‘बदलापूरची’ पुनरावृत्ती…! कर्जतमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलींचे स्कूलबसमध्ये लैंगिक शोषण
Newsworldmarathi karjat: कर्जतमधील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसमधील अटेंडण्टने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुली अवघ्या ५ वर्षांच्या आहेत.या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी करण दीपक पाटील (वय-२४, वडाप, ता. कर्जत) या आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसायला सांगून त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करायचा. त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाणसुद्धा करायचा. हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
रात्रीच आरोपीला पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले होते. दरम्यान, तरुणाला कर्जत न्यायालयात दुपारी आणले असता, पालकांनी गाडीतून उतरणाऱ्या तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठा बंदोबस्त कर्जत न्यायालयाच्या आवारात लावला होता. यापूर्वी बदलापूरमध्ये असाच प्रकार घडला होता, आणि आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; काय झाली चर्चा?
Newsworldmarathi Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात निमंत्रित करण्यात न आलेले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून कोल्हापुरातील क्रिकेट मैदानासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपण बावनकुळे यांची भेट घेतल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. कोल्हापुरात क्रिकेटच्या मैदानासाठी आम्हाला महसूल विभागाकडून ३० एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर बावनकुळे यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला आहे, त्यामुळे येत्या काळात मुंबई, नागपूर, पुण्यानंतर कोल्हापुरातही आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे.
माणुसकीला सलाम… ! मुस्लिम बांधवानी केले बैलाचे विधिवत अंत्यसंस्कार
Newsworldmarathi Tuljapur : समाजामध्ये जाती-धर्माच्या भिंती समज-गैरसमजातून रुंदावत चाललेल्या असताना अजूनही प्रेम, माणुसकी, भूतदया जिवंत असल्याची सुखद घटना अणदूर (ता. तुळजापूर) येथे पाहायला मिळाली. अणदूर येथील पाटील तांड्यावरील शेतकरी राजूभाई शेख व कुटुंबीयांकडे असलेलया एका बैलाचे सोमवारी निधन झाले होते. त्यांनी त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.
आपल्याकडे असलेले गाय, बैल, म्हैस, कुत्रा यापैकी ब्रध्दापकाळाने किंवा अन्य कारणाने निधन झाले की त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची वडीलांनी सुरू केलेली परंपरा आजही सुरू ठेवली आहे.
राजूभाई शेख हे परंपरागत शेतकरी आहेत. त्यांच्या मागील दोन पिढ्या येथे वास्तव्यास आहेत. शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. त्यांच्याजवळील गाय, बैल, म्हशी, कुत्रे आदीवर जिवापाड प्रेम करुन त्यांचे संगोपन करण्याचा त्यांना छंद आहे. विशेष म्हणजे आपल्याजवळील एकही गाय किंवा बैलाची ते कधीही विक्री करीत नाहीत. जोपर्यंत गाय दुध देते व बैल शेतीच्या कामात चालतो तोपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतात.
काही शेतकरी गाय-बैल म्हातारे झाले की त्यांची कसायाला विक्री करतात. तर कांही शेतकरी आपल्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या वयोमर्यादा संपल्यावरही कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करुन अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ करतात, असं राजूभाई शेख यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाकडून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द : मितेश नहाटा यांना मोठा दिलासा
Newsworldmarathi Delhi : दिवाणी स्वरुपाचे प्रकरण असल्याचेे स्पष्ट करीत मध्य प्रदेश न्यायालयाचा आदेश फेटाळत (ीशीं ईळवश ) सर्वोच्च न्यायालयाने उद्योजक मितेश नहाटा यांचा जामिन तातडीने मंजुर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नहाटा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अहिल्यानगर येथील युवा उद्योजक मितेश नहाटा यांचा साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. विविध राज्यात साखर विक्री करतात. मात्र, मध्य प्रदेशातील काही साखर व्यावसायिकांनी नहाटा यांच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दिली होती. त्यानंतर नहाटा यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. नहाटा यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रकरणाचा सखोल विचार न करता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यामुळे नहाटा यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करीत नहाटा यांचा जामीन तातडीने मंजुर करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळून लावताना म्हटले आहे की हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याचे दिसते. मध्य प्रदेश न्यायालयाने जामिन मंज़ुर करायला हवा होता असे स्पष्ट केले. नहाटा यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ वकील गौरव अग्रवाल, एड. राहुल जामदार आणि एड. आनंद लांडगे यांनी काम पाहिले.
व्यावसायिक आणि राजकिय द्वेषापोटी मला या प्रकरणात चुकीच्या पध्दतीने अडकविण्यात आले. मी कुठलेही गुन्हेगारी स्वरुपाचे अथवा मानहानीचे कृत्य केलेले नाही. सर्वोच्च न्यायालायाने मला जामिन मंजुर करून दिलेला आदेश व्यावसायिक स्वांतत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मी न्यायालयाचा आभारी आहे.– मितेश नहाटा, युवा उद्योजक
न्यूजवर्ल्ड मराठीच्या प्लॅटफॉर्मवर रंगणार फॅशनच्या अदा
Newsworldmarathi Pune : इन अससोसिएशन विथ जगदंब आयोजित अदा या महिलांच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 4 वाजता हा फॅशन शो लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या फॅशन शो ला मीडिया पार्टनर न्यूजवर्ल्डमराठी असणार आहे.
अदा फॅशन शो चा यंदाचा चौथा सीजन आहे. या फॅशन शो मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला सहभागी होतात. 100 हुन अधिक महिला या मध्ये सहभागी होतात. या फॅशन शो च्या सर्व बातम्या तुम्हाला न्यूजवर्ल्ड मराठीच्या वेब चॅनलला पाहता येणार आहेत.
महिलांच्या कलागुणांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे, महिलांना प्रोत्साहन देणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या फॅशन शो ला दरवर्षी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आम्हाला आनंद होतो.नीलम शेलार डायरेक्टर, अदा फॅशन शो…
UTT सीझन ६ लिलाव: पीबीजी पुणे जॅग्वार्सने अल्वारो रोब्लेसला ठेवले कायम
Newsworldmarathi Mumbai: पीबीजी पुणे जॅग्वार्सने इंडियनऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ६ साठी एक मजबूत संघ तयार केला आहे. ज्यामुळे संघ बंगळुरूहून पुण्याला स्थलांतरित होत असताना एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या रोस्टरचे नेतृत्व स्पॅनिश स्टार अल्वारो रोब्लेस (जागतिक क्रमवारीत ३६) करणार आहे, तर त्यांच्या महिला संघाला इजिप्तची टेबल टेनिस सेन्सेशन दिना मेशरेफ (जागतिक क्रमवारीत ३८) आणि २०२३ यूटीटी चॅम्पियन रीथ रिश्या यांच्या समावेशाने मोठी ताकद मिळाली आहे. या हंगामाचा लिलाव महत्त्वपूर्ण होता, कारण त्यात पहिल्यांदाच खेळाडूंनी लिलाव पूलमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे संघ निवडीमध्ये रणनीतीचा एक नवीन स्तर जोडला गेला.
गेल्या वर्षीचे कर्णधार आणि दुहेरीतील मुख्य खेळाडू, अल्वारो रोब्लेस यांना जॅग्वार्सने १८.१ लाख टोकनमध्ये निवडले, ज्यामुळे तो सीझन ६ मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावणारा खेळाडू ठरला. पुण्याने नाशिकमधील उदयोन्मुख प्रतिभा तनीशा कोटेचा यांना कायम ठेवण्यासाठी त्यांच्या आरटीएम कार्डचा वापर केला. दिना मेशरेफसाठी ११ लाख टोकन्स, २०२३ मध्ये गोव्याच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारी रीथ रिश्या व अनिर्बन घोष यांच्यासाठी प्रत्येकी ४ लाख टोकन्स आणि मुदिती दानीसाठी २.२ लाख टोकन्स त्यांनी मोजले.
” अल्वारो परत आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. गेल्या हंगामात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि तो प्रचंड अनुभव घेऊन येतो. तनीशासाठी राईट टू मॅच कार्ड वापरणे हे सातत्य निर्माण करण्याच्या आमच्या हेतूचे प्रतिबिंब आहे. दिना, रीथ, मुदित आणि अनिर्बन यांना समाविष्ट केल्याने आम्हाला एक संतुलित आणि स्पर्धात्मक संघ मिळाला आहे. या हंगामात आमचे लक्ष केवळ पुण्याचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारा संघ तयार करण्यावर नाही, तर आमच्या महिला खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाचा फायदा घ्यायचा आहे. ज्या सामन्याच्या निकालांना आणि आमच्या एकूण रणनीतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे पुणे जॅग्वार्सचे मालक पुनीत बालन म्हणाले.
यूटीटीचे प्रशिक्षक स्लोव्हेनियाच्या अनुभवी वेस्ना ओज्टेरसेक आणि सुभाजित साहा हे सीझन ६ मध्ये जॅग्वार्ससाठी कोचिंग रोस्टर्सचे नेतृत्व करतील.
अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) च्या सह-प्रवर्तक विटा दानी लिलावाबद्दल बोलताना म्हणाल्या, “या लिलावाने संघ कसे तयार करतात यात एक नवीन सखोलता जोडली आहे. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तरुण भारतीय प्रतिभेला समान लक्ष दिले जात आहे, हे पाहून उत्साह वाढला. हे संतुलन इंडियनऑइल यूटीटीने गेल्या काही वर्षांत भारतीय टेबल टेनिस परिसंस्थेवर कसा प्रभाव पाडला आहे हे प्रतिबिंबित करते. सीझन ६ मध्ये काय आहे आणि ते कोणत्या पातळीचे स्पर्धेचे आश्वासन देते याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.”
सर्व आठही संघ पाच साखळी सामने खेळतील, तर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली नीरज बजाज आणि विटा दानी यांनी सह-प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग २९ मे ते १५ जून दरम्यान अहमदाबादमधील EKA अरेना येथे होईल.
पीबीजी पुणे जॅग्वार्स स्क्वॉड: अल्वारो रोब्लेस (स्पेन) – १८.१ लाख टोकन, दिना मेशरेफ (इजिप्त) – ११ लाख टोकन, तनीशा कोटेचा – ४ लाख टोकन (RTM), अनिर्बन घोष – ४ लाख टोकन, रीथ रिश्या – ४ लाख टोकन्स, मुदीत दानी – २.२ लाख टोकन्स
UTT २०२५ लिलाव – सर्वोच्च बोली लावलेले खेळाडू (Top Buys)
फॅन सिकी – १९.७ लाख (चेन्नई लायन्स)
अॅड्रियाना डाएझ – १९.३ लाख (कोलकाता थंडर ब्लेड्स)
अल्वारो रोब्लेस – १८.१ लाख (PBG पुणे जॅग्वार्स)
झेंग जियान – १७.२ लाख (गोवा चॅलेंजर्स TTC)
बेर्नाडेट सॉक्स – १५.३ लाख (यू मुंबई TT)
दिया चितळे – १४.१ लाख (दबंग दिल्ली TTC)
हर्मीत देसाई – १४ लाख (गोवा चॅलेंजर्स)
अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) बद्दल
२०१७ मध्ये सुरू झालेला अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) हा भारताचा प्रमुख फ्रँचायझी-आधारित टेबल टेनिस लीग आहे, जो नीरज बजाज आणि विता दानी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) च्या छत्रछायेखाली प्रचारित केला आहे. आज, यूटीटी ही आठ संघांची स्पर्धा आहे, ज्यामध्ये ४८ जागतिक दर्जाचे खेळाडू प्रतिष्ठित विजेतेपदासाठी लढतात. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना आकर्षित करते, ज्यामध्ये ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांचे पदक विजेते सामील आहेत. यूटीटी राष्ट्रीय रँकिंग स्पर्धांना प्रायोजित करून, टेबल टेनिस सुपर लीग आणि देशात डब्ल्यूटीटी इव्हेंट्सचे सह-आयोजन करून खेळाला प्रोत्साहन देते. प्रत्येक आवृत्तीसह, यूटीटी जागतिक टेबल टेनिसचा उत्सव म्हणून आपले स्थान मजबूत करते, खेळाचा दर्जा उंचावते आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देते.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ स्थळाची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी
Newsworldmarathi Pune : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात शुक्रवारी वितरण होणार असून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समारंभ स्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. हा पुरस्कार सोहळा सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक क्रीडा प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.
यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे चोख नियोजन करा अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या
यावेळी श्री. भरणे यांनी व्यासपीठ व्यवस्था, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार, पुरस्कारीर्थींची निवास व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींविषयी माहिती घेतली.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. जीवन गौरवसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख मोग-यांचा पुष्पनैवेद्य
Newsworldmarathi Pune : मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांनी सजलेल्या गाभा-यातील गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल १४० महिला व ८० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३००० गुलाब बंडल, १५०० लिली बंडल, १४०० किलो झेंडू, १५०० किलो शेवंती, १००० किलो गुलछडी, २० हजार चाफा, १०० किलो गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.
जुहू विमानतळ : भारतातील सर्वात पहिले नागरी व व्यावसायिक सेवा देणारे विमानतळ : लेखन अक्षय बनकर
Newsworldmarathi special: जगातील सर्वात प्रसिद्ध अश्या आपल्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांना परिचित आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? याच आपल्या मुंबई शहरात आणखी एक विमानतळ आहे. जुहू विमानतळ. होय. हे देशातील पहिले नागरी विमानतळ आहे आणि १९४० या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत या विमानतळाची भूमिका ही महत्वपूर्ण ठरली आहे. आजही या ठिकाणी काही अतिमहत्वाची (VIP) उड्डाणे, सामान्य विमान वाहतूक (General Aviation) आणि इतर सेवा चालू आहेत.
भारतामध्ये व्यावसायिक हवाई सेवा १५ ऑक्टोबर १९२९ रोजी भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या ऐतिहासिक विमान उड्डाणाने सुरू झाली. भारतातील पहिले वैध वैमानिक परवाना (पायलट लायसन्स) मिळवलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे जे. आर. डी. टाटा यांनी कराचीहून मुंबईपर्यंत एअरमेल सेवा सुरू केली. त्यांनी चालवलेले ‘de Havilland Puss Moth’ हे विमान जुहू विमानतळावर उतरले आणि तिथूनच टाटा एअर मेल सेवा सुरू झाली. हीच कंपनी पुढे एअर इंडिया म्हणून प्रसिद्ध झाली.
भारतीय राष्ट्रीय ध्वजवाहक विमानसेवेच्या स्थापनेमुळे मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असलेल्या जुहू विमानतळावरील कार्यप्रवृत्तीला चालना मिळाली. हे विमानतळ मुंबईच्या लोकप्रिय जुहू समुद्रकिनाऱ्याच्या शेजारील वर्दळीच्या भागात होते. १९३६ साली येथे दोन नवीन धावपट्ट्यांचे (०८/२६ आणि १६/३४) बांधकाम करण्यात आले आणि तिसऱ्या धावपट्टीसाठीही योजना आखण्यात आली होती.१९३७ आणि १९३८ मध्ये जुहू विमानतळावर आणखी सुधारणा करण्यात आल्या, ज्यामध्ये धावपट्ट्यांवर काँक्रीटचे आच्छादन तयार केले गेले. या कालखंडातच रात्रीच्या वेळेतही उड्डाण सेवा सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे जुहू विमानतळावर हळूहळू अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या.
कालांतराने पावसाळ्यात जुहू विमानतळ परिसरात पाणी साठू लागल्याने ते वापरण्यास असुरक्षित ठरू लागले. त्यामुळे विमानांची वाहतूक तात्पुरती पूना विमानतळावर (सध्याचे पुणे विमानतळ, स्थापना वर्ष १९३९) येथे वळवण्यात येत असे. काँक्रीटी धावपट्ट्यांमुळे ही समस्या काही प्रमाणात दूर झाली, तरीही हळूहळू मुंबईसाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम विमानतळाची गरज स्पष्ट होऊ लागली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जुहू विमानतळाने ब्रिटनच्या आशियातील युद्धप्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक रणनीतिक तळ म्हणून काम केले आहे.
मुंबईसाठी नव्या विमानतळाची गरज पाहता सांताक्रूझ विमानतळाची निर्मिती (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) १९४२ मध्ये करण्यात आली. जे जुहू विमानतळापासून साधारण दोन मैलांवर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४८ मध्ये या विमानतळाने अधिकृतपणे प्रवासी विमानसेवा स्विकारली आणि त्याच्या दोन मोठ्या टर्मिनल्सचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी करण्यात आला. तथापि, याचा अर्थ असा नव्हता की जुहू विमानतळ बंद करण्यात आले होते. हे विमानतळ आपली भूमिका सामान्य विमान वाहतूक, प्रशिक्षण, तसेच काही विशिष्ट VIP सेवा आणि हेलिकॉप्टर उड्डाणांपुरती मर्यादित ठेवून आजही कार्यरत आहे.
लेखक
अक्षय बनकर
भारतामध्ये व्यावसायिक हवाई सेवा १५ ऑक्टोबर १९२९ रोजी भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या ऐतिहासिक विमान उड्डाणाने सुरू झाली. भारतातील पहिले वैध वैमानिक परवाना (पायलट लायसन्स) मिळवलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे जे. आर. डी. टाटा यांनी कराचीहून मुंबईपर्यंत एअरमेल सेवा सुरू केली. त्यांनी चालवलेले ‘de Havilland Puss Moth’ हे विमान जुहू विमानतळावर उतरले आणि तिथूनच टाटा एअर मेल सेवा सुरू झाली. हीच कंपनी पुढे एअर इंडिया म्हणून प्रसिद्ध झाली.
भारतीय राष्ट्रीय ध्वजवाहक विमानसेवेच्या स्थापनेमुळे मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असलेल्या जुहू विमानतळावरील कार्यप्रवृत्तीला चालना मिळाली. हे विमानतळ मुंबईच्या लोकप्रिय जुहू समुद्रकिनाऱ्याच्या शेजारील वर्दळीच्या भागात होते. १९३६ साली येथे दोन नवीन धावपट्ट्यांचे (०८/२६ आणि १६/३४) बांधकाम करण्यात आले आणि तिसऱ्या धावपट्टीसाठीही योजना आखण्यात आली होती.१९३७ आणि १९३८ मध्ये जुहू विमानतळावर आणखी सुधारणा करण्यात आल्या, ज्यामध्ये धावपट्ट्यांवर काँक्रीटचे आच्छादन तयार केले गेले. या कालखंडातच रात्रीच्या वेळेतही उड्डाण सेवा सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे जुहू विमानतळावर हळूहळू अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या.
कालांतराने पावसाळ्यात जुहू विमानतळ परिसरात पाणी साठू लागल्याने ते वापरण्यास असुरक्षित ठरू लागले. त्यामुळे विमानांची वाहतूक तात्पुरती पूना विमानतळावर (सध्याचे पुणे विमानतळ, स्थापना वर्ष १९३९) येथे वळवण्यात येत असे. काँक्रीटी धावपट्ट्यांमुळे ही समस्या काही प्रमाणात दूर झाली, तरीही हळूहळू मुंबईसाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम विमानतळाची गरज स्पष्ट होऊ लागली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जुहू विमानतळाने ब्रिटनच्या आशियातील युद्धप्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक रणनीतिक तळ म्हणून काम केले आहे.
मुंबईसाठी नव्या विमानतळाची गरज पाहता सांताक्रूझ विमानतळाची निर्मिती (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) १९४२ मध्ये करण्यात आली. जे जुहू विमानतळापासून साधारण दोन मैलांवर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४८ मध्ये या विमानतळाने अधिकृतपणे प्रवासी विमानसेवा स्विकारली आणि त्याच्या दोन मोठ्या टर्मिनल्सचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी करण्यात आला. तथापि, याचा अर्थ असा नव्हता की जुहू विमानतळ बंद करण्यात आले होते. हे विमानतळ आपली भूमिका सामान्य विमान वाहतूक, प्रशिक्षण, तसेच काही विशिष्ट VIP सेवा आणि हेलिकॉप्टर उड्डाणांपुरती मर्यादित ठेवून आजही कार्यरत आहे.
लेखक
अक्षय बनकर हृदयद्रावक…! कालव्यात बुडून बहिणींसह तिघांचा मृत्यू; कर्जत तालुक्यावर शोककळा
Newsworldmarathi Nagar : कर्जत तालुक्यातील ताजू गावच्या शिवारात घोड कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. दीपाली वनेश साबळे (वय १४), ऐश्वर्या वनेश साबळे (वय १०) आणि कृष्णा रामदास पवळ (वय २६) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यात घोड कालव्याचे आवर्तन सुरू आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे कालव्यात पोहण्यासाठी ठिकठिकाणी मुले व तरुण गर्दी करत आहेत. ताजू गावाच्या शिवारात बुधवारी दुपारी दीपाली व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरले. मात्र, पाण्याला वेग जास्त असल्यामुळे ते चौघेही पाण्यात बुडू लागल्याने जोरजोरात ओरडले.
जवळच्या शेतात ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ काम करत होता. त्याने मुलांचा आवाज ऐकून कालव्याकडे धाव घेतली आणि पाण्यात उडी मारून दोन मुलांना बाहेर काढले. दीपाली व ऐश्वर्याला वाचविण्यासाठी त्याने पुन्हा कालव्यात उडी मारली. मात्र त्या दोघींना वाचवताना कृष्णाचाही बुडून मृत्यू झाला. परिसरातील रहिवाशांनी धाव घेऊन तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तीनही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले तेव्हा मुलींच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

