालुक्यातीलच आंतरवलीच्या तरुणाशी लग्न जुळवून या शेतकरी कन्येचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडला. लग्नामध्ये चक्क नवरीसाठी पाठवले हेलिकॉप्टर अस्मिता ही भूम तालुक्यातील पाथरूड या मूळ गावची आहे. तिचा तालुक्यातीलच आकाश शिकेतोड याच्याशी शुक्रवारी विवाह सोहळा संपन्न झाला. या माध्यमातून आई-वडिलांचे छत्र हरपलेली एक अनाथ मुलगी शिकेतोड घराण्याची सून झाली. मुलीचे मामा लहू दासू माने यांनी पालक म्हणून कन्यादान केले. अतिशय भारावून टाकणाऱ्या या सोहळ्यासाठी अंतरवली येथील शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या या मुलाच्या लग्नामध्ये चक्क नवरीसाठी हेलिकॉप्टर पाठवले. मामानी केला सांभाळ अस्मिताची आई सुशिला व वडील केशव तिकटे यांचे निधन झाले आहे. या दोघांच्या मृत्यूने अस्मिताच्या डोक्यावरील छत्र हरवले होते. मामा लहू दासू माने हेही सर्वसाधारण शेतकरी असताना यांनी अस्मिता हिचा लहानपणापासून सांभाळ करून पोटच्या मुलीप्रमाणे पालनपोषण करून तिचा विवाह थाटामाटात लावून दिला. अस्मिताच्या सासू-सासऱ्यांनीही यापुढील पालकत्व स्वीकारत तिला हेलिकॉप्टरमधून लग्नस्थळी आणून स्वागत केल्याच्या क्षणाने सगळेच भारावून गेले होते.

लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! मुलाची वरात थेट हेलिकॉप्टरने

0
Newsworldmarathi Dharashiv : लग्नसमारंभ म्हटलं की गडगडाट वाजंत्री, नाच-गाणी, आणि दमदार वरात यांचीच तर मजा असते. पण या सगळ्यात एक शेतकरी मात्र चांगलाच चर्चेत आला आहे — कारण त्याच्या स्वागताची स्टाईलच काहीशी वेगळी आणि भन्नाट होती! या शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नात वाजतगाजत वरात आणण्याऐवजी यांच्याच लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आल्याने पंचक्रोशीत या फिल्मी स्टाईल लग्नाची चर्चा झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने आपल्या मुलाची हौसच पूर्ण केली आहे. गावकऱ्यांनी कौतुकाने म्हटलं – “लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही!” या हटके स्वागतामुळे फक्त नववधूच नव्हे, तर पाहुणे आणि सोशल मीडियावरचे युजर्सही भारावून गेलेत. धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची हौस म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी थेड हेलीकॉप्टर मागवला आहे. भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ही हेलीकॉप्टरमधून मिरवणूक काढाली होती, असे त्यांनी स्वतः सांगितले. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. आपली हौस भागवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढली. यामुळे याची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.